काही भागांत कोरडाठाक दुष्काळ आहे तर काही भागात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. अशाच ठिकाणांपैकी एक आहे केरळमधलंवायनाड. ३१ जुलैच्या रात्री त्या भागात खरोखरच आस्मानी संकट ओढावलं आणि अनेक ठिकाणी दरड कोसळल्या. पावसाच्या सणासण माऱ्याने बऱ्याच ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं आणि बघता बघता चुराल्लमाला व मुंदाक्काई या दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला. याठिकाणी आधीच पावसामुळे खूप मनुष्यहानी झाली होती. कित्येक लोक वाहून गेले तर बरेच दरडीच्या ढिगाखाली अडकले. त्यात पूल तुटल्याने मदतकार्यही गरजूंपर्यंत पोहोचेना. त्यामुळे लवकरात लवकर तो पूल तात्पुरता उभा करण्याचं मोठं आव्हान लष्कारापुढे होतं. तेच काम मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली ३१ तासांच्या विक्रमी वेळेत पुर्ण करण्यात आलं.
सीता शेळके या मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या. त्या सध्या बेंगळुरूमधील लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटातील (MEG) एकमेव महिला अधिकारी आहेत. सैन्यासाठी रस्ते तयार करणे, रस्त्यांतील अडथळे दूर करणे, पूल बांधणे, युद्धकाळात लँडमाइन्स शोधणे आणि ते निकामी करणे हे काम या गटातर्फे केलं जातं.
दीप अमावस्या: चांदीचे- पितळेचे दिवे काही सेकंदातच होतील चकाचक- बघा १ सोपा उपाय
याच गटाने मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली लोखंडाचा तात्पुरता बेली ब्रिज उभारण्याचं काम हातात घेतलं आणि ते अवघ्या ३१ तासांत पूर्ण केलं. स्टील पॅनल वापरून हा पूल तयार केल असून त्यामुळेच दुर्घटनाग्रस्त लोकांपर्यंत मदत पोहोचवणं शक्य झालं आहे. त्यामुळेच त्या परिसरात तसेच देशभरातूनच सीता शेळके यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.