प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं नेहमी म्हटलं जातं. कधी ती आई असू शकते, कधी बहीण, कधी पत्नी, कधी आजी किंवा एखादी मैत्रीण. आई आपल्या मुलाला घडवण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. बहीण आपल्या भावाकडून रक्षणाचं वचन घेत असली, तरी वेळप्रसंगी त्याच्यावर आलेल्या संकटात तीच त्याचं सुरक्षा कवच होते.
पत्नी ही तर 'लाईफ पार्टनर'च असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणार ती नवऱ्याला साथ करत असते, त्याला आधार देत असते. तू पुढे हो, मी तुझ्यासोबत आहे, हे तिचे शब्द नेहमीच बळ देणारे असतात. विशेष म्हणजे, ती फक्त वरवर बोलत नाही, तर कृतीतून सिद्धही करते.
पण, सर्व सुखदुःखात 'आपल्या माणसा'सोबत भक्कम उभ्या राहणाऱ्या बाईच्या स्वप्नांचं काय? तिचे छंद, तिची आवड, तिचं ध्येय, तिच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांचं काय? आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्या आत्मनिर्भर आहेत, आत्मसन्मानाची जाणीव त्यांना आहे. तरीही, अनेक जणी परिस्थितीमुळे, अन्य जबाबदाऱ्यांमुळे, भिडस्त स्वभावामुळे, पुरेसं पाठबळ नसल्यामुळे एक पाऊल मागे आहेत. अशा स्त्रियांसाठीच 'आदित्य बिर्ला कॅपिटल'ने एक पाऊल पुढे टाकत सुरू केला आहे, '#WomanInTheMirror' हा अभिनव उपक्रम.
आपण जेव्हा आरशासमोर उभे राहतो, तेव्हा आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. स्त्रीने आरशासमोर उभं राहावं आणि जे प्रेरणादायी शब्द ती आपल्या मुलाला, भावाला, नवऱ्याला सांगते, ते तिने आरशातल्या 'ती'ला - म्हणजेच स्वतःला सांगावेत, असा या संकल्पनेमागचा विचार आहे. थोडक्यात, स्त्रीने स्वतःची स्वप्नं, ध्येय पूर्ण करण्याचा निर्धार करावा, त्यासाठी स्वतःला प्रोत्साहन द्यावं, स्वतःची काळजी घ्यावी आणि थोडंसं स्वतःसाठीही जगावं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महिलांना स्वबळावर उभं करण्यासाठी त्यांना आवश्यक ते संरक्षण, गुंतवणूक, अर्थसहाय्य आणि सल्ला देण्याची पूर्ण तयारी 'आदित्य बिर्ला कॅपिटल'नं केली आहे. केवळ उक्ती नव्हे, तर कृतीतून ते स्त्रियांप्रती असलेला आदर व्यक्त करत आहेत, त्यांच्या स्त्रीत्वाला सलाम करत आहेत.
तुम्हीही आरशासमोर उभं राहून स्वतःला काही सांगू इच्छिता का? तुमची गोष्ट आमच्यासोबत इन्स्टाग्रामवर शेअर करा. Aditya Birla Capital ला टॅग करा आणि '#WomanInTheMirror' हा हॅशटॅग वापरायलाही विसरू नका.