Join us  

women's cricket world cup 2022 : पाकिस्तानची बिस्माह मॅच हरली पण, लेकीसह तिने सांगितलेली 'जिंकण्याची' गोष्ट वाचली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 11:16 AM

women's cricket world cup 2022: एकीकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत असताना मैदानावरील कामगिरीमध्ये स्वत:ला आणि संघाला सिद्ध करण्याचे असलेले आव्हान आणि दुसरीकडे आपल्या तान्हुल्या बाळाची जबाबदारी अशा दुहेरी भूमिकेत असल्याने बिस्माहचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे बिस्माह एक ऑलराऊंडर खेळाडू असून तिचा जन्म काश्मिरी कुटुंबात झाला आहे. भारतीय संघातील खेळाडूंनीही या बाळाशी खेळण्याबरोबर त्याच्यासोबत फोटो काढले.

पाठीवर आपल्या लेकराला बांधून इंग्रजांशी दोन हात करणारी लाणी लक्ष्मीबाई आपल्या सगळ्यांना माहित आहे. इतकेच काय तर संसदेत बाळाला घेऊन येत आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या परदेशी नेत्याही आपण पाहिल्या आहेत. स्त्री कोणत्याही क्षेत्रात गेली तरी तिला कौटुंबिक जबाबदाऱ्या चुकलेल्या नाहीत. विशेष म्हणजे स्त्री आपले करिअर आणि कुटुंब या दोन्ही पातळ्यावर तितकीच खंबीरपणे लढत असते. न्यूझिलंड येथे सुरू असलेल्या वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतही (women's cricket world cup 2022) याचे दर्शन घडले. पाकिस्तानच्यामहिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारुफ (Bismah Maroof) ही आपल्या लहानग्या मुलीला घेऊन मैदानावर आली. त्यामुळे सर्वांचेच लक्ष तिच्याकडे वेधले गेले. एकीकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत असताना मैदानावरील कामगिरीमध्ये स्वत:ला आणि संघाला सिद्ध करण्याचे असलेले आव्हान आणि दुसरीकडे आपल्या तान्हुल्या बाळाची जबाबदारी अशा दुहेरी भूमिकेत असल्याने बिस्माहचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

(Image : Google)

अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन मैदानाकडे जाणारा बिस्माहचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे मैदानावर उत्तम खेळाडू, संघाची कर्णधआर असली तरी आई म्हणून असलेली तिची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. अनेकांनी तिचे या धाडसासाठी कौतुकही केले आहे. याविषयी बिस्माह  म्हणते, एकदा लग्न, मूल झाले की महिलांसाठी करिअर करणे वाटते तितके सोपे नसते. याच गोष्टीमुळे अनेक मुली लग्नानंतर करीयर सोडून देतात. पण कुटुंबियांची साथ आणि तुमच्यात जिद्द असेल तर करिअरमध्ये आपले स्थान कायम ठेवणे अवघड नाही. त्यामुळेच मुलगी इतकी लहान असताना मी कुटुंबियांच्या साथीमुळे माझ्या फिटनेसकडे आणि खेळाकडे लक्ष देऊ शकले असेही ती म्हणाली. 

(Image : Google)

बिस्माहनी मैदानात येताना कडेवर घेतलेल्या तिच्या बाळाचे लाल रंगाच्या कपड्यांतील फोटो अतिशय गोंडस आहेत. मैदानावर खेळाडूंबरोबरच या बाळाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नाही तर भारतीय संघातील खेळाडूंनीही या बाळाशी खेळण्याबरोबर त्याच्यासोबत फोटो काढले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तानला हरवले मात्र बिस्माहच्या मुलीने भारतीय खेळाडूंचे मन जिंकले अशा आशयाची कॅप्शन अनेकांनी दिली आहे. बिस्माह  एक ऑलराऊंडर खेळाडू असून तिचा जन्म काश्मिरी कुटुंबात झाला आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला टी-२० क्रिकेटविश्वचषक ट्वेन्टी-२०पाकिस्तानमहिला