रेखा आकाश वाघमारे
माझ्या जीवनात खूप सखी आहेत. पण त्यातली आवडती आणत्र अतीप्रीय अशी सुपरसखी ही माझी लाडकी अलकाताई. माझी मोठी बहीण, माझी जीवाभावाची मैत्रीण. माझ्या ताईला मी अगदी माझ्या मनातील गोष्टी विश्वासाने सांगून माझे मन हलके करते. सुख आणि दुःख ही जीवनाची चाकं आहेतच. त्यात जेव्हा मला आधाराची गरज असते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझी सुपरसखी माझी ताई दिसते. आनंदात तर सर्वचजण सोबत असतात पण दुःखाच्या वेळी धीर देणारे, समजदारीने परिस्थिती हाताळण्यासाठी मदत आणि प्रेमाचे शब्द मला ताईकडून मिळतात.
शेतकऱ्याच्या १० वर्षाच्या लेकीने केली कमाल! तिची मेडल पाहून तर विराट कोहलीही झाला चकित..
माझी बहीण मुंबईला राहते. ती गृहिणी आहे. आयुष्यात अडचणीचा सामना सहजतेने हाताळण्याची ताकद माझ्या ताईत आहे. मला आठवतंय तिला कॅन्सर झाला होता. अत्यंत धिराने ती या आजारातून बाहेर पडली. स्वतःला सावरत कुटूंबालाही सावरले. तिच्या दोन्ही मुलांना तिने हिमतीने कसे जगायचे शिकवले. आजारावर मात करून जगण्याची सुखद रीत तिने आम्हाला दाखवली. कॅन्सरसारख्या आजारात असताना जगण्याची उमेद तिने कधी सोडली नाही. नेहमी नेहमी हसत खेळत जीवन जगले पाहिजे हे तिने कृतीतून दाखवून दिले.
ती नेहमी म्हणते जे होणार आहे ते तर होणारच आहे म्हणून आपण जगणं सोडायचं नसतं. त्यातून त्यातून मार्ग काढून पुढे पाऊल टाकत आनंदी जगायचं असतं. अपयशालाही जिद्दीने सामोरं जायचं.
कौतुकास्पद! परिस्थिती बेताची; आदिवासी पाड्यातील लेक झाली 'एअर होस्टेस', आई-वडिलांच्या कष्टाचं चीज
मला आठवतं, कोरोनाकाळात माझ्या मिस्टरांची तब्येत फार खालावली होती. डॉक्टरही फार आशा दाखवत नव्हते. त्यावेळी माझ्या ताईने मला सर्वतोपरी मदत केली. हिंमत दिली. काही होणार नाही, हिंमत हरु नकोस हे तिचे शब्द माझ्यासाठी वरदान आणि औषधासारखे करायचे.त्यातून मी सावरले, संकटातून आम्ही बाहेर आलो.
माझ्या जीवनातल्या प्रत्येक अडचणीत ती माझ्यासोबत उभी राहिली. माझ्यासाठी ती आयुष्यभराचीच सुपरसखी आहे. प्रेमानं ती कायम सोबत असते, ताकद देते.