Join us  

रिकाम्या कामातच सगळा वेळ जातोय? '२५- ५' चा फॉर्म्युला फॉलो करा, महत्त्वाची कामं पटापट उरका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 3:20 PM

कितीही लवकर कामाला सुरूवात केली, तरी कामं पटापट संपतच नाहीत. रिकाम्या कामात सगळा वेळ निघून जातो आणि मग महत्त्वाचे काम नेमके तसेच राहते, असा अनुभव प्रत्येकानेच कधी ना कधी घेतला आहे. म्हणूनच तर रिकाम्या कामात वेळ जाऊ नये, म्हणून २५- ५ चा सुपरहीट फॉर्म्युला नक्कीच जाणून घ्या.

ठळक मुद्देअभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही '२५- ५' चा फॉर्म्युला परफेक्ट ठरू शकतो. अभ्यासाला बसल्यावर अनेक विद्यार्थी त्यांनी कोणता अभ्यास केला पाहिजे, यापेक्षा त्यांना कोणता अभ्यास करायला आवडते, याला प्राधान्य देतात. यामुळे मग महत्त्वाचे विषय बाजूला राह

घर असो किंवा ऑफिस बायकांना कामासाठी वेळ पुरतच नाही. घरातली कामे संपविता संपविता तर गृहिणींच्या नाकीनऊ येतात. तरीही अख्खा दिवस राबूनही बरीच कामे करायची राहूनच गेलेली असतात. असे होण्याचे सगळ्यात मुख्य कारण हे असते, की दिवसभराचा सगळा वेळ रिकामी कामे करण्यातच गेलेला असतो. अनेक जणींच्या बाबतीत ऑफिसमधल्या कामाचीही हीच गत असते. पेंडींग कामांची यादी दर दिवशी नव्याने तयार होत जाते आणि मग डेडलाईन जवळ येताच कामांचा प्रचंड उपसा करण्याची वेळ येते. असे होऊ नये म्हणून लेखक जस्टीन बॅरिसो यांनी सांगितलेला '२५- ५' चा फॉर्म्युला एकदा ट्राय करून पहा आणि रिकाम्या कामात वेळ न दवडता झटपट कामे उरका.

 

याविषयी सांगताना जस्टीन बॅरिसो म्हणतात, की आवडीचे काम करण्याला प्राधान्य देणे आणि अवघड कामे करण्यासाठी चालढकल करणे हा मानवी गुण आहे. यामुळे रिकामी किंवा तेवढी निकडीची नसणारी कामे आपल्या आवडीची असतात आणि ती आपण झटपट उरकून टाकतो. महत्त्वाची कामे मात्र नंतर करू, असे म्हणत उगाच लांबणीवर टाकतो आणि वेळ वाया घालताे. त्यामुळे आपल्याला काय करणे गरजेचे आहे, कोणत्या गोष्टी आपल्यासाठी अतिमहत्त्वाच्या आहेत, हे आपल्याला ठरविता आले पाहिजे. 

 

काय आहे '२५- ५' चा फॉर्म्युलासगळ्यात आधी तर जी कामे तुम्हाला दिवसभरात करायची आहेत, अशा २५ कामांची यादी तयार करा. या २५ कामांपैकी जी कामे अत्यंत महत्त्वाची आणि लवकरात लवकर पुर्ण करण्याची गरज आहे, अशा ५ कामांना बाजूला काढा. आता या ५ कामांवर तुमचे पुर्ण लक्ष केंद्रित करा आणि जोपर्यंत ही ५ कामे पुर्ण होणार नाहीत, तोपर्यंत यादीतील ६ व्या कामाकडे वळायचे नाही, असा स्वत:शीच निश्चय करा. 

 

घर आणि ऑफिस या दोन्ही ठिकाणची महत्त्वाची कामे झटपट उरकण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे काम करण्याची शिस्त तर लागतेच, पण रिकाम्या कामातही वेळ अजिबात वाया जात नाही. म्हणूनच 'स्मार्ट वूमन' बनण्यासाठी '२५- ५' चा फॉर्म्युला एकदा ट्राय करून बघायलाच हवा.. 

टॅग्स :मानसिक आरोग्यमहिला