Join us  

"कधी कधी काहीच न ठरवता फक्त मनाचं ऐकणंही चांगलं असतं...", गोंधळलेल्या प्रत्येकीला समीरा रेड्डी असं सांगतेय, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 4:29 PM

How to Remove Confusion From Mind: कधी कधी काहीच सुचत नाही, काय करावं- काय नाही, काहीच कळत नाही. अशा गोंधळलेल्या प्रत्येकीसाठी अभिनेत्री समीरा रेड्डीने दिलेला सल्ला (advice given by actress Sameera Reddy) उपयोगी ठरू शकतो.

ठळक मुद्देकधी कधी स्वत:मधला आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटत असेल, आयुष्याचं ध्येय सापडत नसल्याने निराशा येत असेल, तर समीराची ही पोस्ट नक्कीच वाचा.

समीरा रेड्डी (Sameera Reddy) म्हणजे अतिशय वास्तववादी अभिनेत्री. सोशल मिडियावर वावरताना ती तिचं अभिनेत्रीचं वलय कधीच तिच्या  आसपासही फिरकू देत नाही. एखाद्या सामान्य आई, पत्नी, सुन, महिलेप्रमाणे ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. त्यामुळेच तर तिच्या पोस्ट खूप जास्त व्हायरल (viral) होतात आणि प्रत्येकाला त्यात आपलं असं काही तरी जाणवतं. समीराने नुकतीच एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. ती तिच्या ज्या अवस्थेचं वर्णन करते आहे, तशी अवस्था प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात कधी ना कधी येतेच.. म्हणूनच कधी कधी स्वत:मधला आत्मविश्वास (how to built confidence) कमी झाल्यासारखा वाटत असेल, आयुष्याचं ध्येय सापडत नसल्याने निराशा (solution for depression) येत असेल, तर समीराची ही पोस्ट नक्कीच वाचा.

 

समीरा म्हणते कधी कधी आपण अगदीच वाट हरवून बसतो. ३ वर्षांपुर्वी म्हणजे तिच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिची अवस्था अशीच झाली होती.

पिंपल्स, काळे डाग आणि डार्क सर्कल्स घालविण्याचा सोपा उपाय, करा केळीच्या सालींचा ‘असा’ उपयोग

आयुष्यात पुढे काय करायचं, काय नाही, हे काहीच ठरलं नव्हतं. त्यामुळे प्रवाहासोबत ती फक्त वाहत  राहिली. पण आता स्वत:ला पुन्हा एकदा शोधण्याचा, घडविण्याचा प्रयत्न करते आहे. ती म्हणते हे अजिबातच सोपं नाही. पण ठरवलं तर तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यात हा स्वत:चा शोध घेऊ शकता. 

 

समीरा पुढे म्हणते की मला आता अनेक जण विचारतात की एक अभिनेत्री म्हणून माझं करिअर पुढे कसं असेल.

ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास कमी करणारा खास हर्बल टी! रोज सकाळी प्या.. ॲसिडीटी गायब

पण अजून तरी मी याबाबत काहीच ठरवलेलं नाही. कारण सध्या मी फक्त माझ्या मनाचं ऐकते आहे. त्यामुळेच तर कोणतेही फिल्टर न लावता अगदी जशी आहे तशी सगळ्यांसमोर येताना कोण काय म्हणेल, हा विचार माझ्या मनातही येत नाही. त्यामुळेच तर ती सांगतेय की गोंधळलेल्या अवस्थेत असताना कधी कधी काहीच न ठरवता फक्त मनाचं ऐकणंही चांगलं असतं... 

 

 

टॅग्स :मानसिक आरोग्यसमीरा रेड्डी