Lokmat Sakhi >Inspirational > टायटॅनिक पाहण्यासाठी 'तिने’मोजले तब्बल २ कोटी; ३० वर्षे उपसले कष्ट

टायटॅनिक पाहण्यासाठी 'तिने’मोजले तब्बल २ कोटी; ३० वर्षे उपसले कष्ट

Woman Spends Around 2 Crore Rupees to Visit Titanic Wreckage She Save 30 Years For this : प्रवास महिलेच्या जिद्दीचा; लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खर्ची केली संपूर्ण आयुष्याची पुंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 06:37 PM2022-10-19T18:37:31+5:302022-10-19T18:45:10+5:30

Woman Spends Around 2 Crore Rupees to Visit Titanic Wreckage She Save 30 Years For this : प्रवास महिलेच्या जिद्दीचा; लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खर्ची केली संपूर्ण आयुष्याची पुंजी

Woman Spends Around 2 Crore Rupees to Visit Titanic Wreckage She Save 30 Years For this : 'She' paid as much as 2 crores to watch Titanic; 30 years of hard work | टायटॅनिक पाहण्यासाठी 'तिने’मोजले तब्बल २ कोटी; ३० वर्षे उपसले कष्ट

टायटॅनिक पाहण्यासाठी 'तिने’मोजले तब्बल २ कोटी; ३० वर्षे उपसले कष्ट

Highlightsरेनाटा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक काय काय करतात याचे हे उत्तम उदाहरण आहेयटॅनिक पाहण्याच्या वे़डापायी आपण लग्नही केले नाही आणि मुलेही नाहीत असे रेनाटा सांगतात

कोणाचे स्वप्न काय असेल तर कोणाचे स्वप्न काय असेल हे आपण सांगू शकत नाही. कोणी आपल्या आयुष्याची पुंजी साठवून परदेश वारी करायची स्वप्न पाहतात तर कोणी पैसे साठवून मोठा बंगला किंवा महागडी गाडी खरेदी करण्याचे प्लॅन करतात. पण एका महिलेने ३० वर्षांची कमाई साठवून त्याचे काय केले हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. याचे कारणही तसेच आहे, या महिलेने अतिशय कष्टाने कमावलेले पैसे साठवून ११० वर्षांचे वय असलेले टायटॅनिक हे जगभरातील प्रसिद्ध जहाजाचे तुटलेले भाग पाहायला गेली. यासाठी तिला थोडाथोडका नाही तर तब्बल २ कोटी रुपये खर्च आला (Woman Spends Around 2 Crore Rupees to Visit Titanic Wreckage She Save 30 Years For this). 

(Image : Google)
(Image : Google)

या महिलेचे नाव रेनाटा असून तिने लहान असतानाच आपल्याला समुद्रशास्त्राचा अभ्यास करायचा असल्याचे ठरवले. रेनाटा सांगतात, आपण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात टायटॅनिक जहाज सापडले होते. त्यामुळे माझी स्वप्न धुळीला मिळाली असं मला वाटलं आणि मी बँकींग क्षेत्रात करीयर करायचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्याकडे जास्त पैसेही नव्हते. टायटॅनिक पाहण्याच्या वे़डापायी आपण लग्नही केले नाही आणि मुलेही नाहीत. या सगळ्या गोष्टी मी केवळ टायटॅनिक पाहण्यासाठी केल्या होत्या. ‘बीबीसी’ने या महिलेची मुलाखत घेतली असून यामध्ये रेनाटा यांनी आपला सगळा प्रवास सांगितला आहे. 


रेनाटा म्हणाल्या, आपले जन्मभराचे स्वप्न पूर्ण होणे ही गोष्ट काय आहे हे आपण शब्दात सांगू शकत नाही. या जहाजाची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले. ११० वर्षांचे असलेले टायटॅनिक जहाज अटलांटिक समुद्राच्या उत्तरेकडे असून आता त्याचे तुटलेले अवशेष पाहण्यासाठी काही शास्त्रज्ञांना याठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाते. यासाठी खूप जास्त खर्च असून समुद्राच्या तळाशी जावे लागत असल्याने हे काहीसे धाडसाचे आहे. रेनाटा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक काय काय करतात अशा आशयाच्या कमेंटस या व्हिडिओवर आल्या आहेत.  


 

Web Title: Woman Spends Around 2 Crore Rupees to Visit Titanic Wreckage She Save 30 Years For this : 'She' paid as much as 2 crores to watch Titanic; 30 years of hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.