Lokmat Sakhi >Mental Health > २०२२ मध्ये ६ गोष्टी कायमचा बदलून टाकतील जगण्याचा अनुभव; Are you ready to change?

२०२२ मध्ये ६ गोष्टी कायमचा बदलून टाकतील जगण्याचा अनुभव; Are you ready to change?

जगण्याला वेग असतोच, फक्त प्रश्न एवढाच आहे की संकटाला संधी समजण्याची आपली तयारी आहे का? नव्या वर्षात स्वत:ला विचार हा प्रश्न.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 02:06 PM2022-01-04T14:06:35+5:302022-01-04T14:15:14+5:30

जगण्याला वेग असतोच, फक्त प्रश्न एवढाच आहे की संकटाला संधी समजण्याची आपली तयारी आहे का? नव्या वर्षात स्वत:ला विचार हा प्रश्न.

6 things will change life experience forever in 2022; Are you ready to change? New year new things. | २०२२ मध्ये ६ गोष्टी कायमचा बदलून टाकतील जगण्याचा अनुभव; Are you ready to change?

२०२२ मध्ये ६ गोष्टी कायमचा बदलून टाकतील जगण्याचा अनुभव; Are you ready to change?

Highlightsअगदी नेलपेण्टच्या शेड, ते काजळ-टिकल्या लावणे, हेअरकट, कानातले ते कपडे हे सारं २०२२ मध्ये परतून आलेलं दिसेल.

चिन्मय लेले

२०२२ उजाडलं. हे वर्ष उजाडेपर्यंत कोरोना कदाचित आपल्या आयुष्यातून वजा झालेला असेल अशी आशा सर्वांना होती. पण नवे वर्ष आले तसे कोरोनाचा नवा अवतारही आसपास येऊन ठेपल्याचे भय आहेच. पण भयालाही सरावतात माणसं आणि त्यातूनही वाट काढत जगतात, मानवी जिद्दीचा तो विलक्षण चिवटपणा आहे. दरवर्षीप्रमाणे या दिवसात चर्चा असते ती बदलत्या ट्रॅव्हल ट्रेण्डची. लोक नव्या वर्षाचे स्वागत करत फिरायला बाहेर पडतात. पण गेले दोन वर्षे प्रवास, पर्यटन हे लक्झरी वाटावं आणि ‘अत्यावश्यक’ यादीतून बाहेर पडावं तसं बाहेर पडतं आहे. मात्र यंदा अनेक पर्यटन विश्लेषकांना वाटतं आहे की, माणसं आपलं आयुष्य असं कोंडवाड्यात जगल्यागत जगणार नाही. आपल्या मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासह खुल्या चार क्षणांसाठी तरी माणसं घराबाहेर पडतील.. पण त्यांच्या प्रवासाचं रुप आणि प्रवासाकडून असलेल्या अपेक्षा मात्र बदललेल्या असतील.

(Image : Google)


१. माइण्डफुल व्हेकेशन


चार दिवस तीन रात्री १० गावं असं माणसं आता करणार नाहीत. जिथं जाऊन शांत वाटेल, विपश्यना, मेडिटेशन करता येईल अशा ठिकाणी माणसं जाऊन शांतपणे राहतील. फोन-सोशल मीडीया जरा लांब ठेवून आपल्या माणसांसह आणि त्याहीपलीकडे जात स्वत:सह तीन-चार दिवस तरी राहतील. कशी वाटते स्वत:सोबतची जिंदगी जरा, अंदाज घेतील.

(Image : Google)


२. वर्केशन


हायब्रिड कामाचा मोड यावर्षीही कायम राहील, म्हणजे काही दिवस प्रत्यक्ष ऑफिसात जाऊन काम तर काही दिवस घरुन काम. जे काम घरुनच करायचं ते घरात बसून केलं काय एखाद्या दुसऱ्या गावी सुंदर तळ्याकाठी बसून केलं काय, हिलस्टेशनला केलं काय काय फरक पडतो? फक्त उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि वीज असली की झाले. २०२२ या वर्षात हे वर्केशन वाढणार आहेत. लोक सहलीला जातील. दिवसभर ऑफिसचं काम करतील, उरलेल्या वेळात फिरुन येतील. काम आणि ब्रेक सोबतच.


३. ५ दिवसात ५ देश- बंद


लोकांना हे कळून चुकलं आहे की धावत धावत पर्यटन यात काही मजा नाही. प्रवास करुया, पर्यटन नाही. त्यामुळे यंदा काही ठराविक शहरांत, जागांमध्ये प्रवासी वाढलेले दिसतील.

(Image : Google)


४. तरुणांच्या जगात रोड ट्रिप्स


तरुणांच्या जगात रोड ट्रिप्स वाढतील, त्या जवळच्या शहरातच असतील पण वाढतील असे वृत्त अलिकडेच एएनआयने निले आहे. आपल्या राज्यात, देशात, छोट्या सहली, स्वत:च्या वाहनांनी करणे, स्वत: ड्राइव्ह करणे हे सारे तरुण जगात चर्चेचे, क्रेझचे आणि आनंदाचे विषय ठरतील.


५. रिलेटिव्ह टुरिझम


हा शब्दच नवा आहे. कोरोना काळात अनेकांना कळलं की, आपले नातेवाईक, जीवाभावाची माणसं हे सारं जपायला हवीत. माणसं गमावण्याचं दु:खही अनेकांनी अनुभवलं. आता म्हणूनच वेळात वेळ काढून लोक नातेवाईकांना भेटायला जातील, त्यासाठीचे प्रवास करतील.

(Image : Google)


६. GOAT


हा शब्द आपल्याला टेनीस किंवा फुटबॉलसह तरुण मुलांच्या नव्या परिभाषेतला म्हणून माहित असतो. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. आता लाइफटाइम अनुभव घ्यायला अनेकजण असा जीओइटी प्रवास करतील. आपल्या अशा इच्छा, अशी ठिकाणं पहायला जातील ज्यासाठी जीव काढून ठेवावा.


तरुणींच्या जगात काय बदल?


पिनरेस्ट या लोकप्रिय साइट्सने २०२२ मध्ये काय ट्रेण्ड असतील याचे अंदाज सांगितले आहेत. तरुण मुलांच्या जगात तर या साइटचे भारीच अप्रूप असते. ते सांगतात तो प्रवासाचा ट्रेण्डही बोलका आहेत.
त्यापैकी हे ३ महत्त्वाचे ट्रेण्ड्स

 


(Image : Google)

१. रिटर्न ऑफ रेट्रो


म्हणजे काय तर सत्तरच्या दशकात ज्या फॅशन्स होत्या ते परत येतील. कपडे, त्यावरच्या डिझाइन्स, चष्मे, केशरचना हे सारे पुन्हा नव्यानं फॅशन म्हणून येईल. त्याची झलक आताच दिसते आहे. नुकत्यात आलेल्या ८३ या सिनेमातल्या फॅशन्स तरुण मुलांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अगदी नेलपेण्टच्या शेड, ते काजळ-टिकल्या लावणे, हेअरकट, कानातले ते कपडे हे सारं २०२२ मध्ये परतून आलेलं दिसेल.


२. वेलबिइंग ॲट होम


आपण ज्या घरात राहतो त्या घरात संध्याकाळचं ऊन कसं दिसतं. खिडकीतून पाऊस कसा पडताना दिसतो, आपला असा खास एखादा कोपरा आहे का जिथं बसलं की घरात सुख वाटतं. बाहेर फिरण्यापेक्षा घरात आपल्याला सुखकर आणि सोयीचं वाटेल असं वातावरण तयार करणं, वर्क फ्रॉम होम ते घरात एक्स्ट्रा टॉयलेट बाथरुम ते उत्तम इंटिरिअर, चारदोन इनडाेअर प्लाण्टच्या कुंड्या अशा काही अत्यावश्यक गोष्टी अनेकजण घरात करुन घेतील. आपण जास्त काळ घरातच राहणार असू तर मग आपल्याला मस्त वाटलं पाहिजे ही यामागची भावना.


३. टेस्ट ऑफ ट्रॅव्हल


प्रवास म्हणजे फक्त फिरफिर फिरणं नाही, तर आपण जिथं जाऊ तिथलं खाणं, पारंपरिक पदार्थ, ते बनवण्याचा-खाण्याचा आनंद, त्यासोबत कळणारी संस्कृती या साऱ्याचं अप्रूप असेल. येत्या वर्षात प्रवासात स्थानिक आणि पारंपरिक पदार्थांचं आकर्षण वाढेल आणि अनेक पर्यटक स्थानिकच ठिकाणी जेवतील असा अंदाज आहे.


(लेखनसंदर्भ: ट्रॅव्हल-लेझर इंडिया)

Web Title: 6 things will change life experience forever in 2022; Are you ready to change? New year new things.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.