काही जणी त्यांच्या करिअरमध्ये खूप पुढे असतात. पण लग्न आणि मुलं होईपर्यंतच त्यांच्या करिअरची धाव असते. मुलं झाली की त्या करिअर सोडतात आणि मुलांमध्येच पुर्णपणे अडकून जातात. अभिनेत्रींबाबतच बोलायचं झालं तर भाग्यश्री, श्रीदेवी, रविना टंडन अशा अनेक अभिनेत्रींची नावं घेता येतील. बऱ्याच सर्वसामान्य कुटूंबातही हेच दिसून येतं. त्यांच्या अडचणी आणखी वेगळ्या असतात, कुटूंबात मुलांना सांभाळणारं कोणी नसतं. त्यामुळे अनेकींना इच्छा नसतानाही करिअरला रामराम करावा लागतो. एकदा करिअर सुटलं की मग मुलं आणि संसार हेच त्यांच्यासाठी सर्वस्व होऊन जातं. तसंच काहीसं अभिनेत्री भाग्यश्रीचंही झालं हाेतं आणि त्यातूनच तिला 'Empty Nest Syndrome' चा त्रास झाला..(Actress Bhagyashree spoke about Empty Nest Syndrome)
'Empty Nest Syndrome' म्हणजे काय?
हा नेमका काय त्रास असू शकतो याविषयीचा अंदाज त्या आजाराचं नाव वाचून येतोच.. भाग्यश्रीच्या एका मुलाखतीचा एक छोटासा भाग hauterrfly and bhagyashree.online या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तिने या आजाराविषयी सांगितलं आहे.
मी कुरुप आहे, असं म्हणत शिल्पा शेट्टी रोज रडायची! आईने दिला खास सल्ला, वाचा..
ती म्हणते की लग्नानंतर मुलं झाली आणि मी माझ्या सगळ्या आवडीनिवडी, करिअर बाजूला ठेवलं. मुलांमध्ये पुर्णपणे अडकून गेले. हळूहळू मुलं मोठी झाली. त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये, अभ्यासात अडकून गेली आणि मी खूप एकटी पडत गेले. मुलांना आता माझ्यासोबत राहण्यापेक्षा बाहेरचं जग आवडत आहे, त्यांना त्यांची दुनिया आहे आणि माझी गरज नाहीये असं वारंवार वाटायला लागलं. हा जो काय त्रास असतो तोच त्रास म्हणजे 'Empty Nest Syndrome'.
मानसिक दृष्ट्या या काळात एक आई खूप खचून गेलेली असते. तिच्या आयुष्यातला एकटेपणा खूप वाढलेला असतो. मुलांना आपल्या पदराशी बांधून ठेवणंही योग्य नसतं. शिवाय याच काळात जोडीदारसुद्धा त्याच्या कामात, त्याच्या मित्रमंडळींमध्ये खूप अडकून गेलेला असतो.
यशाच्या शिखरावर असूनही रश्मिका मंदानाची एकच खंत, ती म्हणते- करिअर केलं पण कुटूंब.....
त्यामुळे घरातला, मनातला एकटेपणा खायला उठतो. आपण आता कोणाच्याच उपयोगाचे नाही ही भावना बळावू लागते. म्हणूनच भाग्यश्री सांगते की असा एकटेपणा तुमच्या आयुष्यात येण्याच्या आधीच थोडं सावध व्हा. मुलं मोठी व्हायला लागली की स्वत:साठी वेळ काढणं, स्वत:च्या आवडीनिवडी जपणं, शक्य असेल तर पुन्हा करिअरलर सुूरुवात करणं असं काहीतरी करा.. स्वत:कडे लक्ष द्या. या गोष्टींमध्ये तुम्ही स्वत:ला गुंतवून ठेवलं तर तुम्हाला एकटेपणाचा त्रास होणार नाही. हल्ली बऱ्याच जणींच्या तोंडून आपण हेच ऐकतो आहोत. म्हणूनच हा त्रास आपल्यापर्यंत येऊच द्यायचा नसेल तर मुलांच्या वाढत्या वयासोबत तुम्हीही तुमच्या आवडत्या गोष्टींचा विस्तार वाढवायला हळूहळू सुरुवात करून टाका..