शारिरीक आजार असतील तर ते आपण मनमोकळेपणाने बोलतो. सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या शारिरीक आजारांची तर नेहमीच भरभरून चर्चा होतो. पण मानसिक आजारांबाबत मात्र अजूनही मौन पाळलं जातं. पण तरीही आता दीपिका पदुकोन, आलिया भट, करण जोहर हे कलाकार त्यांच्या मानसिक आजाराबाबत मनमोकळेपणाने बोलत आहेत. आता त्याच यादीत आणखी एक नाव आलं आहे आणि ते म्हणजे आमिर खान. आमिर म्हणतो की आपलं शरीर जसं असतं तसंच आपलं मन असतं. शरीराला त्रास होतो, तसाच त्रास मनालाही होतो. मग तो का लपवून ठेवावा. उलट आपला मानसिक त्रास आणि त्यासंबंधी आपण घेत असलेले उपचार जर इतरांना कळाले तर स्वत:चे मानसिक त्रास, आजार मनमोकळेपणाने सांगण्याची, उपचार घेण्याची हिंमत नक्कीच त्यांना मिळू शकते.(Aamir Khan says he had joint mental therapy with daughter Ira khan)
आमिरच्या एका मुलाखतीचा छोटासा भाग सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आमिर सांगतो आहे की तो आणि त्याची मुलगी इरा असे दोघे मिळून सध्या मानसिक अस्वस्थतेविषयी मानसोपचार तज्ज्ञांकडून मेंटल थेरपी घेत आहेत.
पुदिना महिनाभर राहील हिरवागार आणि फ्रेश- ३ सोपे उपाय- पुदिना खराब होण्याचं टेन्शनच नाही
दुरावा कमी होऊन त्या दोघांचे नाते आणखी छान व्हावे आणि मनातली अस्वस्थता कमी व्हावी म्हणून तो हे सगळं करतो आहे. पण तो म्हणतो की अजूनही आपल्याकडे मेंटल थेरपी घ्यायला जाण्याचे अनेक चुकीचे अर्थ काढले जातात. त्यामुळेच लोक त्यांचे मानसिक त्रास, आजार लपवून ठेवतात. म्हणूनच तर ते आता जास्त मोकळेपणाने बोलण्याची, सांगण्याची गरज आहे.
मानसिक थेरपीची गरज
हल्ली प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात खूप अडकून गेला आहे. करिअरच्या मागे पळताना, हवं ते मिळविण्यासाठी धावताना आपली माणसं, मित्रमंडळी, कुटूंब मुलं मागे राहातात. मग हळूहळू एकटेपणा छळू लागतो. बोलायला कोणी नसल्याने मनातलं बाहेर येत नाही.
३ चुका केल्या तर केस गळणारच!! डोक्याला टक्कल पडू द्यायचं नसेल तर वेळीच सावध व्हा
त्यातूनच अनेकांना डिप्रेशनचा त्रास होतो. सगळंकाही हवंच आहे ही हाव वाढत असल्याने काही चुकून सुटून गेलं तर त्याचा त्रास होतो. अस्वस्थता वाढते. नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम होऊन नात्यात दुरावा येतो. या आणि अशा अनेक कारणांमुळे सध्या अनेकांना वेगवेगळे मानसिक त्रास होतात. शारिरीक आजार जसे आपण घरच्याघरी बरे करू शकत नाही, तसंच मानसिक त्रासांचंही आहे. म्हणूनच तर तज्ज्ञांची गरज पडते आणि थेरपी घ्यावी लागते. एवढं सहज असणाऱ्या या गोष्टीकडे अजूनही चुकीच्याच अर्थाने का पाहिलं जावं बरं?