अभिनेत्री, लेखिका, इंटरेरियर डेकोरेटर अशी तिची ओळख तर आहेच. पण आता पुन्हा एकदा ट्विंकल खन्नाने तिची नवी ओळख निर्माण केली आहे. कारण तिने नुकतीच लंडन येथील विद्यापीठातून 'Creative and Life Writing' या विषयात मास्टर डिग्री घेतली आहे (Twinkle Khanna completes master's degree from London University). या निमित्ताने ट्विंकलने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्यामध्ये तिने मास्टर्स पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त केला आहे (viral video of Twinkle Khanna). या व्हिडिओसोबत तिने लिहिलेली पोस्ट खरोखरच सगळ्यांसाठी प्रोत्साहन देणारी आहे.
या पोस्टमध्ये ती म्हणते की मागच्या एक वर्षात सबमिशन्स, असाइनमेंट्स, डेझर्टेशन अशा सगळ्या गोष्टी मी केल्या आणि माझी डिग्री पूर्ण केली. खरंतर याचा आनंद आहे. पण आता माझा हा मागच्या एक वर्षापासून सुरू असलेला प्रवास संपला याचं वाईटही वाटतं.
गोकुळाष्टमी : नैवैद्याची पंजिरी करण्याची पारंपरिक सुगंधी रेसिपी, चिमूटभर पंजिरीही आरोग्यासाठी मोलाची
जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांचे पालक सगळ्या गोष्टींची तयारी करून देतात. पण माझ्या वयात जे शिकत आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज करणे खरंच कठीण आहे. ट्विंकल म्हणते की तिने ५ विद्यापीठात अर्ज केला होता. त्यापैकी एका विद्यापीठात तिची निवड झाली आणि ती मास्टर्स पूर्ण करण्यासाठी लंडनला आली.
तिच्यासोबत तिला तिच्या मुलीचीही शाळा बदलावी लागली.
नव्या ठिकाणी जाणं, तिथे अड्जस्ट होणं, मुलांना तिथे सांभाळणं, त्यांच्या वेळा जपणं, यासोबतच डॉक्टर, प्लंबर डिलिव्हरी ॲप्स अशा एक ना हजार गोष्टींची माहिती करून घेणं आणि ते सगळं सांभाळत अभ्यास करणं, हे मोठं आव्हान होतं. यासगळ्या प्रवासात साथ देणाऱ्या मित्रमंडळींचे आणि कुटुंबियांचेही तिने आभार मानले आहेत.
ट्विंकल म्हणते की या एक वर्षाच्या प्रवासात ती एक मोठी गोष्ट शिकली. तुमचं वय हे फक्त कमी होतं, वाढत जातं असं नाही.
सणासुदीला पदार्थ तळताना कमी तेल लागावे म्हणून ३ उपाय, कमी तेलातही होतील उत्तम पदार्थ
आपण जर वाढत्या वयासोबत वाढायचं ठरवलं, शिकायचं ठरवलं तर नक्कीच ते मल्टिप्लायर होऊ शकतं. सगळ्या गोष्टी सांभाळून ट्विंकलने या वयात मास्टर्स डिग्री पूर्ण केली, त्यानिमित्त सोशल मीडियावरही तिचं खूप कौतुक होत आहे.