तब्बल ५ वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या मॅग्नस कार्लसनचा ‘ऑनलाइन एअरथिंग मास्टर्स’ स्पर्धेत काळ्या प्याद्यांसह खेळून पराभव करण्याचा चमत्कार करणारा धडाकेबाज बुद्धीबळपटू ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंद तर आपल्याला माहितीच आहे. त्याच्या याच पाऊल खुणांवरून वाटचाल करत आज त्याची बहिण आर. वैशाली ही देखील ग्रॅण्डमास्टर ठरली आहे. या पात्रतेसाठी लागणारा २५०० ईएलओ रेटिंगचा टप्पा वैशालीने ओलांडला आणि त्याचबरोबर ती भारताची ८४ वी ग्रॅण्डमास्टर ठरली. तर तिसरी महिला बुद्धीबळपटू ठरली. भाऊ आणि बहिण दोघेही ग्रॅण्डमास्टर असण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ आहे. (Vaishali becomes GM, joins Praggnanandhaa to form world's first brother-sister Grandmasters duo)
Congratulations to @chessvaishali for becoming a GM.
— Viswanathan Anand (@vishy64theking) December 2, 2023
She worked very hard the last few months and this augurs well as she gets ready for the candidates. Her parents and just maybe the competition at home should be congratulated.@Rameshchess & Aarthie for being her rock.
स्पेन येथे झालेल्या IV El Llobregat Open खेळात तिने ही कामगिरी केली. ऑक्टोबर महिन्यातच तिने या पात्रतेसाठीची तिसरी लेव्हल पुर्ण केली होती.
एव्हरग्रीन नीतू कपूर ते सारा अली खान- बघा बॉलीवूड अभिनेत्रींचे लग्न- समारंभासाठी परफेक्ट ६ विंटर लूक
या यशाबद्दल बोलताना वैशाली म्हणाली की अखेर मी माझं ध्येय गाठलं आहे. जेव्हापासून चेस खेळायला सुरुवात केली तेव्हापासूनच हे स्वप्न पाहिलं होतं, ते आज पुर्ण झालं. खेळताना मी खूप एक्सायटेड होते, पण तेवढाच दबावही होता. त्यात मधल्या काही वेळात माझा खेळही ठिक झाला नव्हतो. त्याचाही दबाव आला होता. पण अखेर ते सगळं जमून आलं आणि यश मिळालं...
स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी करा 'असा' खास वापर- फळाफुलांनी बहरून जाईल बाग
वैशाली बुद्धिबळाकडे कशी वळाली याचा किस्साही वाचनीय आहे. वैशालीला लहानपणी टिव्हीवर कार्टून फिल्म्स बघत बसण्याची आवड होती. ती तासंतास टिव्हीसमोरच बसून असायची. त्यामुळे तिचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी तिच्या पालकांनी तिला बुद्धिबळाच्या प्रशिक्षण वर्गात पाठवले.
हा खेळ तिला खूप आवडला आणि त्याचा तिला नादच लागला. तिचा तो खेळ पाहून लहान भाऊ प्रज्ञानंदही बुद्धीबळ खेळायला लागला. आज त्यांची ती आवड त्यांना कुठल्याकुठे घेऊन गेली आहे.... या दोन्ही भावंडांवर आज संपूर्ण भारतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.