Lokmat Sakhi >Mental Health > दारासमोर दररोज रांगोळी काढण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? विज्ञान सांगते की...

दारासमोर दररोज रांगोळी काढण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? विज्ञान सांगते की...

Benefits Of Drawing Rangoli: सणावाराला दारापुढे आपण आवर्जून रांगोळी काढतो. रांगोळी काढण्याचे हे काही वेगवेगळे फायदे पाहा..(drawing rangoli is very useful for physical and mental health)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2024 06:15 PM2024-09-09T18:15:18+5:302024-09-09T18:16:13+5:30

Benefits Of Drawing Rangoli: सणावाराला दारापुढे आपण आवर्जून रांगोळी काढतो. रांगोळी काढण्याचे हे काही वेगवेगळे फायदे पाहा..(drawing rangoli is very useful for physical and mental health)

benefits of drawing rangoli, drawing rangoli is very useful for physical and mental health | दारासमोर दररोज रांगोळी काढण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? विज्ञान सांगते की...

दारासमोर दररोज रांगोळी काढण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? विज्ञान सांगते की...

Highlightsमेंदूचा डावा आणि उजवा असे दोन्ही भाग रांगोळी काढताना कार्यान्वित होतात. ही गोष्ट मानसिक विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरते, असं डॉ. जोशी यांनी सांगितलं आहे.

कोणताही सण असो किंवा एखादं धार्मिक कार्य, शुभ कार्य असो.. त्याची सुरुवात नेहमी रांगोळी काढूनच हाेते. दारासमोर छानपशी रांगोळी घातलेली दिसली की आपोआपच सकारात्मक विचार येतात. त्यामुळेच दारात रोज प्रसन्न रांगोळी घालण्याची प्रथा- परंपरा आपल्याकडे आहे. पण आता काळानुसार ती थोडी मागे पडत चालली आहे. पण अजूनही सणावाराला का असेना पण आपण हमखास रांगोळी काढतोच (benefits of drawing rangoli). रांगोळी काढणं आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती उपयुक्त ठरतं, ते पाहा...(drawing rangoli is very useful for physical and mental health)

 

रांगोळी काढल्याने मनाला आणि शरीराला किती वेगवेगळे प्रकारचे फायदे होतात, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ celebrity_katta या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

कुंडीतल्या जोमानं वाढलेल्या रोपांवर पानं कुरतडणारी अळी पडली? 'हा' सोपा उपाय करा- अळी गायब

यामध्ये डॉ. वर्षा जोशी असं सांगत आहेत की रांगोळी काढण्यासाठी आपण खाली जमिनीवर बसतो. यामुळे गुडघ्यांची हालचाल होते. त्यामुळे सकाळी- सकाळी आपोआपच गुडघ्याचाही व्यायाम होतो. रांगोळीसाठी आपण हाताच्या बोटांचे समोरचे टोक वापरतो. विज्ञानानुसार असं सिद्ध झालं आहे की बोटांच्या समाेरच्या भागाची आपण जेवढी हालचाल करतो, तेवढा आपला मेंदू विकसित होत जातो. 

 

विज्ञानानुसार मेंदूचा डावा भाग हा विज्ञान आणि गणिताशी संबंधित असतो. तर उजवा भाग हा कलाप्रकारांशी संबंधित असतो. रांगोळी काढणे ही एक कला आहे. पण त्यासोबतच ती सुसंगत यावी, यासाठी तिचा प्रत्येक भाग बरोबर माप घेऊन काढला जातो.

गौरींना साडी नेसवणं अवघड वाटतं? १ सोपी ट्रिक- ५ मिनिटांत साडी नेसवून गौरींना करा तयार 

म्हणजेच गणित आणि कला या दोन्ही गोष्टी रांगोळी काढत असताना एकत्रित येतात. त्यामुळे मेंदूचा डावा आणि उजवा असे दोन्ही भाग रांगोळी काढताना कार्यान्वित होतात. ही गोष्ट मानसिक विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरते, असं डॉ. जोशी यांनी सांगितलं आहे.


 

Web Title: benefits of drawing rangoli, drawing rangoli is very useful for physical and mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.