Join us  

‘भारतात जायला खूप आवडते कारण..’ ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांची लेक अनुष्का सांगते, आपलं भारतप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 3:44 PM

UK PM Rishi Sunak Daughter Kuchipudi Dance Performance in Rang Festival : भारत हे माझे मूळ असून हा असा देश आहे ज्याठिकाणी संस्कृती आणि परिवार एकत्र नांदतात.

ठळक मुद्देप्रसिद्ध कुचीपुडी डान्सर अरुणिमा कुमार यांनी १०० डान्सर्ससोबत आपले सादरीकरण केले, त्यामध्ये अनुष्काचा सहभाग होता. यावेळी अनुष्काची आई, आजी-आजोबा आणि तिचे शिक्षक असे सगळे तिचा परफॉर्मन्स पाहायला आले होते.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारताचे जावई असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे ते पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती असून गेल्या काही दिवसांपासून ते सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतात. नुकताच यांची मुलगी अनुष्का हिने कुचीपुडी नृत्य सादर केले. त्यावेळी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काचे भारताविषयीचे प्रेम दिसून आले. ती म्हणाली, “मला दरवर्षी भारतात जायला आवडते” (UK PM Rishi Sunak Daughter Kuchipudi Dance Performance in Rang Festival).    

(Image : Google)

ती म्हणते, “मला डान्स आणि त्यातही कुचीपुडी नृत्यप्रकार दोन्ही आवडते. तुम्ही डान्स करता तेव्हा तुमच्या सगळ्या चिंता आणि ताण दूर जातात. त्यावेळी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत स्टेजवर परफॉर्म करत असता, आणि मला स्टेजवर परफॉर्म करायला आवडते.” भारताविषयी ती म्हणते, “भारत हे माझे मूळ असून हा असा देश आहे ज्याठिकाणी संस्कृती आणि परिवार एकत्र नांदतात.” यावेळी अनुष्काची आई, आजी-आजोबा आणि तिचे शिक्षक असे सगळे तिचा परफॉर्मन्स पाहायला आले होते.

९ वर्षांची असलेल्या अनुष्काला डान्स खूप आवडत असून ब्रिटनमध्ये झालेल्या इंटरजनरेशनल फेस्टीव्हलमध्ये तिने आपले सादरीकरण केले. 'रंग' असे या कार्यक्रमाचे नाव होते. यामध्ये विविध प्रकारच्या भारतीय नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध कुचीपुडी डान्सर अरुणिमा कुमार यांनी १०० डान्सर्ससोबत आपले सादरीकरण केले, त्यामध्ये अनुष्काचा सहभाग होता.  यामध्ये ४ वर्षापासून ते ८५ वर्षापर्यंतच्या डान्सर्सचा सहभाग होता. अशाप्रकारे इतक्या मोठ्या व्यासपीठावर परफॉर्म करता येणे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे असे मत अरुणिमा कुमार यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीऋषी सुनक