Lokmat Sakhi >Inspirational > कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत..

कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत..

Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life : ८ महिन्यांच्या चिमुकल्याच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी भालाफेकपटूने आपला मेडल विकून पैसे गोळा केले..पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2024 05:37 PM2024-08-16T17:37:10+5:302024-08-17T00:10:51+5:30

Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life : ८ महिन्यांच्या चिमुकल्याच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी भालाफेकपटूने आपला मेडल विकून पैसे गोळा केले..पण..

Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life | कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत..

कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत..

जगात दुसऱ्यांचा विचार करणारी लोक फार कमी असतात असं म्हंटलं जातं पण काही अशा निस्वार्थ लोकांमुळे आजही समाजात माणुसकी टिकून आहे (Social Viral). याचं उत्तम उदाहरण सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोलंडच्या महिला भालाफेकपटूने चिमुकल्याच्या शस्त्रक्रियेसाठी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या मेडलचा लिलाव करत असल्याचे जाहीर केले (Tokyo Olympic).

एका उद्योगसमूहाने घसघशीत किंमत देऊन ते मेडल घेतले.. पण त्यांनी ते मेडल स्वीकारले नाही. उलट त्या लहान लेकराच्या हृदयाची शस्त्रक्रिया पार पडावी म्हणून मदत केली(Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life).

दानशूर मारियाचं कौतुक


महिला भालाफेकपटूचं नाव मारिया आंद्रेजीक. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकलं. मात्र हे पदक पटकावल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये तिने या पदकाचा लिलाव करण्याचं ठरवलं. या पदकासाठी तिला तब्बल १ लाख ९० हजार डॉलर्स म्हणजेच, भारतीय रुपयांमध्ये १ कोटी ४१ लाख ४० हजार रुपयांची किंमत मिळाली.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

पदक लिलाव करण्यामागचं कारण म्हणजे, एका ८ महिन्यांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवणे. मिलोसझेक माल्यसा नावाच्या एका लहान मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रीया करण्यासाठी तिला पैसे गोळा करायचे होते. यासाठी तिने आपल्या पदकाचा लिलाव करण्याचं ठरवलं. या बाळाला अमेरिकेमध्ये जाऊन उपचार घेता यावेत म्हणून तिने पदक लिलावात काढलं.


यासंदर्भातली माहिती तिने फेसबुकवर शेअर केली. पोस्ट करताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, आणि हे पदक पोलंडमधील झाबका या उद्योग समुहाने विकत घेण्याचं ठरवलं. झाबकाने देखील कौतुकास पात्र ठरेल असे कार्य केले. त्यांनी लिलावामध्ये अपेक्षित असणारे पैसे तर दिले, शिवाय तिचं पदकही तिला परत केलं. 'हे पदक तुझ्याकडेच ठेव आम्ही बाळाला लागेल ती सर्व आर्थिक मदत करु' असं तिला त्यांनी सांगितले.

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

यासंदर्भात झाबकाने पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मारियाचं कौतुक केलं. 'तिच्या दानशूर वृत्तीने आणि निर्णयाने आम्ही फार प्रभावित झालो आहोत. आम्हाला तिचा अभिमान आहे आणि तिच्या या कामात आम्ही योगदान देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.' असं झाबकाने आपल्या सोशल नेटवर्किंग पेजवर पोस्ट केलं आहे.

Web Title: Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.