कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला टोचून बोललं तर आपल्याला साहजिकच राग येतो. मग आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोलतो, मग भांडणं-वाद होतात आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त खराब होते. मग हा राग मनात राहील्याने पुढचा बराच काळ आपला त्रागा आणि चिडचिड होत राहते. काही वेळा आपले लोकांशी पटत नाही, यामध्ये अगदी आपल्या जोडीदारापासून ते कुटुंबातील इतर मंडळी, मित्रमैत्रीणी, ऑफीसमधील सहकारी अशा अनेकांचा समावेश असतो. लोकांचे वागणे खटकले की आपल्याला त्याचा त्रास होत राहतो. हा त्रास मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्वरुपाचा असतो (5 Small Changes That Can Bring Big Difference In Your Life).
पण अशाप्रकारे स्वत:ला त्रास करुन घेण्यापेक्षा आपल्या वागण्यात काही लहान बदल केल्यास त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. यामुळे नकळत आपली चिडचिड तर कमी होईलच पण समोरच्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला आधीइतका त्रास होणार नाही. त्यामुळे आपले आयुष्य जास्त सुखकर होईल. अलिना रेज यासाठीच इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून काही सोप्या टिप्स शेअर करते, त्या कोणत्या पाहूया...
१. कोणाचा राग आला किंवा चिडचिड झाली तर पेशन्स लूज न करता किंवा स्वत:वरचा कंट्रोल न घालवता सायकॅस्ट्रीकली रिप्लाय देणे केव्हाही चांगले. त्यामुळे जो व्यक्ती तुमच्याशी चुकीचं वागला आहे त्याला आपण केलेली गोष्टीचा काहीच उपयोग झाला नाही हे कळेल आणि तुम्हालाही त्याचा त्रास होणार नाही.
२. स्वत:साठी नकारात्मक शब्द वापरणे बंद करा. माझा आत्मविश्वास चांगला नाही, मी आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करु शकत नाही अशाप्रकारचे शब्द, वाक्य बोलणं टाळा. यामुळे नकळत आपण सकारात्मक होण्यास निश्चितच मदत होईल.
३. पोटभर खाणे शक्यतो टाळा. नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असे काहीही घेत असाल तरी पोटात थोडीशी जागा आवर्जून शिल्लक ठेवा. यामुळे कदाचित तुमचा मूड, तब्येत चांगली राहण्यास मदत होईल आणि त्याचा तुमच्या मानसिकतेवरही चांगला परीणाम होऊ शकतो.
४. कोणत्याही गोष्टीवर प्रमाणापेक्षा जास्त प्रतिक्रिया देणे बंद करा. प्रत्येकवेळी, प्रत्येक गोष्टीसाठी आपण लढलेच पाहिजे असे काही नाही. आपल्या आयुष्यात दिवसाला असंख्य गोष्टी घडत असतात. त्यातील काही गोष्टी आपण गांभिर्याने घ्यायला हव्यात मात्र काही गोष्टींकडे आवर्जून दुर्लक्ष करायला हवे. त्यामुळे आपले आयुष्य सुकर होण्यास मदत होते.
५. दिवसभरात किमान काही वेळासाठी रिलॅक्स व्हा. आयुष्य हे दिवसांचे बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यही चांगले नसेल. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करत राहा.