Lokmat Sakhi >Mental Health > खूप झोप झाली तरी सकाळी फ्रेश वाटत नाही? ३ सोपे उपाय - राहाल दिवसभर फ्रेश...

खूप झोप झाली तरी सकाळी फ्रेश वाटत नाही? ३ सोपे उपाय - राहाल दिवसभर फ्रेश...

3 Things to Get Up Early and Fresh in The Morning : सकाळी उठल्या उठल्या मस्त फ्रेश वाटावं यासाठी काही सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 04:27 PM2022-10-14T16:27:28+5:302022-10-14T16:30:46+5:30

3 Things to Get Up Early and Fresh in The Morning : सकाळी उठल्या उठल्या मस्त फ्रेश वाटावं यासाठी काही सोपे उपाय

3 Things to Get Up Early and Fresh in The Morning : Do you not feel fresh in the morning even after sleeping a lot? 3 Easy Solutions - Stay Fresh All Day... | खूप झोप झाली तरी सकाळी फ्रेश वाटत नाही? ३ सोपे उपाय - राहाल दिवसभर फ्रेश...

खूप झोप झाली तरी सकाळी फ्रेश वाटत नाही? ३ सोपे उपाय - राहाल दिवसभर फ्रेश...

Highlightsसकाळी उठल्यावर फ्रेश वाटायचे असेल तर रात्री वेळेत झोपणे आणि किमान ७ ते ८ तास झोप पूर्ण होणे आवश्यक आहे. विकेंडलाही रोजच्याप्रमाणे वेळेत उठलो तर शरीराला तशी सवय लागेल आणि रोज सकाळी उठण्याचे काम सोपे होईल.

अनेकदा आपल्याला सकाळी बेडमधून उठावेसेच वाटत नाही. कधी थकवा असल्याने तर कधी आळस आल्याने बेडमधून बाहेर यावेसेच वाटत नाही. समोर कांमांचा डोंगर असतो, सगळं आवरुन ऑफीस गाठायची घाई असते, मात्र मन मात्र गादीतून बाहेर पडण्यासाठी तयार नसते. अशावेळी आपण कसेतरी करुन उठतो आणि तोंडावर पाणी मारुन, कडक चहा घेऊन डोळ्यावरची झोप घालवण्याचा प्रयत्न करतो. पण असे करावे लागू नये आणि सकाळी उठल्या उठल्या मस्त फ्रेश वाटावं यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत. जेणेकरुन सकाळ फ्रेश झाली तर आपला सगळा दिवस तर छान जाईलच पण कामंही झटपट होण्यास मदत होईल. पाहूयात यासाठी काय करायला हवं (3 Things to Get Up Early and Fresh in The Morning)...

१. उठल्या उठल्या पाणी प्या

रात्रभर श्वासोच्छवास वेगाने झाल्याने आपले शरीर काही प्रमाणात डीहायड्रेट झालेले असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ग्लासभर पाणी प्या. त्यामुळे आळस निघून जाऊन तुम्ही नकळत फ्रेश व्हाल. अनेकदा तज्ज्ञ सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचाही सल्ला देतात. त्यामुळेही पोट साफ होऊन फ्रेश वाटण्यास मदत होते. 

२. विकेंडलाही वेळेतच उठा

अनेकदा आपण आठवड्याच्या दिवसांत सकाळी वेळेत उठतो. पण विकेंडला आपण निवांत असल्याने जास्त वेळ झोपून राहतो. एखादी गोष्ट नियमितपणे केल्यास ती कायम करणे शक्य होते. पण त्यात सातत्य नसेल तर ती गोष्ट काहीशी अवघड होते. त्यामुळे विकेंडलाही रोजच्याप्रमाणे वेळेत उठलो तर शरीराला तशी सवय लागेल आणि रोज सकाळी उठण्याचे काम सोपे होईल.

(Image : Google)
(Image : Google)

३. पुरेशी झोप 

सकाळी वेळेत जाग येऊन फ्रेश वाटावे यासाठी पुरेशी झोप होणे आवश्यक असते. त्यामुळे रात्री विनाकारण जागरण न करता पुरेशी झोप घेतल्यास शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर फ्रेश वाटायचे असेल तर रात्री वेळेत झोपणे आणि किमान ७ ते ८ तास झोप पूर्ण होणे आवश्यक आहे. 


 

Web Title: 3 Things to Get Up Early and Fresh in The Morning : Do you not feel fresh in the morning even after sleeping a lot? 3 Easy Solutions - Stay Fresh All Day...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.