Join us  

#BeTheChange : मनासारखं जगायचं तर वय नाही, हवी हिंमत! टाका, एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2022 12:59 PM

सगळ्यात आपण आपल्यावर प्रेम करणे, आपल्या आवडीनिवडी जपणे, स्वत:साठी जगणे या गोष्टी करायला विसरतो. या महिला दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत सखी’तर्फे आपण #BeTheChange हा उपक्रम सुरु केला आहे.

ठळक मुद्देआपल्या आयुष्यातील हे बदल फार छोटे असतात पण ते खूप मोठं आणि महत्त्वाचं काम करुन जातात. आपल्या आनंदाचा रस्ता आपणच शोधून काढत रोजचा दिवस नव्या उमेदीनं आणि उत्साहानं करुयात की सुंदर.

महिला दिवस (८ मार्च) आला की आपण सगळ्याच महिलांचा उदो उदो करतो. ती कशी महान आहे, आपल्या आयुष्यात तिचे स्थान किती महत्त्वाचे आहे या सगळ्याचे गोडवे आपण गातो. पण खरंच रोजच्या आयुष्यात आपण तिला तितका मान, सन्मान देतो का? इतरांनी देण्यापेक्षा आपण स्वत: तरी आपल्याला स्त्री म्हणून किंवा अगदी व्यक्ती म्हणून तितके महत्त्व देतो का? तर अनेकींचे उत्तर हे नाही असेच असेल. कारण कधी आई म्हणून तर कधी बायको म्हणून कधी बहिण म्हणून तर कधी मुलगी म्हणून आपण कायम कोणासाठी तरी झटत असतो. पण या सगळ्यात आपण आपल्यावर प्रेम करणे, आपल्या आवडीनिवडी जपणे, स्वत:साठी जगणे या गोष्टी करायला विसरतो. या महिला दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत सखी’तर्फे आपण #BeTheChange हा उपक्रम सुरु केला आहे. 

आपल्यातील अनेक जणी मराठी सिरीयल्स फॉलो करत असतील. रोजच्या रोज पाहणे होत नसेल तरी घरातील मंडळी पाहतात म्हणून त्यातील प्रमुख अभिनेत्रींची नावे, त्यांची भूमिका तरी आपल्याला नक्की माहित असतील. #BeTheChange यामध्ये आपण या अभिनेत्रींना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटणार आहोत आणि आपल्या आजुबाजूची बंधने तोडून उंच भरारी घेणाऱ्या या अभिनेत्रींविषयी आणि त्यांच्या कामाविषयी जाणून घेणार आहोत. या अभिनेत्री आहेत राजा राणीची जोडी मधील संजू, सुख म्हणजे नक्की काय असतं मधली गौरी, जीव माझा गुंतला मधील अंतरा, आई कुठे काय करते मधली अरुंधती कदाचित यातली एखादी स्टोरी तुमच्याशी रिलेट होऊ शकते आणि तुम्हीही तुमच्या आजुबाजूला असलेली बंधने तोडून मोकळा श्वास घेण्याचा निर्णय घेऊ शकता. 

मूळात रोज नव्या दमानं, नव्या उत्साहानं जगायचं असेल तर आयुष्यात बदल हा हवाच. हा बदल आपल्या आजुबाजूची परिस्थीती, लोकं यांच्यापेक्षा आपणच आपला घडवला तर? दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर आपलं आनंदी असणं कशाला अवलंबून असायला हवं. आपणच आपल्या मनाप्रमाणे जगूयात की. आपणच करुयात की आपल्यावर मनापासून प्रेम. इतकंच नाही तर आपल्या आनंदाचा रस्ता आपणच शोधून काढत रोजचा दिवस नव्या उमेदीनं आणि उत्साहानं करुयात की सुंदर. असं झालं तर आपल्याला आजुबाजूला काहीही झालं तरी फारसा फरक पडणार नाही आणि आपण आतून खूश राहू. आपल्या आयुष्यातील हे बदल फार छोटे असतात पण ते खूप मोठं आणि महत्त्वाचं काम करुन जातात. या सगळ्या प्रवासात आपल्याला मिळालेलं यशही आपलं असेल आणि अपयशही. थोडे धडपडू सुरुवातीला पण एकदा हे जमलं की मग आपल्यासारखी उंच भरारी आपणच घेऊ शकू. 

टॅग्स :महिलाजागतिक महिला दिन