सकाळी गजर वाजताच उठा, त्यानंतर धावतपळत घरातली कामं, स्वयंपाक उरका, मुलांना शाळेसाठी तयार करा, त्यांचा डबा भरा, नवऱ्याच्या चहाचं, नाश्त्याचं आणि डब्याचं बघा, त्यानंतर उरलीसुरली कामं करून स्वत:चा डबा घेऊन धावतपळत ऑफिस गाठा.. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी, मुलांचा अभ्यास आणि इतर कामं असतातच. अशा चक्रामध्ये अनेक महिला अविरतपणे फिरत असतात. यातून स्वत:साठी १० मिनिटांचा शांत वेळ काढणंही अनेकींना जमत नाही. हा वेळ कसा काढायचा आणि त्या १० ते १५ मिनिटांसाठी स्वत:ला रिलॅक्स कसं करायचं याचा एक खास उपाय अभिनेत्री कविता लाड यांनी सांगितला आहे.
अभिनेत्री कविता लाड हिच्या एका मुलाखतीचा एक छोटासा भाग aarpaar.online या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये कविता यांनी जो उपाय सांगितला आहे तो खरोखरच बहुतांश महिलांच्या उपयोगी ठरणारा आहे.
रोज १ वेलची खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, आजार दूर पळून तब्येत राहील ठणठणीत
यामध्ये कविता असं सांगतात की त्यांना स्वत:च्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली आहे आणि ती म्हणजे जर तुम्हाला फक्त तुमचा असा वेळ हवा असेल आणि तो ही अगदी शांत, कोणताही व्यत्यय न आणणारा तर त्यासाठी घरातली इतर मंडळी उठण्याच्या १५ मिनिटे आधी उठा.
सकाळच्या प्रसन्न शांततेत इतर कोणी उठण्याच्या आधी स्वत:चं पटापट सगळं आवरा आणि फक्त स्वत:साठी चहा- कॉफी जे काय हवं ते करा आणि घरातल्या एखाद्या तुमच्या आवडीच्या ठिकाणी जाऊन बसा. तिथे बसून हळूहळू चहा- कॉफी प्या..
दूध प्यायला आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा- मुलांनाही द्या, हाडं बळकट होतील
शांत घरावर एक नजर मारा.. बागेत, बाल्कनीमध्ये बसला असाल तर रोपांकडे, फुलांकडे, आकाशाच्या रंगाकडे डोळे भरून बघा. खूप खूप शांत वाटेल. मन हलकं होईल आणि त्यानंतर कामं करण्यासाठी जी एनर्जी मिळेल ती दिवसभर पुरणारी असेल. कधीतरी असं एकदा करून बघायला हरकत नाही. उपाय सोपा आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्वत:ची फक्त १५- २० मिनिटं द्यायची आहेत.. पण त्या १५ मिनिटांत मात्र पुढच्या सगळ्या कामांचा झंझावात तुमच्या मनापर्यंत येऊ देऊ नका.. काही मिनीटांपुरतं कामांपासून स्वत:ला थोडं अलिप्त ठेवा आणि शांततेचा आनंद घ्या..