आजूबाजूच्या अनेक गोष्टींमुळे मनात चिंता दाटून येते , घाबरणं, त्यामुळे अस्वस्थ होणं, अस्वस्थ होऊन घाम येणं, हदयाची धडधड वाढणं आणि निराश होणं या गोष्टी घडणं स्वाभाविक आहे. पूर्वीच्या तुलनेत हे जास्त लोकांच्या बाबतीत नेहमी घडतं आहे. याला कारण आपली बदललेली जीवनशैली आहे असं मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात. व्यायाम, संतुलित आहार केवळ शारीरिक आरोग्यासाठीच महत्त्वाचा नसतो तर मानसिक आरोग्यासाठीही हे फायदेशीर असतं.
Image: Google
प्रसिध्द पोषण तज्ज्ञ लवनीत बात्रा यांनी चिंता रोग, त्यामुळे जाणवणारी लक्षणं योग्य आहाराद्वारे कशी कमी करता येईल याबाबत आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन मार्गदर्शन केलं आहे. लवनीत म्हणतात की, चिंता रोग खूप व्यापक स्तरावर पसरला आहे. जगभरातील कोट्यावधी लोकं चिंता रोगाने ग्रस्त आहेत. काही लोकांच्या मनात थोडा चिंतेचे ढग दाटून येतात आणि मग निघून जातात. तर काही सतत कसल्यातरी चिंतेने वेढलेले असतात. त्यांना औषधोपचाराची गरज असते. गंभीर स्वरुपाचा चिंता रोग बरा करण्यासाठी औषधं मदत करतातच; पण लवनीत म्हणतात की आपल्या आहारातील पोषक घटक हे देखील चिंता रोगावर मात करण्यासाठी मदत करतात. आहारातील घटक मेंदूचं कार्य नीट होण्यासाठी, चिंता रोगानं जाणवणारी लक्षणं कमी करण्यासाठी मदत करतात. कारण आहारातील विशिष्ट पोषक गोष्टींमधे मेंदूला बळ देणारे घटक असतात.
Image: Google
चिंता रोग कमी करणारे पदार्थ आणि घटक
पोषण तज्ज्ञ लवनीत बात्रा यांनी मेंदूचं कार्य सुधारुन चिंता रोग बरा करण्यास मदत करणारे आहार घटक कोणते याची यादी दिली आहे.
1. ओमेगा 3 - ओमेगा 3 हा घटक शरीरातील दाह, सूज आणि चिंता रोगाची लक्ष्णं घालवण्यास उपयुक्त ठरतो. घरातलं साजूक तूप शरीराला ओमेगा 3 हा घटक पुरवण्यास पुरे आहे. शरीराची ओमेगा 3 ची गरज भागवण्यासाठी 1 छोटा चमचा साजूक तूप रोजच्या आहारात घ्यावं असं लवनीत सांगतात.
2. ट्रायप्टोफन: घरी विरजलेल्या दह्यात ट्रायप्टोफन हा घटक असतो. दह्यात पचनास मदत करणारे विकर असतात. त्यालाच मैत्र जिवाणू असं म्हणतात. जे आपल्या आतड्यात निर्माण होतात. आतड्यातले हे जिवाणू घातक आजारांशी लढतात. त्यामुळे रोजच्या आहारात ताजं , घरी विरजलेलं दही खाल्ल्यास आतड्यांचं आरोग्य सुधारतं. यामुळे मनातील चिंता आणि ताण कमी होतो.
Image: Google
3. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम: केळ आणि डांगराच्या बियांमधे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजं मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील इलेक्ट्रोलाइट समतोल साधण्यास मदत करतात. हा समतोल शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास आवश्यक असतो. तसेच केळ आणि डांगराच्या बिया खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रित राहातो. हे पदार्थ अशा प्रकारे ताण आणि चिंता रोगानं जाणवणारी लक्षणं कमी करतात.
https://www.instagram.com/reel/CUXjo5NgNyk/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="14" style=" background:#FFF; border:0; border-radius:3px; box-shadow:0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width:540px; min-width:326px; padding:0; width:99.375%; width:-webkit-calc(100% - 2px); width:calc(100% - 2px);">https://www.instagram.com/reel/CUXjo5NgNyk/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" style=" background:#FFFFFF; line-height:0; padding:0 0; text-align:center; text-decoration:none; width:100%;" target="_blank">View this post on Instagram
4. ड जीवनसत्त्वं ( सूर्यप्रकाश हे विटॅमिन): ड जीवनसत्त्वाचा थेट संबंध आपल्या मूडशी असतो. ते कमी मिळत असेल तर मूड डिसऑर्डर होवून नैराश्य येणं, चिंता रोग हे मानसिक विकार होतात. ड जीवनसत्त्वं आहारापेक्षाही 10 -15 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हातून उत्तम मिळतात. मनातील भीतीच्या भावनेवर मात करण्यासाठी ऊन खावं असं लवनीत सांगतात.
Image: Google
5.भिजवलेले बेदाणे आणि केशर: सकाळी थोडे बेदाणे 4-5 केशर काड्यांसोबत भिजत घालाव्यात. केशर काड्यांसोबत भिजवलेले बेदाणे झोपण्याआधी खावेत. याचा उपयोग शांत झोप आणि निरोगी मनासाठी होतो.
सर्वात शेवटी लवनीत सांगतात, की रोजचा पोषक आहार घेतल्यास आपल्या मेंदूचं कार्य नीट चालण्यासाठी जे पोषक घटक आवश्यक असतात ते मिळतात आणि मेंदू व्यवस्थित काम करतात. आहार हा पौष्टिक असल्यास त्यातून शरीराला पुरेसे अँण्टिऑक्सिडण्टस आणि दाहविरोधी घटक मिळतात. तसेच संतुलित आणि पौष्टिक आहारातून जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतात. यामुळे शरीरात होणारा दाह, त्यातून होणारा पेशींचा नाश हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे धोके कमी होतात.