काहीजण स्वप्न बघतात त्याचा विचार करतात आणि सोडून देतात, परंतु काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात जे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग ते इतर गोष्टींचा विचार नाही करत. अशावेळी कितीही आव्हान आली तरीही त्या सगळ्यांचा सामना करून अतिशय धाडसाने आणि पॅशनेटली आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागतात. अशीच एक स्वप्नवेडी मुलगी म्हणजे आकांक्षा मोंगा. सध्या इंटरनेटच्या जगात खूप वेगाने सर्च केल्या जाणाऱ्या नावांपैकी एक नाव आहे आकांक्षा मोंगाचे.
बर्याच लोकांसाठी, देश आणि जगभर प्रवास करणे हा त्यांचा छंद नसून त्यांचे पॅशन असते. आणि खूप कमी लोकांमध्ये आपले पॅशन जगण्याची आणि पूर्ण कारण्याचे धैर्य असते. आपले पॅशन पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या त्याच त्याच कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागते. हेच धाडस दिल्लीच्या आकांक्षा मोंगाने केले. वर्षभरापूर्वी आकांक्षाची ओळख काही वेगळी होती आणि आता वर्षभरानंतर ती एक ट्रॅव्हलर, कथाकार आणि साहसी धाडस करणारी आकांक्षा म्हणून ओळखली जाते(Woman Leaves Her Job At LinkedIn To Travel The World, Post Is Viral).
नेमकं आकांक्षाने आपल्या पॅशनसाठी काय केलं ?
आकांक्षा एक वर्षापूर्वी लिंक्डइनमध्ये क्रिएटर मॅनेजर असोसिएट या पदावर कार्यरत होती. अनेक वर्षे इंडस्ट्रीमध्ये क्रिएटर मॅनेजर असोसिएट म्हणून काम केल्यानंतर त्यांनी आपली आवड जोपासण्याचे ठरवले. आकांक्षाचे वडील सैन्यात होते आणि त्यांना दर काही वर्षांनी पोस्टिंग मिळत असे, त्यामुळे तिचे बालपण वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल होत. बालपण वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल असल्याकारणारे, इथूनच तिला प्रवास करण्याची आवड निर्माण झाली.
गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण..
I quit my job at LinkedIn.
— Aakanksha Monga (@Aakanksha_99) May 17, 2023
Last year, on this very date.
When I left, I promised to give myself 1 year to focus on my passion and travel the world full time.
When I left I was burnt out,had 250k followers on IG, worked alone.
Want to know how it’s going now? 🌻 pic.twitter.com/NJzNgKrOjQ
नुपूर आणि अश्विन यांचा इको-फ्रेंडली विवाह सोहळा, बघा नेमकं काय आहे हे...
एकटीने प्रवास करायला अशी केली सुरुवात...
आकांक्षाचे वडील सैन्यात असल्याकारणाने भारत आणि भारताबाहेर त्यांची सारखी पोस्टिंग होत असे. यामुळेच जगभर प्रवास करण्याची गोडी तिच्या मनात निर्माण झाली. कॉलेजमध्ये असताना तिने सर्वप्रथम छोट्या छोट्या सोलो ट्रिप करण्यास सुरुवात केली. प्रवास करायचा म्हटलं तर प्रवासासाठी लागणारे पैसे आलेच, तेव्हा कॉलेजमध्ये शिकता शिकता तिने इंटर्नशिप करण्यास सुरुवात केली. या इंटर्नशिप मधून मिळणारे पैसे ती आपल्या प्रवासासाठी खर्च करत असे. इंटर्नशिप मधून मिळणाऱ्या पैश्यामधून तिने आधी स्वस्त आणि जवजवळच्या ठिकाणांना भेट देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळुहळु ती जसा प्रवास करत गेली तसे तिने आपल्या प्रवासाचे वर्णन करणारे ट्रॅव्हल ब्लॉग बनवायला सुरुवात केली.
नुकतेच आकांक्षाने आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत गेल्या वर्षी मी याच तारखेला माझा लिंक्डइनमधला जॉब सोडला होता. तो जॉब सोडून आता मला एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे ट्विट १७ मे रोजी शेअर करण्यात आले होते. पोस्ट केल्यापासून त्याला २००० हून अधिक लाईक्स आले आहेत. शेअरला अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत. आता आकांक्षाची ही रंजक गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आयुष्यात, आपल्यापैकी बरेच जण फक्त पैसे कमावण्यासाठी घरदार, आपली माणसं सोडून जातात, परंतु सत्य हे आहे की आपण स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी थोडा का होईना पण वेळ काढलाच पाहिजे.
एका वर्षात एक वेगळी ओळख मिळाली....
आकांक्षाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने जानेवारी ते जून २०२२ पर्यंत सहा महिने लिंक्डइनमध्ये क्रिएटर मॅनेजर असोसिएट म्हणून काम केले. त्यानंतर आकांक्षाने एका वर्षानंतर एका वेगळ्या ट्विटमध्ये आपल्या प्रवासाबद्दल सांगितले. आज, एका वर्षानंतर, तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स २,५०,००० वरून ७ लाख फॉलोअर्स झाले आहेत. आकांक्षाने आतापर्यंत १२ देशांचा प्रवास केला आहे त्यापैकी ८ देशांना तिने एकटीने भेट दिली आहे.
आज आकांक्षाकडे सहा लोकांची टीम आहे आणि तिने 'ट्रॅव्हल अ मोर' हे ट्रॅव्हल स्टार्टअप सुरू केले आहे. तिने आतापर्यंत ३०० हून अधिक शॉर्ट्स आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत, आणि ३० हुन अधिक ब्रँड्ससह काम केले आहे. आज ज्या व्यक्तीला आपली आवड आपले पॅशन जपायचे आहे पण काही कारणांमुळे त्यांना ते करता येत नाही, अशा लोकांसाठी आकांक्षा एक उत्तम उदाहरण ठरली आहे.