आयुष्याच्या लढाईमध्ये चढ - उतार होतो. प्रत्येक टप्प्यामध्ये साथीदार सोबत असेलच असे नाही. एकट्याने आयुष्यात लढता आलं पाहिजे. ते म्हणतात ना, ''डर के आगे जीत है''. पण काहींना स्वतःचे मत, काम किंवा नवीन काहीतरी सुरुवात करताना साहजिक भीती वाटते.
थोडक्यात आयुष्यातील कोणतीही महत्वाची गोष्ट करायची असेल, तेव्हा घाम फुटतो आणि हृदयाचे ठोकेही जलद होतात. ही सर्व स्ट्रेस अर्थात तणावाची लक्षणे आहेत. तणाव ही शरीरातील अशी प्रतिक्रिया आहे, जी शारीरिक तसेच भावनिक आरोग्यावर थेट परिणाम करते. तणावामुळे मानसिक आजार तर होतातच पण हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका वाढतो.
नुकतंच बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यूही हृदयविकाराच्या झटक्याने झाला. सध्या लोकांमध्ये हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढत चाललं आहे. तणाव हा एकच प्रकारचा नसून, तीन प्रकारचे आहेत(3 Types of Stress and Health Hazards).
स्ट्रेस म्हणजे काय?
दैनंदिन आयुष्यात आपण अनेक अडचणींचा सामना करीत असतो. अडचणींवर मात करण्यासाठी आपली शारीरिक व मानसिक शक्ती जाते. टेन्शन आल्यानंतर एड्रेनालाईन हे द्रव्य आपल्या शरीरामध्ये वेगाने पसरु लागते. ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढू लागते. मानसिक-शारीरिक बदल जाणवायला लागतो. खूप घाम येतो, अंगावर काटा येतो किंवा प्रचंड भीती वाटते. या परिस्थितीत स्ट्रेस वाढते. तणावाचे तीन प्रकार आहेत. ॲक्युट, एपिसोडिक ॲक्युट आणि क्रॉनिक स्ट्रेस.
अतिशय देखण्या आणि फिट अभिनेत्री पाहा रोज ब्रेकफास्ट काय करतात? कोणते पदार्थ खातात..
ॲक्युट स्ट्रेस
ॲक्युट स्ट्रेस डिसऑर्डर ही मानसिक आरोग्य स्थिती आहे, जी एखाद्या वेदनादायक घटनेनंतर उद्भवते. ही समस्या घटनेच्या 3 मिनिटांनंतर सुरु होते व ३० दिवसांपर्यंत टिकून राहते. यूएस डिपार्टमेंट ऑफ वेटरन्स अफेयर्सच्या मते, जवळजवळ ३३ टक्के लोकांमध्ये ही समस्या दिसून येते. ज्यात धक्कादायक घटनेनंतर लोकांमध्ये ॲक्युट स्ट्रेस डिसऑर्डरची लक्षणे दिसून येतात. ॲक्युट स्ट्रेस डिसऑर्डरच्या लक्षणांवर वेळेवर उपचार न केल्यास, तो पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डचे रूप घेते.
एपिसोडिक ॲक्युट स्ट्रेस
एपिसोडिक तीव्र ताण तेव्हा होतो, जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार तीव्र तणाव अनुभवते. आपल्याला एपिसोडिक तीव्र ताण असल्यास, तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्ही सतत दडपणाखाली जगत आहात. किंवा तुमच्यासोबत नेहमी चुकीच्या गोष्टी घडत आहेत. ही समस्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करते.
'तो' प्रियकर आहे की भूत? गायब होतो, कॉल आणि मेसेजला रिप्लाय करत नाही? मुद्दाम करतो की..
क्रॉनिक स्ट्रेस
जेव्हा व्यक्ती तणावाखाली असते, तेव्हा कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईन नावाची हार्मोन्स शरीरात पसरते. हे संप्रेरक हृदय किंवा श्वासोच्छवासाची गती वाढवते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही काळासाठी जास्त ताण येतो, तेव्हा त्याला क्रॉनिक स्ट्रेस म्हणतात. दीर्घकाळ तणावामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. यामुळे नैराश्य, रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.