अभिनेत्री हिना खानने महिन्याभरापुर्वीच तिला कॅन्सर (breast cancer) झाल्याचं सोशल मिडियावर सांगितलं आणि तेव्हापासूनच तिचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. कॅन्सरवर उपाय आहेत. त्यातून आपण पुर्णपणे बरे होऊ शकतो, हे आता प्रत्येकालाच माहिती आहे. पण तरीही हिंमत कुठेतरी कमी होतेच. वरवर पूर्ण आशा असली तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी भीती असतेच. तसंच हिनाच्या चाहत्यांचं झालं आहे. पण चाहत्यांना आणि कॅन्सर या आजाराशी लढणाऱ्या अनेकांना हिंमत देण्याचं काम मात्र हिना स्वत:च करते आहे. ती स्वत:च पुढे होऊन अनेकांना मानसिक बळ देते आहे. आता नुकतंच तिने जे पाऊल उचललं आहे, त्यातून ती मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे दिसून येतंय.. (viral video of Hina Khan boldly shaves her head after experiencing hair fall due to cancer treatment)
केस हा प्रत्येक महिलेचा अगदी जीव की प्राण. कोणाला ते लहान आवडतात तर कोणाला मोठे. पण मनापासून आवडतात आणि त्यांना ती खूप जपते एवढं मात्र नक्की.. केस कापताना ते चुकून थोडे जास्त कापले गेले तरी अनेकींचा जीव तुळतुळतो. कारण शेवटी स्त्रीचं खरं सौंदर्य हे तिच्या केसांमध्येच असतं असं आपण आजवर ऐकत आलो आहोत, वाचत आलो आहोत.
धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे पती सांगतात हृदयाच्या मजबुतीसाठी ५ व्यायाम- हृदयरोगाचा धोका टळेल
आता सामान्य स्त्रिया सौंदर्य खुलविणाऱ्या त्यांच्या केसांवर एवढं प्रेम करत असतील तर मग सेलिब्रिटींच्या 'केस'प्रेमाची गोष्ट काही विचारायलाच नको. त्यांचे केस, त्यांचं सौंदर्य हेच तर त्यांचे खरे की पॉईंट्स असतात. ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. पण हिना खान मात्र त्याला अपवाद ठरली आहे..
हिनाने एक व्हिडिओ साेशल मिडियावर शेअर केला आहे. ती म्हणते की प्रत्येकवेळी केसांमधून हात फिरवल्यावर ते हातावर, कपड्यांवर पडलेले दिसतात. असं प्रत्येकवेळी पाहणं माझ्यासाठी खूपच त्रासदायक ठरत आहे. ते पाहून मेंटली खूप डिस्टर्ब होते. त्यामुळे तिने निर्णय घेतला आणि स्वत:च्या हातानेच डोक्यावर रेझर फिरवून टक्कल केलं. हिना म्हणते की मला आता मानसिकदृष्ट्या खूप स्ट्राँग राहायचं आहे.
केसांवर करा 'लाल' पाण्याची जादू! केस गळणं तर थांबेलच- चमकदार होऊन वाढतीलही भराभर
अशा सगळ्याच गोष्टींपासून मला दूर राहायचं आहे ज्यामुळे मी मेंटली डिस्टर्ब होऊ शकते. एका महिलेसाठी हे सगळा करणं अजिबातच सोपं नाही. म्हणूनच तर हिना आज खरी हिंमतवाली ठरली आहे. हिना म्हणते केस काय आता गेले तरी पुन्हा येतीलच. पण मी तर तीच नेहमीची असणार आहे ना... असं म्हणत तिने कॅन्सरशी लढणाऱ्या इतर स्त्रियांनाही धीर दिला आहे. त्यांना उद्देशून ती म्हणते की आपला संयम हीच आपली शक्ती आहे. त्यामुळे तो कधीही ढळू देऊ नका..