आजकालच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये लोक आपल्या करियरबाबत बरेच चिंतेत असतात. जास्त विचार करून याचा तब्येतीवर परिणाम होऊ लागतो. सतत कोणत्या ना कोणत्या ताणाखाली असणं, खूप विचार करणं या गोष्टी आपलं मानसिक आरोग्य खराब करू शकतात. अशावेळी काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही टेंशन फ्री राहू शकता. (Easy Ways To Stop Overthinking)
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार ओव्हरथिंकींग टाळण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जेव्हा कधीही स्ट्रेसफूल वाटेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या. दुसऱ्या व्यक्तींना आनंद होईल अशा गोष्टी करा. तुम्ही जे बोलता ते करण्याचा प्रयत्न करा. फक्त बोलताय करत काहीच नाही असे वागू नका. मन जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
१) आजचा दिवस आनंदाने जगा भविष्याचा विचार करू नका
बरेचसे लोक वर्तमान स्थितीचा आनंद न घेता कायम भविष्यातील स्थितीबाबत चिंतेत असतात. उद्या काय होईल, कसे होईल याचा विचार करून आपली मनस्थिती अस्थिर ठेवण्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने जगा. यामुळे तुम्ही सर्व दिवस आनंदात राहाल.
२) निगेटिव्ह थिंकिंग करू नका
अनेकजण निगेटिव्ह थिंकींग करतात. हे टाळण्यासाठी कायम सकारात्मक विचार ठेवा. तुमच्यासोबत नेहमीच चांगले होईल असे विचार ठेवा. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणं तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंगकडे नेऊ शकते. म्हणून जास्तीत जास्त सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा.
३) आपलं ध्येय ठरवा
जर तुम्ही आयुष्यात कोणतंही ध्येय ठरवलं असेल तुम्ही त्यावर लक्ष केंद्रीत कराल तुमचा मूडही चांगला राहील. हळू हळू तुमच्या डोक्यातील ताण-तणावपूर्ण विचार कमी होऊ लागतील.
४) गाणी ऐका
गाणी ऐकणं सर्वांनाच आवडते पण जेव्हा तुमच्या मनात निगेटिव्ह विचार जास्त येत असतील तेव्हा जास्तीत जास्त गाणी ऐकण्याचा प्रयत्न करा. यामुळे ताण-तणाव कमी होईल आणि कायम फ्रेश वाटेल.
५) कायम आनंदी राहा-ताण येणार नाही
कमीत कमी ताण येण्यासाठी आनंदी राहणं फार महत्वाचे आहे. यासाठी चांगल्या लोकांबरोबर वेळ घालवा. आपल्या कुटुंबाबरोबर चांगला क्वालिटी टाईप स्पेंड करा. ज्यामुळे आपोआप ताण कमी होईल.
६) योगा आणि मेडिटेशन गरजेचे
मानसिक आरोग्य चांगले राहण्यासठी योगा आणि व्यायाम या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही एक्टिव्ह राहते. नकारात्मक विचार डोक्यात येत नाहीत आणि कायम आनंदी राहता.
7) आपल्या आवडत्या गोष्टी करा
नेहमी नेहमी काम करून शरीर दमतं अशावेळी तुम्ही डान्स, सिंगिग, एखादा गेम खेळणं, तुम्हाला आवडेल ती एक्टिव्हीटी करू शकता. यामुळे तुमचं मन रमेल आणि कायम आनंदी राहाल.