Join us  

५०० रुपये उसने घेऊन सुरु केला बिझनेस! आज होतोय करोडोंचा टर्न ओव्हर, ४ कंपन्यांची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 2:18 PM

Women's day 2023 Inspiring Story of Business Woman : . लोक पिशवीतलं लोणतं विकत घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं लक्षात आलं. नंतर त्यांनी दर्जेदार पॅकींगचा अवलंब केला आणि लोणच्याची विक्री सुरू झाली.

जर काही करण्याची इच्छा असेल तर कोणतंही संकट आडवं आलं तरी त्याला व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. बिकट परिस्थितीतून वाट काढून संकटांवर  मात  करणारे लोक इतरांसाठी मोठं उदाहरण ठरतात. आपला स्वत:चा व्यवसाय असावा आणि त्यातून भरपूर नफा मिळावा असं स्वप्न बरेचजण पाहतात.  एका महिलेनं ५०० रूपये उधार घेऊन बिझनेस सुरू केला आणि आज करोडोंचा टर्नओव्हर होत आहे. (Inspiring story of business woman and founder of shri krishna pickles krishna yadav of uttar pradesh)

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या एका छोट्या भागात राहणाऱ्या कृष्णा यादव यांच्या आज ४ कंपन्या आहेत. ज्यांची उलाढाल करोडोंमध्ये आहे. छोट्या शहरातील असूनही त्यांनी यश संपादन करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. लग्नानंतर कृष्णाच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते, पण पतीची तब्येत बिघडल्याने कुटुंबाची जबाबदारी कृष्णा यांच्या खांद्यावर आली. पैश्यांच्या कमतरतेअभावी परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्यांना घर विकावे लागले. एवढेच नाही तर तीन लहान मुलांची जबाबदारी आणि सतत बिघडत चाललेली पतीची तब्येत आणि कर्ज अशा सर्व समस्या येऊ लागल्या.

पैसे उधार घेऊन त्यांनी हा प्रवास सुरु केला. 

कृष्णा यांनी आयुष्यातील या समस्यांना घाबरून न जाता धैर्य दाखवले आणि कामाच्या संदर्भात दिल्लीला येण्याचा निर्णय घेतला. त्यांची आर्थिक चणचण एवढी होती की तिला दिल्लीत येण्यासाठी ५०० रुपये उधार घ्यावे लागले आणि दिल्लीला गेल्या पण हा मार्ग तितका सोपा नव्हता. दिल्लीतही अनेकदा त्यांना निराशेचा सामना करावा लागला, तरीही त्या हिंमत हारली नाही.

कृष्णा आणि त्यांचे पती हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकण्यास सुरुवात केली. त्यासाठी भाड्याने जमीन घेऊन भाजीपाला पिकवायला सुरुवात केली आणि तोच भाजीपाला बाजारात विकला. अशा रीतीने त्यांना उदरनिर्वाहासाठी थोडे फार पैसे मिळू लागले. त्यानंतर 2001 मध्ये कृषी विज्ञान केंद्रातून फूड प्रोसेसिंगचे 3 महिने प्रशिक्षण घेतले.

फूड प्रोसेसिंगच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी लोणची बनवण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती शिकल्या. त्यानंतर कृष्णा यादव यांनी लोणची बनवून विकण्याचा निर्णय घेतला आणि 3,000 रुपये वापरून लोणच्याची पाकीटं बनवली, ज्याची विक्री केल्यानंतर त्यांना 5,200 रुपये मिळाले. ही रक्कम फारशी नसली तरी कृष्णा ज्या आर्थिक अवस्थेतून जात होती त्या काळात ही त्यांची चांगली कमाई होती.

हळूहळू त्यांच्या लक्षात आले की, बाजारात लोणच्याला मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय सुरू केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. या विचाराने त्यांनी लोणची बनवायला सुरुवात केली. त्या घरोघरी लोणचे विकू लागल्या. लोक पिशवीतलं लोणतं विकत घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं लक्षात आलं. नंतर त्यांनी दर्जेदार पॅकींगचा अवलंब केला आणि लोणच्याची विक्री सुरू झाली.

कृष्णा यांच्यासाठी सर्व काम एकट्यानं करणं खूपच अवघड होतं. कारण मसाले दळण्यापासून पॅकींगपर्यंत सर्व कामं त्या एकट्या करायच्या. त्यांनी “श्रीकृष्ण पिकल्स” नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. कृष्णा आणि त्यांच्या पतीने मिळून ही कंपनी स्थापन केली आणि लोणच्यासह इतर गोष्टी विकायला सुरुवात केली. सध्या त्यांच्या चार कंपन्या आणि चार कोटींहून अधिक उलाढाल आहे.

पुरस्कारही मिळाले

कृष्णा यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५१ हजारांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांना नारी शक्ती सन्मान, चॅम्पियन किसान महिला पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

टॅग्स :जागतिक महिला दिनप्रेरणादायक गोष्टी