Join us  

तुम्हालाही झालाय work from home स्ट्रेस ? दिवसभर काम करूनही रात्रीची झोप गायब ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 3:58 PM

कोरोनानंतर आलेल्या न्यू नॉर्मल जगण्याचे अनेक फायदे- तोटे आता सगळे जगच अनुभवत आहे. वर्क फ्रॉम  होम या हा न्यू नॉर्मल जगण्याचाच एक भाग झाला आहे. यातूनच आता work from home करणाऱ्या अनेक  जणांना WFH स्ट्रेस म्हणजेच वर्क फ्रॉम होम स्ट्रेस नावाचा नविनच मानसिक त्रास छळू लागला आहे.

ठळक मुद्देडिप्रेशन आल्याने काम करण्याची क्षमता कमी  होत जाते तसेच कोणतीही गोष्ट 'गिव्ह अप' करण्याची  वृत्ती वाढत जाते. वारंवार मूड बदलत जाणे, कधी अगदीच उत्साह वाटणे तर पुढच्याच क्षणी हताश, निराश वाटणे. यामुळे  कामात अजिबात लक्ष लागत नाही आणि नकारात्मकता वाढू लागते

आपल्यालाही वर्क फ्रॉम होम स्ट्रेसचा त्रास होत आहे, हे ओळखण्याची एक सोपी ट्रीक आहे. या त्रासामध्ये नैराश्य, चिडचिडेपणा, अस्वस्थता तर दिसतेच पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवसभर काम  करूनही  रात्रीची झोप गायब झालेली असते. तासनतास बेडवर पडूनही, खोलीत सर्वत्र अंधार करूनही किंवा झोप  येण्यासाठी अगदीच आदर्श वातावरण असतानाही या रूग्णांना झोप येत नाही. वर्क फ्रॉम करत असताना तुमचीही झोप गायब झाली असेल तर कदाचित तुम्हीही या मानसिक आजाराचे शिकार झालेले असू शकता.वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार कोरोना महामारीनंतरच्या काळात डिप्रेशन, अस्थिरता, स्ट्रेस किंवा इतर मानसिक आजारांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय ताण जाणवत आहे. हावर्ड मेडिकल स्कूलतर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार वर्क फ्रॉम  होम  करणाऱ्या नोकरदारांमध्ये डिप्रेशन, बायपोलार डिसऑर्डर, एन्झायटी डिसऑर्डर, एडीएचडी असे अनेक मानसिक आजार दिसू लागले आहेत. या आजारांचा एकत्रित परिणाम रात्री झोप न येण्यावर होत आहे. 

१. नैराश्य नर्व्हसनेस, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा वाढत जाते. डिप्रेशन आल्याने काम करण्याची क्षमता कमी  होत जाते तसेच कोणतीही गोष्ट 'गिव्ह अप' करण्याची  वृत्ती वाढत जाते. २. बायपोलार डिसऑर्डटर-वारंवार मूड बदलत जाणे, कधी अगदीच उत्साह वाटणे तर पुढच्याच क्षणी हताश, निराश वाटणे. यामुळे  कामात अजिबात लक्ष लागत नाही आणि नकारात्मकता वाढू लागते. ३. एन्झायटी डिसऑर्डर-खूप जास्त थकवा येणे, अस्वस्थता वाढणे, एकाग्रता कमी होणे आणि आपल्या परफॉर्मन्सबाबत खूप जास्त चिंता करणे. अशा प्रकारच्या मानसिक आजारातून जाणाऱ्या रूग्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. ४. एडीएचडी-या प्रकारच्या आजारात वर्कलोड सांभाळणे कठीण होऊन जाते. यामुळे कामाच्या डेडलाईन पाळता येत नाहीत. याचाच परिणाम स्ट्रेस लेव्हल वाढण्यावर होतो. 

 

झोप येण्यासाठी हे उपाय करून पहा...

१. रात्री झोप न येणे म्हणजे तुम्ही कोणत्यातरी गोष्टीचा खूप जास्त विचार करत आहात. चिंता करायला लावणारी प्रत्येक गोष्ट डायरीमध्ये लिहून ठेवा. यामुळे चिंतादायक गोष्टी तुमच्या मनातून बाहेर येण्यास सुरूवात होईल.२. वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम बेड नव्हे. झोपताना लॅपटॉप, मोबाईल या वस्तू कटाक्षाने दूर  ठेवा. झोप आली नाही तरी गॅझेट्सला हात लावू नका.३. दिवसा थोडी झोप घेण्याची सवय असेल, तर ती सवय सोडा. कारण यामुळेही तुमच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :आरोग्यमानसिक आरोग्य