Lokmat Sakhi >Mental Health > स्ट्रेस इतका की मेंदू थकला, जीव नको झाला? ५ उपाय, स्ट्रेस चटकन कमी होईल- वाटेल रिलॅक्स...

स्ट्रेस इतका की मेंदू थकला, जीव नको झाला? ५ उपाय, स्ट्रेस चटकन कमी होईल- वाटेल रिलॅक्स...

5 Simple Ways To Relieve Stress : स्ट्रेस तर येतोच, रोजच्या जगण्यात धावपळही फार पण काही सोपे उपाय आपल्याला स्ट्रेस फ्री करु शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2023 10:30 PM2023-07-05T22:30:38+5:302023-07-05T22:50:28+5:30

5 Simple Ways To Relieve Stress : स्ट्रेस तर येतोच, रोजच्या जगण्यात धावपळही फार पण काही सोपे उपाय आपल्याला स्ट्रेस फ्री करु शकतात

5 Simple Ways To Reduce Stress in 10 Minutes and Improve Your Well-Being | स्ट्रेस इतका की मेंदू थकला, जीव नको झाला? ५ उपाय, स्ट्रेस चटकन कमी होईल- वाटेल रिलॅक्स...

स्ट्रेस इतका की मेंदू थकला, जीव नको झाला? ५ उपाय, स्ट्रेस चटकन कमी होईल- वाटेल रिलॅक्स...

'मन चिंती ते वैरी न चिंती' ही म्हण आपल्याकडे खूपच लोकप्रिय आहे. आपले शत्रू जितका आपला वाईट विचार करणार नाहीत तितके वाईट विचार आपले मन काहीवेळा करते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आरोग्य समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. खरंतर पूर्वी जगण्यासाठी लागणाऱ्या सुख-सुविधा कमी होत्या मात्र तरीही जीवन सुखी आणि समाधानी होते. आताच्या आधुनिक जगात सोयी-सुविधा भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही जीवनातील शांतता कमी झाली आहे. जगाच्या वेगाने धावताना कामाचा ताण, टारगेट पूर्ण करण्याचं टेंशन, ब्रेकअपचं दुःख, मुलांच्या भविष्याची चिंता, आर्थिक नियोजनाची काळजी अशा अनेक गोष्टींचा ताण आपल्यावर येऊ लागला आहे. त्यामुळे ताण-तणाव निर्माण करणाऱ्यासाठी अगदी एखादी छोटीशी गोष्टही कारणीभूत ठरू शकते. शिवाय प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या निराळी असल्यामुळे दुःख, चिंता, काळजीची कारणंही निरनिराळी असू शकतात.

मनावरील कोणत्याही प्रकारचा ताण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारकच असतो. रोजच्या जीवनातील येणाऱ्या अडचणींमुळे लोक अनेक समस्यांशी झुंज देत आहेत. या काळात तणाव देखील सामान्य आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन जमलं तर ताणामुळे निर्माण झालेले शारीरिक आणि मानसिक आजार बरे होण्यास मदत होते. तणावाचे व्यवस्थापन हा आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. ताण व्यवस्थापन हे एक आवश्यक जीवनकौशल्य असून, छोट्या छोट्या गोष्टी केल्यास सहज जमू शकतं. मनावरील ताण कमी करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात(5 Simple Ways To Reduce Stress in 10 Minutes and Improve Your Well-Being).

ताण कमी करण्यासाठी नेमके उपाय काय आहेत ? 

१. मित्र - मैत्रिणी कुटुंबासोबत वेळ घालवा :- कामाचा ताण प्रत्येकाला असतोच. मात्र शक्य असेल तर घरी आल्यावर ऑफिसच्या कामाचा किंवा इतर विचार करू नये. शिवाय सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालविल्यामुळे आपल्या कामाच्या ताणापासून आपण दूर राहू शकतो. आजकाल सर्वजण घरी आणि घराबाहेर मोबाईल आणि इतर गॅझेट्समध्ये गुंतलेली दिसतात. डिजिटल माध्यमांमुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूरावले जातो. त्यामुळे दिवसभरातील काही तास हे फक्त घरच्यांसाठी राखून ठेवा. गप्पा-टप्पा आणि सुख-दुःख घरच्यांसोबत शेअर केल्यामुळे आपला मानसिक ताण नक्कीच कमी होऊ शकतो.

पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ?

२. नियमित मेडीटेशन करा :- रोज न चुकता मेडीटेशन करण्याचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. योगासन आणि ध्यानधारणेमुळे आपल्याला मानसिक शांती मिळते. यासाठी रोज सकाळी नियमित मेडीटेशनचा सराव करावा. हळुहळु सरावाने आपले मन शांत आणि निरोगी होईल. जर आपल्याला मानसिक ताणापासून दूर राहायचे असेल तर नियमित मेडीटेशन करावे.

सकाळी उठल्या उठल्या करा ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी-तब्येत एकदम फिट...

३. नकारात्मक विचार करणे टाळावे :- आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असलं तरीही आपण त्याचा विचार करणं टाळावे. सतत नकारात्मक गोष्टींचा विचार केल्यास मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकारात्मक विचार आचरणात आणावेत. 

४. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा :- आपण ज्या कामात कुशल आहात त्याच्या मदतीने आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याकडे  लिहिण्याची कला असेल तर आपल्या भावना लिहा किंवा चित्रकला करा. याचबरोबर आपल्याला जर कोणता छंद असेल तर तो मनापासून जोपासण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आवडीच्या छंदासाठी दिवसातून किंवा आठवड्यातून थोडा वेळ काढावा यामुळे मनावरील ताण कमी होऊन आपण रिफ्रेश होतो.  

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

५. आवडीचं संगीत ऐका :- शांत म्युझिक किंवा आवडीची गाणी ऐकल्यामुळे आपल्या मनावरचा ताण कमी होऊ शकतो. यासाठी सकाळी उठल्या उठल्या किंवा संध्याकाळी आपल्या आवडीची गाणी ऐका. संगीत क्लासिकल, बॉलीवूड अथवा वेस्टर्न असलं तरी चालेल फक्त ते आपल्या आवडीचंं असेल याची काळजी घ्या. डोळे बंद करून थोडावेळ गाणी ऐका, यामुळे आपले मानसिक प्रेशर किंवा ताण अवश्य कमी होईल.

Web Title: 5 Simple Ways To Reduce Stress in 10 Minutes and Improve Your Well-Being

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.