Join us  

World Radio ‌Day: भारतीय रेडिओवरच्या पहिल्या न्यूज रिडर सईदा बानो कोण होत्या? रेडिओवर नोकरीसाठीही केला संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2023 3:32 PM

World Radio ‌Day: ऑल इंडिया रेडिओची सुरुवात १९३६ साली झाली. २० वर्षांनंतर देशाला पहिली महिला रेडिओ न्यूज रीडर मिळाली, महिलांना त्यासाठीही करावा लागला संघर्ष

एकेकाळी रेडिओ हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग बनला होता. माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता. दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. १३ फेब्रुवारी १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले होते. त्यामुळे हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतात स्वातंत्र्याच्या लढाईत रेडिओने महत्वाची भूमिका सांभाळली. भारतात १९३६ साली ऑल इंडिया रेडिओची स्थापना झाली. दरम्यान, १९४७ साली भारताला पहिली महिला न्युज रीडर मिळाली. ज्याचं नाव सईदा बानो होते. रेडिओ हे माहिती पसरविण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. यातून सईदा यांनी आपल्या आवाजातून लोकांपर्यंत जागरूकता पसरवली.

कोण होत्या सईदा बानो?

सईदा बानो या भारतातील पहिल्या महिला न्युज रीडर ठरल्या. त्यांचा जन्म मध्य प्रदेशच्या भोपाल येथे झाला. आपल्या आवाजाच्या जोरावर रेडिओ जगतातील त्या एक प्रसिद्ध चेहरा बनल्या. आजही सईदा बानो यांचे नाव उर्दू-प्रसारणविश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणून नावाजले जाते. सईदा लहानपणापासूनच क्रिडा विश्वात हुशार होत्या. त्यांनी शालेय जीवनात अनेक पुरस्कार जिंकले. त्यांनी मॅट्रिक शिक्षण इसाबेला थॉबर्न कॉलेजमधून पूर्ण केले, जे त्या काळातील प्रसिद्ध कॉलेजांपैकी एक होते.

सईदा बानू यांचे वैयक्तिक आयुष्य

१४ नोव्हेंबर १९३२ रोजी सईदा यांचा विवाह न्यायमूर्ती अब्बास रझा यांच्यासोबत पार पडले. ते या लग्नापासून खुश न्हवते. कारण त्यांना पुढचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यांनी यासंदर्भात आपल्या वडिलांना पत्र देखील लिहिले होते. मात्र, प्रयत्न करून देखील त्यांचे लग्न मोडले नाही, ते यशस्वी पार पडले.

कालांतराने नाते तुटले

सईदा आणि अब्बास यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी यासह मुलांचे संगोपन करण्यासाठी दिल्ली गाठावे लागले.

दिल्लीत मिळाली नौकरी

सईदा जेव्हा दिल्लीला गेल्या तेव्हा त्यांच्याकडे काहीच काम नव्हते. अशावेळी त्यांची मैत्रीण त्यांच्या मदतीला धावून आली. पॉलिटिशियन विजयालक्ष्मी पंडित या सईदा यांच्या जवळच्या मैत्रीण होत्या. त्यांच्या सांगण्यावरून सईदा यांना आकाशवाणीत नौकरी मिळाली. अशा प्रकारे सईदा ऑल इंडिया रेडिओत भरती झाल्या, त्यांना भारताची पहिल्या महिला पब्लिक न्युज ब्रॉडकास्टर म्हणून ओळख मिळाली.

सईदा यांच्या आवाजाचे खूप कौतुक झाले. त्यांचे रेडिओवरील काम आजही अनेक लोकांच्या स्मरणात आहे. दिल्लीतील त्यांचे जीवन संघर्षमय होते. सर्व चढ-उतार असतानाही त्यांनी देशभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

टॅग्स :महिलाप्रेरणादायक गोष्टी