(Image Credit- The Better India)
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे....! वृद्धाश्रमातले निरागस, हतबल चेहरे पाहिले की त्यांच्याबद्दल एक वेगळीच आत्मियता जाणवते. ज्या वयस्कर लोकांना आपली मुलं सांभाळत नाहीत. अशांना देवाच्या रुपानं काही संस्था, व्यक्ती मदतीचा हात देतात जे त्यांचे दु:खरूपी जीवन सुखात बदलण्यास कारणीभूत ठरतात.(Inspirational Stories Old age home at gujarat runs by asha rajpurohit)
गुजरातच्या डिसामध्ये एक ३० वर्षीय महिला 'सुदामा वृद्धाश्रम' चालवत आहेत. आशा पुरोहीत इथे राहत असलेल्या २२ कुटुंबांची सेवा करण्यासाठी स्वत:च्या कुटुंबापासूनही लांब राहिल्या. जेणेकरून त्यांना आपलं संपूर्ण जीवन वृद्धाश्रमात घालवता येईल. द बेटर इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं की , ''मी चार वर्षांपासून इथे राहत आहे मला इथे राहायला खूप आवडतं. कधी कधी मला असं वाटतं की मला याच कामासाठी माझ्या आईनं जन्म दिला.''
या वृद्धाश्रमाची सुरूवात १४ वर्षांपूर्वी त्यांचे वडील कांतिलाल राजपुरोहीत यांनी केली होती. निराधार वृद्ध आणि अपंगांना आधार देण्यासाठी हे आश्रम सुरू झाले. जवळपास १० वर्ष हे आश्रम चालवल्यानंतर त्याचं निधन झालं. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी हे आश्रम चालवण्याची जबाबदारी आपली मुलगी आशा हिच्यावर सोपावली.
वयस्कर लोकांच्या सेवेसाठी सोडलं घर-दार
आशा यांनी बाबांच्या शब्दांचा मान ठेवत आपलं दैनंदिन जीवन सोडून ही वाट धरली. या कार्यासाठी त्या मुलांपासूनही लांब राहिल्या. जेणेकरून या वडिलांनी सुरू केलेल्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांची पूर्ण भक्तिभावाने सेवा करता येईल. आशा सांगतात की, ''या आश्रमात आधी १० ते १५ वयस्कर लोक होते. आता यांची संख्या २२ आहे.
घरी बनवलेलं तूप परदेशात विकून पन्नाशीत बनली बिझनेस वूमन; महिन्याला कमावतेय २० लाख
लोकांनी दिलेल्या मदतीच्या आधारावर हे आश्रम चालत आहे. आजूबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी खास प्रसंग साजरे करण्यासाठी येतात.'' पैशांच्या कमतरतेमुळे आशा त्यांच्या वृद्धाश्रमातील काम स्वत: करतात. वयस्कर लोकांना वेळेवर जेवणं देणं,औषध देणं बाकी सगळी व्यवस्था पाहतात.