Join us  

करा फक्त ३ गोष्टी, अलार्म न लावताही रोज सकाळी येईल लवकर जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 5:04 PM

3 Ways to Wake up Early Without an Alarm : रात्री वेळेत झोपलं तर सकाळी झोप पूर्ण होऊन जाग येते, त्यासाठी काही सोप्या टिप्स...

ठळक मुद्देवेळेत झोप लागली की सकाळी वेळेत जाग येण्यासाठी अलार्मची आवश्यकता भासणार नाही. काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास जीवनशैली सोपी होऊ शकेल...

सकाळी झोपेतून उठणे ही अनेकांसाठी एक आव्हानात्मक गोष्ट असते. पहाटेची साखरझोप आणि त्यानंतर येणारी गाढ झोप अनेकांना प्रिय असते. पण त्यातच अलार्म वाजला की आपला सगळा मूड जातो आणि आपण कसेबसे वैतागत उठतो. अलार्म न लावता जाग येणं ही तर अनेकांसाठी अतिशय अवघड गोष्ट असते. रात्री उशीरा झोपणे, विविध गोष्टींचे ताण, आरोग्याच्या तक्रारी, मोबाइलचे व्यसन यांमुळे रात्री लवकर झोप लागली नाही की सकाळी काही केल्या जाग येत नाही. मात्र असे झाले की आपली खूप चिडचिड होते कारण दिवसाची पुढची सगळी कामे लांबत जातात. घरातली कामे, ऑफीस, मिटींग्ज त्यात लागणारी ट्रॅफीक आणि इतर अनेक गोष्टींचे नियोजन बिघडते. म्हणूनच आपल्यालाही अलार्मशिवाय जाग यावी असं तुम्हाला वाटत असेल तर ३ गोष्टी आवर्जून करायला हव्यात. पाहूया या ३ गोष्टी कोणत्या (3 Ways to Wake up Early Without an Alarm)...

(Image : Google)

१. टेक्नॉलॉजीपासून दूर राहा

सध्य़ा आपली असंख्य कामे ही टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्या हातात सतत मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट असे काही ना काही असतेच. या गोष्टींच्या वापराचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर विपरीत परीणाम होत असतो. मात्र आपण तंत्रज्ञानाच्या इतके आहारी जातो की आपल्याला कित्येक गोष्टी लक्षातही येत नाहीत. अनेकदा या उपकरणांमुळे आपली झोप उडते आणि मग आपल्याला सकाळी झोप आवरता आवरत नाही. मात्र रात्री टेक्नॉलॉजीपासून दूर राहिल्यास आपली झोप चांगली होते आणि आपल्याला सकाळी नकळत वेळेत जाग येते. 

२. रात्री हलका आहार घ्या 

सकाळचा आहार जास्त असला तरी चालतो मात्र रात्री झोपताना हलका आहार घ्यायला हवा. रात्री हलका आहार घेतला आणि लवकर खाल्ले तर अन्न लवकर पचते आणि शांत, गाढ झोप लागायला त्याची चांगली मदत होते. तसेच हलके खाल्ल्यामुळे अॅसिडीटी किंवा अपचन यांसारखे त्रास दूर राहण्यास मदत होईल. हलका आहार घेतला तर शरीर तो लवकर पचवते आणि शरीराला ताण येत नाही. त्यामुळे नकळत आपण वेळेत उठण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. मेडीटेशन 

मेडीटेशनसाठी ४-७-८ ही पद्धत आवर्जून वापरा. रात्री झोपताना या पद्धतीने मेडीटेशन केल्यास लवकर झोप येईल आणि त्याचा मन शांत होण्यासही चांगला फायदा होईल. ४ सेकंद दिर्घ श्वास घ्या. ७ सेकंद श्वास रोखून धरा आणि ८ आकड्यात श्वास सोडा. हेच पुन्हा पुन्हा करा. यामुळे मन, शरीर, मेंदू सगळे शांत होईल आणि लवकर गाढ झोप लागेल. वेळेत झोप लागली की सकाळी वेळेत जाग येण्यासाठी अलार्मची आवश्यकता भासणार नाही. 

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्य