घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी सांभाळणं आता सवयीनं अनेकींना जमलं आहे. पण ज्या वर्किंग वुमनचं बाळ वर्ष- दिडवर्षाचं असतं, त्यांची बाळ आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींना योग्य वेळ देताना मात्र पुरेशी दमछाक होते. प्रचंड ओढाताण होते. अशीच ओढाताण Edelweiss म्युच्युअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता (CEO Radhika Gupta) यांचीही झाली आणि अजूनही होतेय. पण त्यातून कसा मार्ग काढला, हे सांगणारी पोस्ट त्यांनी नुकतीच ट्विटरवर शेअर केली असून सध्या ती चांगलीच व्हायरल झाली आहे. (Mother Looks After Baby While Working In Office)
त्यांनी त्यांच्या बाळाचा एक छानसा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. बाळ जमिनीवर खेळण्यांशी खेळतंय आणि बाजूला त्यांची ऑफिस चेअर, ऑफिस डेस्क आहे. बाळाचं वय अंदाजे ६ ते ७ महिन्यांचं असावं.
त्वचेवरचा नॅचरल ग्लो कायम ठेवणाऱ्या २ योगमुद्रा.. दररोज करून बघा- नेहमीच दिसाल तरुण- सुंदर
फोटो पाहून त्यांना बाळाला ऑफिसमध्ये न्यावं लागलेलं आहे, हे अगदी स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्या म्हणतात की असा एखादा दिवस येतो जेव्हा बाळाच्या दोन्ही पालकांना कामानिमित्त बाहेर जावंच लागतं. अशा वेळी जर कुणाचीही मदत मिळाली नाही, तर काय करणार.... तुम्ही ऑफिस आणि बाळ या दोन्ही गोष्टींसाठी कसा वेळ काढता असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्यावर माझं उत्तर हेच असतं की थोडंसं प्लॅनिंग, खूप संयम, अडचणी सोडविण्याचा ॲटीड्यूड आणि तुमच्या बाळाचं हास्य.. या सगळ्या गोष्टींमुळे ऑफिसचं काम आणि बाळाकडे लक्ष देणं सहज जमतं...
On a day when both parents have to work, and there is no help, guess who comes to work?
— Radhika Gupta (@iRadhikaGupta) January 6, 2023
Often asked how are you going to make a mom and CEOs life work. Well, a little planning, a lot of patience and a problem solving attitude make things work. And a baby’s laugh does the rest. pic.twitter.com/u2iqE5pKqU
त्यांनी शेअर केलेली पोस्ट पाहून अनेक जणांनी त्यांचं कौतूक केलं आहे. तर कुणी असंही म्हणत आहे की तुम्ही मोठ्या पदावर असल्यामुळे तुम्हाला हा फायदा मिळतो.
संक्रांत स्पेशल रांगाेळी डिझाईन्स, छोट्या जागेतही झटपट काढता येईल आकर्षक- सुबक रांगोळी
कित्येक कार्यालयांमध्ये अनेक माता अशाही आहेत, ज्यांना अशी सुविधा मिळण्याची खूप गरज असते. पण त्यांचे पद तेवढे मोठे नसल्याने त्यांच्या अशा गोष्टींना वरिष्ठांकडून परवानगी मिळू शकत नाही. राधिका गुप्ता या जे काही करत आहेत, त्याचं खरंच कौतूक आहेच. पण त्यानिमित्ताने समोर आलेला सर्वसामान्य नोकरदार मातांचा प्रश्नही दुर्लक्षित करण्यासारखा मुळीच नाही.