Lokmat Sakhi >Inspirational > 'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

These Women Are Selling Traditional salt of Uttarakhand By Starting Salt Business : मीठाशिवाय जगणंच अपूर्ण पण त्या मीठाचाच ध्यास घेऊन राबणाऱ्या एका महिलेची ही गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 05:17 PM2023-03-13T17:17:16+5:302023-03-13T17:20:46+5:30

These Women Are Selling Traditional salt of Uttarakhand By Starting Salt Business : मीठाशिवाय जगणंच अपूर्ण पण त्या मीठाचाच ध्यास घेऊन राबणाऱ्या एका महिलेची ही गोष्ट.

Uttarakhand Women Take Age-Old ‘Pahadi Salt’ Across Country, Earn Lakhs | 'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

'मीठ' हे आपण आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरतोच. 'मीठ' हा आपल्या किचनमधील सर्वात महत्वाचा घटक आहे. अन्नाला रुची यावी व खाद्यपदार्थाचा स्वाद वाढावा यांसाठी प्राचीन काळापासून आपण मिठाचा वापर करत आहोत. एखादा पदार्थ कितीही उत्तम बनला असला आणि त्यात जर मीठ नसेल तर त्या पदार्थाला चवच येत नाही. एखाद्या वेळेस भाजीत, जेवणात कमी मीठ असले तर भाजी अळणी व बेचव लागते. तसेच भाजीत मीठ प्रमाणापेक्षा जास्त घातले गेले तर ते देखील आपल्या आरोग्याला हानीकारक ठरते. आपण रोजच्या वापरात पांढऱ्याशुभ्र, दाणेदार मिठाचा वापर करतो. याशिवाय सैंधव मीठ, समुद्री मीठ, काळे मीठ असे मिठाचे अनेक प्रकार आहेत. 


 
सध्या बाजारांत मिठाचे अनेक ब्रॅण्ड्स उपलब्ध असताना, उत्तराखंडची 'नमकवाली' पर्वतांवरील नैसर्गिक मीठ देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवत आहे. सध्या बरेच लोक आपल्या हेल्थची खूप काळजी घेतात. यादृष्टीने काहीजण मिठाचे सेवन आपल्या आहारातून कमी करताना दिसत आहेत. असे असताना देखील, उत्तराखंडच्या शशी बहुगुणा रतुरी यांनी नैसर्गिक मिठाची चव संपूर्ण देशवासीयांपर्यंत पोहोचविली आहे. शशी यांनी २०१८ मध्ये आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि देशाला जुन्या 'पिस्यु लूण' जातीच्या मीठाची ओळख करून देण्यासाठी 'नमकवाली' नावाचा ब्रँड सुरू केला(These Women Are Selling Traditional salt of Uttarakhand By Starting Salt Business).

'नमकवाली' या ब्रॅण्डची सुरुवात अशी झाली...

द बेटर इंडियाशी बोलताना शशी यांनी सांगितले की, त्या १९८२ पासून अनेक महिलांच्या गटात सामील होऊन सामाजिक कार्य करत आहेत. त्यांचा एक गट उत्तराखंडच्या संस्कृतीसाठीही काम करतो. या गटातील महिला अनेकदा हाताने मीठ आणत. शशीला खूप आनंद झाला की या स्त्रिया आजही ही प्राचीन परंपरा जिवंत ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुरुवात करण्याचा विचार केला. सोशल मीडियावर त्याचा हा प्रयत्न लोकांना आवडला. अशाप्रकारे शशी यांच्या विचारातून 'नमकवाली' नावाचा ब्रँड सुरू झाला. 

'पिस्यु लूण' जातीचे मीठ नैसर्गिकरित्या कसे तयार केले जाते... 

हिमालयीन औषधी वनस्पतींचे मिश्रण एकत्रित करुन तयार केलेले हे मीठ चाळणीवर बारीक करून तयार केले जाते. हे मीठ आले, लसूण, भांग इत्यादी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये तयार केले जाते. सध्या उत्तराखंडच्याच १० ते १२ महिला 'नमकवाली' या ब्रँडशी जोडल्या गेलेल्या आहेत. या महिला मिळून दर महिन्याला देशभरात सुमारे ३० ते ४० किलो मिठाची विक्री करत आहेत. या महिला मिठासोबतच येथील पारंपारिक मसाले आणि डाळींची देखील विक्री करतात.  

या मीठात विशेष असे काय आहे ?

'पिस्यु लूण' नामक मिठाचे वैशिष्ट्य म्हणजे ते चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फार चांगले असते. हे मीठ तयार करताना हिमालयीन वनौषधींसह रॉक मीठ आणि पारंपरिक मसाल्यांचा वापर केला जातो. आपण हे मीठ सॅलड, फळांसह, भाज्यांमध्ये आणि अगदी थेट ब्रेडसोबतही खाऊ शकता. इथल्या पर्वत रांगांमधील स्थायिक लोकांना भाकरीसोबत 'पिस्यु लूण' मीठ दिले तर त्यांना भाजीचीही गरज लागत नाही, असे म्हटले जाते.   

मीठानंतर आता शशी आणि त्यांची टीम इतर गोष्टींवर काम करत आहेत. मीठानंतर त्यांनी हळदीचे काम सुरू केले आहे. डोंगरात पारंपरिक पद्धतीने पिकवलेली नैसर्गिक हळद दळून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. तसेच काही काळापूर्वी त्यांनी जंगली मधही गोळा करण्यास सुरुवात केली आहे. 'नमकवाली' उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना हळूहळू अधिकाधिक गोष्टींशी जोडले जात आहे, जेणेकरून ग्रामीण स्वयंरोजगाराला चालना मिळू शकेल.

Web Title: Uttarakhand Women Take Age-Old ‘Pahadi Salt’ Across Country, Earn Lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.