Lokmat Sakhi >Inspirational > पायात धड शूजही नव्हते, आईनं शिलाईकाम करुन जगवलं लेकीला, झाशीची राणी, शैलीची कहाणी

पायात धड शूजही नव्हते, आईनं शिलाईकाम करुन जगवलं लेकीला, झाशीची राणी, शैलीची कहाणी

World Athletics U20 Championships : शैली सिंहचा हा प्रवास खूपच संघर्षमय होता. सध्याच्या तरूण मुलांसाठी शैलीची कहाणी प्रेरणादायक आहे. १७ वर्षांच्या शैलीनं कुटुंबातील समस्यांवर मात करत देशाचे नाव उज्ज्वल केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 01:58 PM2021-08-23T13:58:37+5:302021-08-23T14:41:36+5:30

World Athletics U20 Championships : शैली सिंहचा हा प्रवास खूपच संघर्षमय होता. सध्याच्या तरूण मुलांसाठी शैलीची कहाणी प्रेरणादायक आहे. १७ वर्षांच्या शैलीनं कुटुंबातील समस्यांवर मात करत देशाचे नाव उज्ज्वल केलं आहे.

World Athletics U20 Championships : Long jumper Shaili Singh settles for silver in U20 World Athletics Championships | पायात धड शूजही नव्हते, आईनं शिलाईकाम करुन जगवलं लेकीला, झाशीची राणी, शैलीची कहाणी

पायात धड शूजही नव्हते, आईनं शिलाईकाम करुन जगवलं लेकीला, झाशीची राणी, शैलीची कहाणी

Highlightsशैली उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील रहिवासी आहे. शैलीची आई वनीता सिंह सिंगल मदर असून त्यांनी शैलीसह  २ मुलींना एकटीनं वाढवलं.

नीरज चोप्रानं गोल्ड मेडल जिंकून टोकिओ ओलिम्पिक्समध्ये भारताचे यशस्वी अभियान संपवले. त्यानंतर देशातील इतर एथलीट्सनं आपलं वेगळेपण सिद्ध केलं. नैरोबी येथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शैली सिंहने लांब उडीत रौप्यपदक पटकावले आहे. केवळ एका सेंटिमीटरच्या फरकामुळे शैली सिंहचे सुवर्णपदक हुकले आहे. (shaili singh wins silver medal in long jump in world athletics u20 championships) शैली सिंहचा हा प्रवास खूपच संघर्षमय होता. सध्याच्या तरूण मुलांसाठी शैलीची कहाणी प्रेरणादायक आहे. १७ वर्षांच्या शैलीनं कुटुंबातील समस्यांवर मात करत देशाचे नाव उज्ज्वल केलं आहे.

३ मुलींचं पालनपोषण केलं

शैली उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील रहिवासी आहे. शैलीची आई वनीता सिंह सिंगल मदर असून त्यांनी शैलीसह  २ मुलींना एकटीनं वाढवलं. वनिता शिलाईचं काम करून घर चालवत असल्यानं आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. लहानपणी शैलीकडे वैयक्तिक वस्तू, सोयी सुविधांचा अभाव असल्यानं चांगले स्पोर्टस शूजही नव्हते. 

रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांनी टॅलेंट ओळखलं

जेव्हा शैली 14 वर्षांची होती, तेव्हा तिला राष्ट्रीय स्पर्धेतील भारताची स्टार लाँग जम्पर, अंजू बॉबी जॉर्जचा पती रॉबर्ट बॉबी जॉर्जने पाहिले. अंजूला स्वतः रॉबर्टने प्रशिक्षित केले होते, त्यामुळे त्याला कळले की 'झाशीच्या या नवीन राणीमध्ये काहीतरी खास आहे. त्यांनी शैलीला बेंगलोरमध्ये अंजू बॉबी जॉर्ज अॅकेडमीच्या प्रशिक्षणासाठी बोलावले.

सुरुवातीला शैलीच्या आईला हे मान्य नव्हते. पण रॉबर्टने तिला समजावून सांगितले की तिची मुलगी चॅम्पियन अॅथलीट बनू शकते. शैलीने जुनिअर स्तरावर अनेक वेळा राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. 18 वर्षांखालील गटात ती जागतिक क्रमवारीत लाॅन्ग जम्पर आहे. अंजू बॉबी जॉर्जला विश्वास आहे की शैली येत्या काही दिवसांत तिचा विक्रम मोडून देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकेल.

वेग हेच शैलीचे बळ आहे

रॉबर्ट बॉबी जॉर्ज म्हणतात की, ''लांब उडीमध्ये वेग आणि ताकद खूप महत्त्वाची असते. शैलीला प्रचंड वेग आहे. जस जशी ती मोठी होत जाईल तसतशी तिची ताकद, कार्यक्षमताही वाढेल आणि ती आणखी उंची गाठू शकेल. मात्र, यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागेल.''

Web Title: World Athletics U20 Championships : Long jumper Shaili Singh settles for silver in U20 World Athletics Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.