कामाच्या ठिकाणी असो किंवा घरी असो. लहान सहान गोष्टींवरून कोणीही काही बोललं तर आपण लगेच मनावर येतो. कधी आपला पूर्ण दिवसच यामुळे खराब जातो. दिवसभरात आपल्यासोबत काय काय चांगलं घडलं ते लक्षात न ठेवता आपलं काय चुकलं असावं, लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील हेच विचार सतत डोक्यात येत असतात (Mental Health Tips)
मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं सध्या खूपच कठीण झालंय. त्यात सोशल मीडियाच्या अतिवापरानं अनेकदा आपल्यात काहीतरी कमतरता आहे का असं वाटतं. मानसिक आरोग्य उत्तम ठेवून कायम आनंदी राहण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. (What are 5 ways to improve mental health)
लोक काय बोलतात याचा आपण विचार का करतो?
इतर लोक आपल्याबद्दल चांगलं, वाईट जे काही बोलत असतील याबद्दल जाणून घेणं खूपच नॉर्मल आहे. पण सतत यावरच लक्ष देणं चुकीचं आहे यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं. कारण कोणत्याही विषयाबद्दल ओव्हर थिंकिंग घातक ठरतं. याचा परिणाम तुमच्या व्यवक्तीमत्वावरही होतो.
सेल्फ रिस्पेट
काहीजणांचा संपूर्ण दिवस लोकांना काय वाटेल, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील. कोणी आपल्यावर हसेल का. जर कोणी काही बोल्लं तर लगेच इगोशी जोडलं जातं. जर तुम्हाला कोणी काही बोल्लं तर याचा जास्त विचार न करता तिथेच सोडून द्या. आयुष्यात अशा गोष्टी होत राहतात असं स्वत:ला सांगून तिथेच विषय संपवा
प्रत्येक गोष्टीसाठी स्वत:ला दोष देऊ नका
जर आपल्याला काही गोष्टी जमल्या नाही किंवा एखाद्या ठिकाणी हवंतस यश मिळालं तर नाही तर मी काहीच कमावले नाही, हा माझा दोष आहे. असं म्हणत आपण स्वत:ला दोष देतो. समोरच्या व्यक्तीनं आपल्याबद्दल वाईट म्हटलं तरी आपण स्वत:चे दोष दाखवतो. अशावेळी लोकांचे शब्द मनावर घेऊन नाराज होण्यापेक्षा स्वत:ला बिल्ड अप करण्यासाठी प्रयत्न करा. स्वत:बद्दल नेहमी सकारात्मक विचार करा.
बालपण
लहानपणी पालक जर दोन भावंडांमध्ये सतत तुलना करत असतील. तुलना करून सतत फटकारले जात असेल तर मुलं प्रत्येक गोष्ट मनावर घेतात. मोठं झाल्यानंतरही त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो.
सामाजिक प्रतिमा
लहान सहान गोष्टींवरून आपली समाजात प्रतिमा कमी होईल का, याची नेहमी काळजी वाटते. यामुळे लोक काळजीत असतात. जर तुम्ही पुरेपूर प्रयत्न करत असाल आणि तुमचं काही चुकतंय असं तुम्हाला वाटत नसेल. लोकांचा जास्त विचार करू नका.
परफेक्ट बनण्याची इच्छा
नेहमी परफेक्ट बनण्याच्या इच्छेमुळे एखाद्या व्यक्तीला त्याची सतत प्रशंसा व्हावी असं वाटतं. त्याचे दोष कळल्यानंतर ते लगेच भावूक होतात. याव्यतिरिक्त ताण, थकवा इतर गोष्टींमुळेही लोक प्रत्येक गोष्टी मनावर घेतात.
उपाय
१) जर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर त्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोला.
२) भावनांवर नियंत्रण ठेवा. सहकाऱ्यांना सगळ्या गोष्टी सांगू नका
३) इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याचा अतिविचार करू नका
४) स्वत:चा आदर करा
५) एखादी गोष्ट पटली नाही तर ती मन मोकळेपणानं बोला.