Lokmat Sakhi >Inspirational > ५ वर्षांच्या मुलीचे मोठे मन! ५० वर्षांच्या कॅन्सर रुग्णासाठी तिने आपल्या केसांना कात्री लावली आणि..

५ वर्षांच्या मुलीचे मोठे मन! ५० वर्षांच्या कॅन्सर रुग्णासाठी तिने आपल्या केसांना कात्री लावली आणि..

Five Years old girl donates hair cancer patient : कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी चिमुकली पुढे एक पाऊल पुढे टाकलं आणि ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 07:22 PM2023-09-25T19:22:05+5:302023-09-25T19:30:17+5:30

Five Years old girl donates hair cancer patient : कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी चिमुकली पुढे एक पाऊल पुढे टाकलं आणि ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली.

Tripuras Five Years old girl donates hair for 50 years old cancer patient | ५ वर्षांच्या मुलीचे मोठे मन! ५० वर्षांच्या कॅन्सर रुग्णासाठी तिने आपल्या केसांना कात्री लावली आणि..

५ वर्षांच्या मुलीचे मोठे मन! ५० वर्षांच्या कॅन्सर रुग्णासाठी तिने आपल्या केसांना कात्री लावली आणि..

एका पाच वर्षांच्या चिमुरडीने संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे काम केलं आहे. अनुसूया घोष हिने कर्करोगग्रस्त महिलेला स्वत:चे केस लांबच लाब केस दान केले. तिचे निस्वार्थ मदतकार्याने आणि दयाळूपणाने अनेकांची मन जिंकली आहेत. (Five Years old  girl donates hair cancer patient)

कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी चिमुकली पुढे एक पाऊल पुढे टाकलं आणि ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. ही मुलगी नेमकी कुठली ते पाहूया. (Tripuras Five Yeras old  girl donates hair for 50 years old cancer patient) कॅन्सर रुग्णाला केस दान करणारी ही चिमुरडी फक्त ५ वर्षांची आहे. अनसूया घोष ही त्रिपूरा येथिल रहिवासी आहे.

विमानाचं बिझनेस क्लासचं तिकिट-लेकीनं दिलं सरप्राइज, लेकीची माया पाहून आईबाबाही गहिवरले! 

संघमित्रा शालिग्राम या सध्या नागपूरच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत उपचार घेत आहेत. केमोथेरपीमुळे त्यांचे केस गळले होते. केस प्रत्यारोपणाची त्यांची याचिका बेंगळुरूमधील एका सामाजिक संस्थेपर्यंत पोहोचली  त्यांनी अगरताळा येथील रहिवासी अनिमेश घोष यांच्याशी त्वरित संपर्क साधला. 

त्यानंतर अनसूयाच्या कुटुंबियांनी तिचे केस दान करण्याचा निर्णय मनापासून घेतला. अनसूयाची आई तिची आई सीमा चकमा शिक्षिका आहेत. यांनी आपल्या मुलीच्या पुढाकाराबद्दल प्रचंड अभिमान व्यक्त केला आणि इतरांना कर्करोगाशी झुंजणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यास प्रोत्साहित केले. छोट्या अनुसूयाच्या प्रयत्नाचे फार कौतुक केले जात आहे. तिच्या आईने सांगितले की, ''मी आणि माझे पती छोट्या छोट्या सामाजिक सेवांमध्ये सहभाग घेतो. म्हणून, आम्ही हे पाऊल उचलण्याचा विचार केला.''

Web Title: Tripuras Five Years old girl donates hair for 50 years old cancer patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.