Lokmat Sakhi >Mental Health > आलिया भटची फिटनेस ट्रेनर यास्मिनचा सल्ला, ४ सोप्या गोष्टी करा- स्ट्रेस होईल कमी-व्हाल टेंशन फ्री!

आलिया भटची फिटनेस ट्रेनर यास्मिनचा सल्ला, ४ सोप्या गोष्टी करा- स्ट्रेस होईल कमी-व्हाल टेंशन फ्री!

Alia Bhatt's fitness trainer Yasmin Karachiwala shares 4 simple habits to manage daily stress : स्ट्रेस कमी करण्यासाठी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर सांगते साधेसोपे ४ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 20:39 IST2025-03-25T20:26:33+5:302025-03-25T20:39:25+5:30

Alia Bhatt's fitness trainer Yasmin Karachiwala shares 4 simple habits to manage daily stress : स्ट्रेस कमी करण्यासाठी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर सांगते साधेसोपे ४ उपाय...

Alia Bhatt's fitness trainer Yasmin Karachiwala shares 4 simple habits to manage daily stress | आलिया भटची फिटनेस ट्रेनर यास्मिनचा सल्ला, ४ सोप्या गोष्टी करा- स्ट्रेस होईल कमी-व्हाल टेंशन फ्री!

आलिया भटची फिटनेस ट्रेनर यास्मिनचा सल्ला, ४ सोप्या गोष्टी करा- स्ट्रेस होईल कमी-व्हाल टेंशन फ्री!

नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस घेतोच. आपल्यापैकी बहुतेकजणांवर कमी अधिक प्रमाणांत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस हा असतोच. आपल्या डेली (Alia Bhatt's fitness trainer Yasmin Karachiwala shares 4 simple habits to manage daily stress) रुटीनमध्ये चिंता, स्ट्रेस, तणाव या खूपच सामान्य गोष्टी मानल्या जातात. परंतु काहीवेळा आपल्या मेंदू व मनावरील हा ताण इतका वाढतो की, आपले मानसिक - शारीरिक संतुलन बिघडू शकते.

आपण स्ट्रेसमध्ये असताना खूप घाबरतो, काय करावे सुचत नाही. यासाठीच, कतरीना आणि आलिया भटची (Alia Bhatt) फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला ( fitness trainer Yasmin Karachiwala) यांनी भीती आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी आपण नेमकं काय करायच याबद्दल काही खास टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स फॉलो करून आपण समोर असलेल्या समस्येला अगदी चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी तयार होऊ शकता आणि स्वतःवरील स्ट्रेस कमी करु शकता. डेली रुटीन मधील स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याच्या चार महत्वाच्या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात. 

 डेली रुटीन मधील स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी काय करावं ? 

१. एक्सरसाइज करण्याची सवय लावा :- कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज हा ताण कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. एक्सरसाइज म्हटल्यावर मग फक्त एक्सरसाइज करणेच अपेक्षित नाही तर तुम्ही तुमचा आवडता खेळ खेळू शकता किंवा तुमच्या आवडत्या गाण्यावर नाचू शकता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शारीरिक हालचाली केल्यामुळे तुमच्या मूड आणि एनर्जी लेव्हल मध्ये सुधारणा होण्यास अधिक मदत होते. तुमच्या डेली रुटीनमध्ये योगासारख्या विविध  पद्धतींचा समावेश केल्याने मन आणि शरीर योग्य ताण न घेता योग्य पद्धतीने काम करते, ज्यामुळे विश्रांती आणि आंतरिक शांती मिळते.

वाढते वजन - पोटाची ढेरी होईल कमी, सकाळी उपाशी पोटी खा 'हे' फळं - दिसाल स्लिमट्रिम...

२. हेल्दी खाण्याच्या सवयी :- आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्वक लाईफस्टाईलमध्ये खाण्याच्या सवयी आणि वेळा पाळणे थोडे कठीण होते. यासाठीच स्वतःला हेल्दी स्नॅकिंग करण्याची सवय लावणे गरजेचे आहे. अतिशय बिझी रुटीन असणाऱ्यांनी आपल्या सोबत कायम फळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुटस ठेवण्याच्या सल्ला त्या देतात. फळे आणि ड्रायफ्रुटस खाल्ल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते, यासोबतच हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला वारंवार भूक लागत नाही, तुमचे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते यामुळे वजन कमी करण्यास अधिक मदत होते. ड्रायफ्रुटस खाल्ल्याने फक्त वजनच कमी होण्यास मदत होते असे नाही तर शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते, सोबतच स्ट्रेस मॅनेजमेंट, हार्ट हेल्थ आणि स्किन ग्लो साठी देखील उपयुक्त ठरते. एक्सरसाइज केल्यानंतर संत्र्याचा रस किंवा लिंबू सरबत अशी पेय पिऊन हायड्रेटेड राहण्याचा सल्ला देतात. 

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा 'हे' ५ बदल, अपचन - डिहायड्रेशन होणार नाही - उन्हाळा जाईल सुखकर...

३. हायड्रेटेड राहा :- स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी हायड्रेटेड राहणे देखील महत्वाचे असते. डिहायड्रेशनमुळे थकवा, डोकेदुखी आणि मूड स्विंग होऊ शकतात, ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे आणि दिवसभर उत्साही राहणे कठीण होऊ शकते. यास्मिन, दिवसभरात पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहण्यास सांगतात. शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा हर्बल टी सारखे हायड्रेटिंग पेय देखील आपण पिऊ शकतो. आपल्या सोबत कायम पाण्याची एक बाटली जवळ ठेवावी. 

सतत हेअर स्टाईल करुन खराब झालेल्या केसांसाठी माधुरी दीक्षितचा 'देसी उपाय' - केस होतील मऊमुलायम...

४. स्वतःसाठी वेळ काढा :- कितीही बिझी लाईफस्टाईल असली तरीही दिवसभरातील थोडासा वेळ स्वतःला द्या. दिवसभरातील थोडा वेळ स्वतःसाठी 'मी टाइम'  बाजूला काढून ठेवल्याने विश्रांती मिळून स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते. या वेळात स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा. वाचन, गाणी ऐकणे किंवा स्वतःचा छंद जोपासा. यामुळे तुम्ही स्वतःला रिचार्ज करून स्ट्रेस कमी करू शकता.

Web Title: Alia Bhatt's fitness trainer Yasmin Karachiwala shares 4 simple habits to manage daily stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.