Lokmat Sakhi >Mental Health > तिसऱ्या कोरोना लाटेची फार भीती वाटतेय, टेन्शन आलंय? धिराने घेण्याचे ५ उपाय सांगतेय समीरा रेड्डी

तिसऱ्या कोरोना लाटेची फार भीती वाटतेय, टेन्शन आलंय? धिराने घेण्याचे ५ उपाय सांगतेय समीरा रेड्डी

Health tips: कोरोना किंवा इतर काहीही कारण असो आपल्यापैकी अनेकांना कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं किंवा एन्झायटीचा खूप जास्त त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीच काही घरगुती उपाय सांगितले आहेत बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Bollywood actress Sameera Reddy) हिने. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 04:06 PM2022-01-07T16:06:23+5:302022-01-07T16:07:47+5:30

Health tips: कोरोना किंवा इतर काहीही कारण असो आपल्यापैकी अनेकांना कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं किंवा एन्झायटीचा खूप जास्त त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीच काही घरगुती उपाय सांगितले आहेत बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Bollywood actress Sameera Reddy) हिने. 

Bollywood actress Sameera Reddy has given 5 solutions for anxiety of corona third wave | तिसऱ्या कोरोना लाटेची फार भीती वाटतेय, टेन्शन आलंय? धिराने घेण्याचे ५ उपाय सांगतेय समीरा रेड्डी

तिसऱ्या कोरोना लाटेची फार भीती वाटतेय, टेन्शन आलंय? धिराने घेण्याचे ५ उपाय सांगतेय समीरा रेड्डी

Highlightsकोणत्याही गोष्टीचं जेव्हा टेन्शन आलं असेल किंवा खूप जास्त एन्झायटी होत असेल, तरी देखील समीराने सांगितलेले उपाय प्रभावी ठरू शकतात. 

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा खूप लोकांनी कोरोनाचा धसका घेतला होता. अनेक लोकांचं आजारपण हे कोरोनाच्या संसर्गामुळे नाही, तर फक्त त्यांनी घेतलेल्या टेन्शनमुळे वाढलं होतं... यानंतर दुसऱ्या लाटेत कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (delta verient of corona) आला आणि त्यानेही अनेकांना घाबरवून साेडलं. नात्यातल्या, परिचयातल्या माणसांचं कोरोनामुळे निधन झालेलं पाहून तर अनेकांना खूपच धडकी भरली होती.
 आता पुन्हा थोड्या अधिक प्रमाणात तशीच परिस्थिती येऊन ठेपली आहे.

 

ओमिक्रॉन (omicron) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट सध्या जगभरातच सक्रिय झाला असून त्यामुळे अख्खे जग धास्तावले आहे. भारतातही कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत स्वत:ची, कुटूंबाची आणि जवळच्या नातलगांची काळजी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पण खूप जास्त चिंता करू नका आणि या काळजीचं रूपांतर टेन्शनमध्ये किंवा एन्झायटीमध्ये होऊ देऊ नका. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं टेन्शन आलं असेल तर घरच्याघरी बसून काय करावं हे सांगतेय अभिनेत्री समीरा रेड्डी..

 

समीरा रेड्डी सोशल मिडियावर (social media) चांगलीच ॲक्टीव्ह असते आणि त्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना नेहमीच हेल्थ, डाएट, ब्यूटी, फिटनेस याविषयी मार्गदर्शन करत असते. आपण आहोत तसे स्वत:ला स्विकारा. स्वत:मधले गुण- दोष जाणून घ्या आणि त्याच्यासकट स्वत:वर भरभरून प्रेम करा.. असा सकरात्मक दृष्टीकोन नेहमीच तिचे व्हिडियो पाहून मिळत असतो. आता नुकताच तिने तिचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. यामध्ये तिने एन्झायटी दूर करण्यासाठी साधे सोपे उपाय सांगितले आहेत. खरंतर कोणत्याही गोष्टीचं जेव्हा टेन्शन आलं असेल किंवा खूप जास्त एन्झायटी होत असेल, तरी देखील समीराने सांगितलेले उपाय प्रभावी ठरू शकतात. 

 

एन्झायटी कमी करण्यासाठी समीराने सांगितलेले उपाय...
एन्झायटीचा त्रास सुरू झाल्यावर समीरा हे सगळे उपाय स्वत:वर करून बघते. ''Third Wave Anxiety🥺I feel it too. I’m focused on staying calm amidst the noise🙏🏼Fitness is also being aware of your mental health...'' असं सांगत तिने ती करत असलेले हे उपाय सांगितले आहेत. बघा तरी तिचे हे उपाय आपल्यालाही सहज जमू शकतात. 
१. डिप ब्रिथिंग करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
२. योगा करा.
३. मनात काय काय विचार येत आहेत ते एका डायरीत लिहून काढा आणि नकारात्मक विचारांना दूर करा.
४. घरातल्या लहान मुलांसोबत डान्स करा..
५. मुड बदलण्याचा प्रयत्न करा...
 

Web Title: Bollywood actress Sameera Reddy has given 5 solutions for anxiety of corona third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.