Join us  

मनातून कुढता, चिडता पण लोकांसमोर कायम खोटे खोटे हसता, आनंदी दिसता? ही टॉक्सिक पॉझिटिव्हीटी घातक कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 10:55 PM

Toxic Positivity Problems वास्तविक जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण आतून खूप दुखावतो. आत हजारो भावनांचे वादळ सुरु असते. अशावेळी मनावर ताबा मिळवणे उत्तम ठरेल.

आयुष्यात ''सकारात्मक दृष्टी'' असणं फार गरजेचं आहे. हाच आनंद मिळवण्याचा मार्ग आहे असे म्हटले जाते. आपण सकारात्मक राहिलो की, आपल्या भोवतीने घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी सकारात्मक दृष्ट्या बरोबर घडतात. मात्र, मनात घडणाऱ्या असंख्य चलबिचल विचार आपल्याला सकरात्मक राहण्यास भाग पाडत नाही. अशावेळी आपल्या जगण्याचा हेतू, आंतरिक शांती, समाधान व आनंद या गोष्टी आपल्याकडे नाहीत हे लक्षात येते. आशावादी राहणे योग्य मानले जाते. परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की अती आशावादी असणे कधीकधी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा स्थितीला 'टॉक्सिक पॉझिटिव्हिटी' असे म्हणतात. वास्तविक जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण आतून खूप दुखावतो आणि आत हजारो भावनांचे वादळ सुरु असते. अशावेळी आपल्याला अनेक जणांकडून पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला देण्यात येतो.

बेस्टलाइफ यांच्या वेबसाईटनूसार, ''नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करणे कधी कधी घातक ठरू शकते. याने आपल्या मनात अनेक समस्या निर्माण करतात. अशावेळी बाहेरून आपण सकारात्मक आहोत हे दर्शवणे मानसिक व आरोग्यासाठी विषारी ठरू शकते. दरम्यान, अशा परिस्थितीत आपली भावना एखाद्या जवळच्या व्यक्तीकडे शेअर करून मन मोकळे करणे उत्तम ठरेल. याला ‘टॉक्सिक पॉजिटिविटी’ असे देखील म्हणतात.''

‘टॉक्सिक पॉजिटिव्हिटी’ला कसे दूर कराल

आपल्या विचारांकडे लक्ष द्या

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल, किंवा तुम्ही तणावाखाली असाल तर, सर्वप्रथम आत्मनिरीक्षण करा. विचार करा की तुम्ही विनाकारण नकारात्मक विचार करत आहात का? अनेक वेळा आपण स्वतःचे किंवा इतरांचे सांत्वन करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यास भाग पाडतो. त्यामुळे अनेक वेळा सकारात्मक विचार विषारी बनतात आणि आपण आपल्या भावनांना आतून दाबू लागतो. अशा परिस्थितीत स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या.

‘टॉक्सिक पॉजिटिव्हिटी’ला ओळखा

बर्‍याच वेळा मित्र मंडळी व कुटुंबातील सदस्य वाईट काळात आधार देतात. पॉजिटिव्हिटीच्या गोष्टी बोलून प्रेरणा देतात. कधी कधी या गोष्टी ऐकल्याने आपल्याला स्वतःबद्दल वाईट वाटू लागते. त्यामुळे आपल्या मनात जर चलबिचल सुरु  असेल तर, या विषयावर त्यांच्याशी बोलणे टाळा. कारण त्यांचे बोलणे देखील आपल्याला टोचू शकते.

स्वतःच्या भावना सामान्य म्हणून समजून घ्या

प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतो. प्रत्येकजण आपल्या परीने त्यांना सामोरे जातो. परंतु जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या समस्या आणि नकारात्मक भावना स्वीकारत नसाल तर ते तुमचे आणखी नुकसान करू शकते. त्यामुळे अशा भावनांची लाज वाटण्यापेक्षा त्यांना सामान्य मानून स्वीकारणेच योग्य ठरेल.

सोशल मीडियापासून ब्रेक घ्या

आपण जर कठीण परिस्थितीमधून जात असाल, तर सोशल मीडियापासून ब्रेक घ्या. असे केल्याने, तुम्ही विषारी नकारात्मक गोष्टी बर्‍याच प्रमाणात टाळू शकता. याने आपल्या मनात चालू असलेल्या विचारांना आराम मिळेल.

टॅग्स :हेल्थ टिप्समानसिक आरोग्यआरोग्य