- समिंदरा हर्डीकर -सावंत
आपले असे कितीतरी मित्रमैत्रिणी असतात ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटलेलो नाही, फेसबुक -व्हॉट्सॲप फ्रेण्ड्स झाले. पण दोस्ती अशी की खूप गप्पा मारतो. खूप शेअरिंग आहे.रोज बोलणं होतं, आपण कधी भेटलोलो नाही असं वाटतही नाही. तेच ऑफिस सहकाऱ्यांचं. त्यांच्याशी स्पर्धा असते, पण काहींशी खाशी दोस्तीही होते. प्रोफेशनल रहायचं ठरवलं आणि कामापुरतं नातं असं मनाशी घोकलं तरी काही ना काही शेअिरंग होतंच. दोस्ती होते. गप्पा-विनोद, शेअरिंग सारं सुरू होतं. आपल्या पर्सनल गोष्टीही सांगितल्या जातात. गिफ्ट देणंघेणं, पार्ट्या, पिकनिक सगळं सुरु होतं.पण व्यक्तिगत आयुष्यात आपण मैत्रीकडून ज्या अपेक्षा ठेवतो, त्याच अपेक्षांचा या व्यावसायिक मैत्रीत ठेवता येतात का? आणि ठेवल्याच तर घोळ, मनस्ताप अटळ असं पुढे होतं का?
आणि मग आपणही म्हणतोही की मी सगळ्यांशी इतकी फ्रेण्डली वागते, किती करते सगळ्यांचं तरी लोक माझ्याशक्षच का असं वागतात?त्याचं कारण हे की, मैत्री आणि ऑफिस मैत्री यात आपण गल्लत करतो. आणि पस्तावतोही तसं व्हायचं नसेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा.1) मैत्री झाली एखाद्याशी किंवा एखादीशी तरी हे लक्षात ठेवा की आपण आधी कलीग्ज आहोत मित्र नंतर. रोजची कामाची आव्हानं, ऑफिसचा मूड, वरिष्ठांच्या अपेक्षा , आपली धावपळ हे त्याला/तिला कळतं. पण म्हणून हे विसरू नका की आपण सहकारी आहोत,प्रसंगी स्पर्धकही आहोत. त्यामुळे या प्रोफेशनल मैत्रीतही स्पर्धा असणारच! आपले विक पॉइण्ट नोंदवले जाणारच. आपणही ते इतरांचे नोंदवतोच. त्यामुळे आपण किती आणि काय शेअर करतो आहोत, याचा विचार करा.2) मैत्नी आपल्या ठिकाणी आणि काम आपल्या ठिकाणी. सहकार्य करा, पण चुकांना उत्तेजन देऊ नका. गॉसिप करु नका. पर्सनल आयुष्यात हस्तक्षेप टाळा, सल्ले देऊ नका. पर्सनल शेअरिंग असलं तरी आपला संबंध पर्सनल आयुष्याशी नाही हे लक्षात ठेवा. 3) याचा अर्थ सहकाऱ्यांशी कामापुरती, कॅलक्युलेटिव्ह मैत्नी करायची का? तर असं नाही. मैत्री खरीच हवी, पण त्यात अपेक्षा नकोत, ऑफिस राजकारण नको. अनेकजण नकळत मित्नांबरोबर राजकारण करतात. त्याचं गॉसिप करतात, डबल गेम करतात. आपण असं करतोया का? किंवा कुणी आपल्याशी तसं वागतं आहे का? याचा विचार करा. 4) काम म्हटलं की प्रमोशन, प्रोजेक्ट, बॉसची नाराजी, फेवरिटिझम हे येतंच. सहकारी मित्रमैत्रिणीला आणि तुम्हाला सारखीच संधी मिळेल असं काही नाही. कधी तो तुमच्या पुढेही जाऊ शकतो, कधी तुम्ही. हे स्वीकारण्याची आणि पचवण्याची ताकद तुमच्यात आहे का? जळकुकडेपणा होतोय का? आपलाहे पहा.5) मी इतकी सच्ची मैत्री केली, पण तरी तो लोक माझ्याशी पॉलिटिक्सच करतात असं वाटत असेल तर आपलं काय चुकलं हे आधी पहा.6) या मैत्रीविषयी पझेसिव्ह होऊ नका. कामापलिकडे आपले मित्रमैत्रिणी आहेत हे विसरायचं नाही.7) प्रोफशनल मैत्री ही सोपी गोष्ट नाही, ती कसरत जमणार असेल तर मैत्री करावी नाहीतर कामापुरते उत्तम नाते ठेवावे. आपले काम चोख करावे. 8) सहकाऱ्यांच्या रूपात सच्चे मित्र मिळाले तर उत्तमच, तसे मित्र स्वत:ही व्हा, पण ही वाट सोपी नाही हे ही लक्षात ठेवा.