Solo Traveling For Women : सामान्यपणे महिलांची नेहमीच ही तक्रार असते की, लग्न झाल्यावर आणि मुलांचा सांभाळ करण्याच्या नादात त्यांना त्यांच पर्सनल जीवन जगायलाच मिळत नाही. स्वत:साठी वेळ देता येत नाही. कारण लग्नानंतर फिरायला जाणं हे सामान्यपणे परिवारासोबतच होतं. एकट्याने त्यांना कुठे फिरायला जाण्याची संधीच मिळत नाही. अशात महिला सोलो ट्रॅव्हलचा अनुभव घेऊ शकतात. अविवाहित महिलांसाठी जेवढं एकटं फिरणं फायदेशीर आहे, त्यापेक्षा जास्त ते विवाहित महिलांसाठी आहे.
मुळात सोलो ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासाठी वेगळा वेळ तर देऊच शकता, त्यापेक्षा जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. अशात आज आम्ही तुम्हाला लग्न आणि मुलंबाळ झाल्यावरही सोलो ट्रिप करण्याचे काय काय फायदे असतात. तसेच महिलांनी का एकदा सोलो ट्रिपचा अनुभव घ्यायला हवा.
पर्सनल स्पेस
अनेकदा पुरूषांना असं म्हणताना ऐकलं जातं की, त्यांना पर्सनल स्पेस हवीये. लग्नाआधी आणि नंतरही ते असं म्हणतात की, त्यांना नात्यात जरा पर्सनल स्पेस हवी आहे. अशात सतत पती आणि मुलांचा विचार करण्याऐवजी किंवा त्यांच्यात गुंतून राहण्याऐवजी महिलांनी सुद्धा आपला स्वत:चा विचार करण्याची गरज असते. आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरून महिलांना त्यांची पर्सनल स्पेस मिळू शकते. सोबतच एक वेगळा अनुभवही मिळतो.
मानसिक आरोग्यासाठी गरजेचं
सोलो ट्रॅव्हल करणं मानसिक आरोग्यासाठी अनेकदृष्टीने फायदेशीर ठरतं. सामान्यपणे लग्न झाल्यावर आणि आई झाल्यावर महिलांसाठी हे गरजेचं असतं. अनेकदा महिलांना स्वत:सोबत बसून बोलण्याची गरज असते. स्वत:ला समजून घेण्याची आणि ओळखण्याची गरज असते. हे सोलो ट्रॅव्हलच्या माध्यमातून होऊ शकतं.
आत्मविश्वास वाढतो
महिला आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी सोलो ट्रॅव्हल करू शकतात. अनेकदा लग्नानंतर असं वाटू लागतं की, पतीवर जास्त अवलंबून राहिलं जात आहे. कुठे बाहेर जायचं असेल वा एखादी ट्रिप प्लॅन करायची असेल तर हळूहळू पतीवर अवलंबून रहावं लागतं. अशात स्वत:चा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सोलो ट्रॅव्हलची मदत घेतली जाऊ शकते.
स्वत:ला ओखळण्याची संधी
सामान्यपणे लग्नानंतर आणि मुलंबाळ झाल्यानंतर महिलांना असं वाटू लागत असतं की, त्या स्वत:ला कुठेतरी हरवून बसल्या आहेत. घर-लेकरांना सांभाळून त्यांच्यात गुरफटून स्वत:ची ओळख हरवून बसल्या आहेत. अशात स्वत:चा शोध पुन्हा घेण्यासाठी, स्वत:शी संंवाद साधण्यासाठी सोलो ट्रॅव्हलची मदत घेतली जाऊ शकते.
स्वत:ची क्षमता समजून येते
व्यक्ती जेव्हा एकटी असते तेव्हा विचार केल्यावर असं लक्षात येतं की, अशी कितीतरी कामे आहेत जी एकट्याने केली जाऊ शकतात. सामान्यपणे ही तिच कामे असतात ज्यासाठी त्यांनी आधी दुसऱ्या कुणाचा आधार घेतला होता. याचप्रकारे जेव्हा महिला सोलो ट्रॅव्हलवर निघतात तेव्हा त्यांना त्यांच्याबाबत बरंच काही समजून येतं. हेही समजतं की, त्या कोणकोणत्या कामात सक्षम आहेत आणि त्यांच्यात असे कोणते गुण आहेत, ज्याबाबत त्यांना माहीत नव्हतं.