Lokmat Sakhi >Mental Health > आयुष्यात खूप यशस्वी व्हायचंय? सकाळी ३ मिनिटांत ३ गोष्टी करा; बी.के शिवानी सांगतात यशाचं सिक्रेट

आयुष्यात खूप यशस्वी व्हायचंय? सकाळी ३ मिनिटांत ३ गोष्टी करा; बी.के शिवानी सांगतात यशाचं सिक्रेट

BK Shivani Suggest These 3 Things To do After Wake Up : माझ्या आयुष्यात  जे काही  होत आहे त्यात माझे हितच सामावलेले आहे असा सकारात्मक विचार करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 04:50 PM2024-02-12T16:50:52+5:302024-02-12T17:09:52+5:30

BK Shivani Suggest These 3 Things To do After Wake Up : माझ्या आयुष्यात  जे काही  होत आहे त्यात माझे हितच सामावलेले आहे असा सकारात्मक विचार करा.

BK Shivani Suggest These 3 Things To do After Wake Up Every Day Can Change Life Completely | आयुष्यात खूप यशस्वी व्हायचंय? सकाळी ३ मिनिटांत ३ गोष्टी करा; बी.के शिवानी सांगतात यशाचं सिक्रेट

आयुष्यात खूप यशस्वी व्हायचंय? सकाळी ३ मिनिटांत ३ गोष्टी करा; बी.के शिवानी सांगतात यशाचं सिक्रेट

तुम्ही जसा विचार करता तसंच वळण तुमच्या आयुष्याला मिळते. (Life Changing Things To do) आयुष्यात बदल घडवण्यासाठी विचार करण्याची पद्धत बदलणं फार महत्वाचे असते. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तुमच्याकडे बराचवेळ असतो. पूर्ण दिवसभराच्या वेळेला फक्त २४ तास समजण्याची चूक करू नका. (Motivational Speaker) मोटिव्हेशनल स्पिकर बीके (BK Shivani) शिवानी यांनी ३ मिनिटांच्या अफरमेशन किंवा दृढ संकल्पासह दिवसाची सुरूवात करण्याचा सल्ला दिला आहे. हे 3 मिनिटं तुमचं जीवन बदलण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. (BK Shivani Suggest These 3 Things To do After Wake Up Every Day Can Change Life Completely)

रोज सकाळी 'या' 3 गोष्टी करा

सिस्टर शिवानी सांगतात की प्रत्येक व्यक्तीनं दिवसाची सुरूवात परम शक्तीला स्मरून करायला हवी. तिच्या आशिर्वादाने आभार व्यक्त करायला हवेत. आज तुम्ही, तुमचे कुटुंब जिवंत आहे. यासाठी ईश्वराला धन्यवाद करायला हवे.  यामुळे डोक्यात नकारात्मक विचार येणार नाहीत आणि संतुष्टी राहील. बोलूनही तुम्ही आभार व्यक्त करू शकता. 

स्वत:ला चांगले वाटतील असे विचार ठेवा

पुढच्या मिनिटाला सिस्टर शिवानी आत्म सशक्तिकरण, आत्मविश्वास आणि सकारात्कमतेला पुष्टी देण्याचा सल्ला देतात. यादरम्यान तुम्ही चांगले गुण, विश्वास  यावर लक्ष केंद्रीत करा. मी कोणत्याही संकटांचा सामना करू शकते. माझ्या आयुष्यात  जे काही  होत आहे त्यात माझे हितच सामावलेले आहे असा सकारात्मक विचार करा.  यामुळे आत्मबल वाढवण्यास मदत होते. 

हट्ट पूर्ण केला नाही की मुलं चिडतात-उलटं बोलतात? ३ गोष्टी करा, राग शांत होईल-गुणी होतील मुलं

पूर्ण दिवसाचे लक्ष्य ठरवा

सकाळी पूर्ण दिवसाचे लक्ष्य ठरवा. पूर्ण दिवसात तुम्हाला  काय काय करायचे आहे. काय नाही याचे प्लॅनिंग तयार करून ठेवा. तुम्हाला पूर्ण दिवस ताजंतवानं वाटेल.  याशिवाय छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमचा मेंदू तयार राहील. मेंदू संतुष्ट राहील. डिप्रेशन येणार नाही.

मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल

नातेसंबंधात असताना पार्टनरच्या निगेटिव्ह गोष्टींबाबत विचार करू नका.  जर  कोणीही तुमच्याशी चुकीची वागत असेल, खोटं बोलत असेल तर  तुम्हाला त्यांच्याशी तसेच वागावे असे करू नका. कारण दुसरे काय करतात यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही तुम्ही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता. कोणीही कसेही वागले तरी तुम्ही चांगले वागणे सोडू नका.

Web Title: BK Shivani Suggest These 3 Things To do After Wake Up Every Day Can Change Life Completely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.