आजकाल व्यस्त जीवनशैली आणि तणावामुळे लोकांच मेंटल हेल्थ बिघडत आहे (Mental Health Tips). कामाचे दबाव, नैराश्य, चिंता आणि तणाव यासारख्या परिस्थितीतून बरेच जण जातात (Negative Thoughts). यामुळे नकारात्मक विचार आपल्या मनात घर करतात. आपण प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह नजरेने पाहतो. सतत चिडचिड आणि रागराग करतो. यामुळे आपल्यापासून माणसं दूर लोटली जातात.
आपले मानसिक आरोग्य आणखीन बिघडू लागते. शिवाय याचा थेट परिणाम आपल्या कामावरही होतो. कामात लक्ष लागत नाही. आणि यामुळे आपलेच नुकसान होते. जर आपल्याला नकारात्मकता सोडून सकारात्मक वाटचाल करायची असेल तर, काही गोष्टी फॉलो करून पाहा. जीवनात कायम पॉझिटिव्ह राहाल(5 Ways To Overcome Negative Thought Patterns).
सकारात्मक राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात?
मेडिटेशन गरजेचं
सकारात्मक राहण्यासाठी मेडीटेशन करणं गरजेचं आहे. ध्यानसाधना केल्याने आपली एकाग्रता वाढते. आपण निगेटिव्ह बाजू सोडून सकारत्मकतेने गोष्टींचा विचार करायला सुरुवात करतो. एवढेच नाही तर या काळात सोशल मीडियापासूनही अंतर ठेवा.
कांद्याचा कुरकुरीत डोसा खाऊन तर पाहा! १० मिनिटात इन्स्टंट रेसिपी; नाश्ता टेस्टी
८ तासांची झोप महत्वाची
नकारात्मक बोलणाऱ्यांपासून दूर राहा. तणाव कमी करण्यासाठी सकाळी लवकर उठा. आणि ८ तासांची झोप पूर्ण घ्या. मित्र मंडळांसोबत वेळ घालवा. परिवारासोबत वेगवेगळ्या गोष्टी करा.
स्वतःला व्यस्त ठेवा
नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःला कामात व्यस्त ठेवा. स्वयंपाक, गाणे आणि नृत्य यासारख्या आवडत्या गोष्टी कराव्यात. यामुळे मन रमेल.
पुस्तकं वाचा
नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर, पुस्तकांसोबत मैत्री करा. पुस्तकं आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळतात.
तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही
कुटुंबासोबत वेळ घालवा
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. शिवाय त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने आपल्याला आयुष्यातील बरेच धडे शिकायला मिळतील.