Lokmat Sakhi >Inspirational > राफेल लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला, शिवांगी सिंह.. कोण आहे? वाचा तिच्या जिद्दीची गोष्ट

राफेल लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला, शिवांगी सिंह.. कोण आहे? वाचा तिच्या जिद्दीची गोष्ट

भारतीयांचा अभिमान, तरुणींसमोरील आदर्श अशा तरुणीची तडफदार कथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 11:48 AM2022-01-27T11:48:58+5:302022-01-27T15:24:52+5:30

भारतीयांचा अभिमान, तरुणींसमोरील आदर्श अशा तरुणीची तडफदार कथा...

Who is Shivangi Singh, the first woman to fly Rafale fighter jet? Read her story | राफेल लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला, शिवांगी सिंह.. कोण आहे? वाचा तिच्या जिद्दीची गोष्ट

राफेल लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला, शिवांगी सिंह.. कोण आहे? वाचा तिच्या जिद्दीची गोष्ट

Highlightsपुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात स्थान निर्माण करणारी तडफदार तरुणी लढाऊ विमानाची फायटर पायलट असलेली जिद्दी गोष्ट

जगातील सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या ‘राफेल’ विमानाची फायटर पायलट होण्याचा मान शिवांगी सिंह यांना मिळाला आहे. एकीकडे महिला अजूनही स्वातंत्र्य, शिक्षण, सुरक्षितता यांसारख्या प्रश्नांसाठी लढत असताना सैन्यदलासारख्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात शिवांगी यांना या महत्त्वाच्या पदी विराजमान होण्याचा मान मिळणे ही देशासाठी आणि महिलांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. २६ जानेवारीला ७३ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर देशातील शक्ती आणि संस्कृती यांचे दर्शन घडवणारी परेड आयोजित करण्यात आली होती. या परेडमध्ये वाई दलाचा  वाद्यवृंद आणि कवायत करणारी तुकडीचा सहभाग होता. लेफ्टनंट शिवांगी सिंह, भारतीय हवाई दलाच्या चित्ररथाचे नेतृत्व करत होत्या. राफेल लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. 

(Image : Google)
(Image : Google)

शिक्षण 

शिवांगी सिंह या उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या आहेत. त्यांनी बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीमधून (BHU) आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. युनिव्हर्सिटीमध्ये असताना २०१३ ते २०१५ या काळात त्या त्यांनी नॅशनल कॅडेट कोअरमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी ७ एअर स्क्वाड्रनमध्ये सहभाग घेतला होता. २०१३ मध्ये त्यांनी दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते. 

करीयर 

फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅचमधील आहेत, २०१७ मध्ये शिवांगी भारतीय वायूदलात (IAF - Indian Air Force) रुजू झाल्या. भारतील हवाई दलामध्ये १० महिला वैमानिक आहे, ज्यांनी सुपरसॉनिक विमाने उडवण्याचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. एका पायलटच्या ट्रेनिंगवर जवळपास १५ कोटी रुपयांचा खर्च येतो. ट्रेनिंगनंतर शिवांगी यांना वायूदलातील महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये नियुक्त करण्यात आले. राफेल लढाऊ विमान उडवण्यापूर्वी त्या मिग-२१ बायसन विमान उडवत होत्या. शिवांगी पंजाबमधील अंबाला येथील IAFच्या गोल्डन एरो स्क्वॉड्रनचा देखील एक भाग आहेत. राजस्थानच्या फॉरवर्ड फायटरमध्ये तैनात होत्या, जिथे त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह उड्डाण केले होते.   

कौटुंबिक पार्श्वभूमी 

शिवांगी सिंह यांचे वडिल कुमारेश्वर सिंह आणि आई सीमा यांनी शिवांगी यांना लहानपणापासून प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिल्याने त्या आज भारतीय सैन्यात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. इतकेच नाही तर आपल्या कतृत्वाने त्या इतर तरुणींसमोर आदर्श निर्माण करत आहेत. शिवांगी सिंह यांनी आपल्या आजोबांकडून सैन्यात जाण्याची प्रेरणा घेतली. त्यांचे आजोबा सैन्यात कर्नल होते. 
 

Web Title: Who is Shivangi Singh, the first woman to fly Rafale fighter jet? Read her story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.