‘ती’ असतेच, हेच आपण गृहित धरलेलं असतं. ती असते, नेहमीप्रमाणे घरातली सगळी कामं करते, आपल्याला हवं नको बघते, ती मायेचा आधार देते, कुणी नसलं चिडायला तर तिच्यावर चिडून सगळा राग काढता येतो. ओरडून बोलता येतं. फ्रस्ट्रेशन काढता येतं. आणि तिनं आपली कामं करावी, ती करतेच हे सगळं गृहित धरता येतं. पण ती नसली की कळतं, तिला आपण किती गृहित धरतो. एरव्ही बाहेर येताजाता आपण ज्याला त्याला थँक यू म्हणत असतो, पण तिला थँक यू म्हणणंच राहून जातं. ती कुणीही असू शकते, तुमची आई, मैत्रीण, बहीण, बायको, सहकारी, मुलगी, गर्लफ्रेण्ड आणि सखीही. आठवून पहा, तुम्ही कधी तिला म्हणाला आहात का थँक्स? म्हणाला आहात का, तू आहेस म्हणून मी आहे. तू आहेस म्हणून जगण्याला अर्थ आहे? आता तुम्ही म्हणाल प्रेमाच्या नात्यात कशाला हवे थँक्स आणि सॉरी. पण बोलून पहा, अच्छा लगता है! एकदा मनापासून म्हणून पहा तिला थँक्स.. बघा तुमच्या नात्यात किती सुखच सुख येईल.फार अवघड नसतं ते, पण आपण करत नाही. आणि गृहित धरणं एवढं असतं की, विसरुन जातो तिनं आपल्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी. मात्र ‘लोकमत सखी’ तुम्हाला आता ही एक संधी देतेय, तुमच्या आयुष्यात अगदी स्पेशल स्थान असलेल्या, तुमचं जगणं समृध्द करणाऱ्या तुमच्या ‘तिला’ थँक्स म्हणण्याची. ती कुणीही असू शकते, तुमची प्रेमळ आई. जीवाभावाची बहीण, तुमची मैत्रीण, अगदी कार्यालयातील सहकारीही.
महिला दिनाच्या निमित्तानं त्याना ‘थँक्स’ म्हणा..
व्यक्त करा मनातल्या भावना. कळू देत ‘तिला’ तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि तुमच्या आयुष्यात तिचं काय स्थान आहे ते..हा महिला दिन खऱ्या अर्थानं स्पेशल करायचा असेल तर तुम्ही एक पाऊल पुढे येत फक्त मनातल्या भावनांना शब्दांचं बळ द्यायला हवं. साधेसोपे शब्द. आपण नेहमी बोलतो तेच शब्द. तीच भाषा. त्याच भावना. आणि तेच प्रेम. ते सारं लिहून म्हणा #Thankyousakhi.आपल्या आयुष्यातली कुठलीही स्त्री न बोलता बरंच काही समजून घेते, तिला कळतं सगळं.पण कधीकधी शब्दात सांगितलेलं ऐकायलाही आवडतं. दोन स्तुतीचे, कौतुकाचे सच्चे शब्द आणि त्यामागची भावना नातं बळकट करते.आपण आपल्या नात्याला किती मान देतो, किती आदर देतो हे त्यातून कळतो..म्हणून मग व्यक्त करा ते प्रेम..
काय करायचं?
अगदी सोपं आहे.तुम्हाला #Thankyousakhi या कॉण्टेस्टमध्ये सहभागी होताना तुमच्या स्मार्टफोनवर फक्त एक एका मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे. तो ही व्हर्टिकल म्हणजे मोबाइल उभा धरुन शूट करायचं. बोलायच्या मनातल्या भावना. जिच्यासाठी हा संदेश आहे तिच्यासाठी म्हणायचं खास थँक्स.आणि लोकमत सखीच्या इन्स्टाग्राम आणि फेसबूक पेजवर मेसेंजरमध्ये तो व्हिडिओ पाठवायचा आहे.लोकमत सखीच्या इन्स्टाग्राम फिल्टरमधली फ्रेम वापरुनही तुम्ही व्हिडिओ करू शकता..चला तर मग मनातल्या भावना त्या स्पेशल ‘तिच्यासाठी’ व्यक्त करा आणि म्हणा..#Thankyousakhi.