Lokmat Sakhi >Inspirational > जिद्द असावी तर अशी, अंगणवाडी ते IAS अधिकारी! ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास

जिद्द असावी तर अशी, अंगणवाडी ते IAS अधिकारी! ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास

IAS Manisha Dharve : लोक हार मानतात पण मनीषा डगमगल्या नाहीत किंवा थकल्या नाहीत. त्यांचा कठोर परिश्रमावर पूर्ण विश्वास होता आणि आज त्या IAS अधिकारी आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:56 IST2025-04-24T15:55:04+5:302025-04-24T15:56:50+5:30

IAS Manisha Dharve : लोक हार मानतात पण मनीषा डगमगल्या नाहीत किंवा थकल्या नाहीत. त्यांचा कठोर परिश्रमावर पूर्ण विश्वास होता आणि आज त्या IAS अधिकारी आहेत.  

upsc success story anganwadi to ias this tribal girl failed thrice but created history manisha dharve | जिद्द असावी तर अशी, अंगणवाडी ते IAS अधिकारी! ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास

जिद्द असावी तर अशी, अंगणवाडी ते IAS अधिकारी! ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास

आयएएस मनीषा धारवे यांचा त्यांच्या गावाला खूप अभिमान वाटतं आहे. कठोर परिश्रमाने त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. २३ वर्षीय मनीषा धारवे या मध्य प्रदेशच्या खरगोनच्या झिरनिया ब्लॉकमधील बोंदरन्या गावच्या रहिवासी आहेत. मनीषा धारवे यांनी यूपीएससी २०२३ मध्ये तिच्या चौथ्या प्रयत्नात २५७ वा रँक मिळवून यश मिळवलं.

लोक हार मानतात पण मनीषा डगमगल्या नाहीत किंवा थकल्या नाहीत. त्यांचा कठोर परिश्रमावर पूर्ण विश्वास होता आणि आज त्या IAS अधिकारी आहेत. मनीषा यांच्या शिक्षणाची सुरुवात गावातील एका छोट्या अंगणवाडीपासून झाली. त्यांचे वडील गंगाराम धारवे, हे एक इंजिनिअर होते, त्यांनी मोठ्या शहरात नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. मुलांना शिक्षण देण्यासाठी ते गावी परतले. ते आणि त्यांची पत्नी सरकारी शाळांमध्ये शिकवत होते.

अधिकारी व्हायचं स्वप्न

मनीषा नेहमीच एक हुशार विद्यार्थिनी होत्या. त्यांनी आठवीपर्यंत सरकारी शाळेत शिक्षण घेतलं. दहावी आणि बारावीचं शिक्षण खरगोनमध्ये घेतलं. बारावीसाठी गणित आणि विज्ञान विषय निवडला, पण त्यांना नेहमीच अधिकारी व्हायचं होतं. दहावीच्या परीक्षेत ७५ टक्के आणि बारावीच्या परीक्षेत ७८ टक्के गुण मिळवले.

यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय

इंदूरच्या होळकर कॉलेजमधून कम्पूटर सायन्समध्ये बी.एससी केलं. पदवी घेतल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पालकांकडे दिल्लीला जाण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला त्यांचं कुटुंब संकोच करत होतं, परंतु शेवटी त्यांनी होकार दिला.

कष्टाने स्वप्न केलं साकार

कठोर परिश्रम करूनही मनीषा पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्या आणि दिल्लीहून गावी परतावं लागलं. त्यानंतरही दोनदा अपयश आलं. काही लोकांनी टोमणे मारले. पण मनीषा यांनी कोणाकडे लक्ष दिलं आहे. कष्टाने आपलं स्वप्न साकार केलं आणि IAS अधिकारी झाल्या. त्यांच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे. 
 

Web Title: upsc success story anganwadi to ias this tribal girl failed thrice but created history manisha dharve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.