Lokmat Sakhi >Mental Health > '10 दिवसात मॅजिकल ट्रान्सफाॅर्म' हे दावेच झूठ, विसरा डाएट फॅड; अंकिता सांगतेय फिट सिक्रेट

'10 दिवसात मॅजिकल ट्रान्सफाॅर्म' हे दावेच झूठ, विसरा डाएट फॅड; अंकिता सांगतेय फिट सिक्रेट

आरोग्य कमवायचं, म्हणजे फिटनेस ठेवावा लागेल आणि फिटनेससाठी डाएट मस्ट.. असा आरोग्याचा कप्पेबंद विचार केल्यानं ना आरोग्य मिळत ना आनंद. आनंद आणि स्वातंत्र्य देणारं आरोग्य कसं कमवायचं याच मंत्र अंकिता कोंवर देते. काय मंत्र आहे तो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 02:12 PM2022-01-06T14:12:37+5:302022-01-06T14:23:38+5:30

आरोग्य कमवायचं, म्हणजे फिटनेस ठेवावा लागेल आणि फिटनेससाठी डाएट मस्ट.. असा आरोग्याचा कप्पेबंद विचार केल्यानं ना आरोग्य मिळत ना आनंद. आनंद आणि स्वातंत्र्य देणारं आरोग्य कसं कमवायचं याच मंत्र अंकिता कोंवर देते. काय मंत्र आहे तो?

The claim 'Magical Transform in 10 Days' is a lie, forget diet fad; Ankita Konwar tells fitness secret | '10 दिवसात मॅजिकल ट्रान्सफाॅर्म' हे दावेच झूठ, विसरा डाएट फॅड; अंकिता सांगतेय फिट सिक्रेट

'10 दिवसात मॅजिकल ट्रान्सफाॅर्म' हे दावेच झूठ, विसरा डाएट फॅड; अंकिता सांगतेय फिट सिक्रेट

Highlightsआरोग्य आपल्याला मनमुराद जगण्याचं स्वातंत्र्य देतं.डाएट फॅडनं वजन नाही जगण्यातला आनंद कमी होतो.आपलं जगणं पोषण मुल्यं, कृतज्ञता आणि प्रेमान ओतप्रोत भरलेलं हवं. 

वजन कमी करणं म्हणजे अमूक एक डाएट फाॅलो करणं, डाएटनुसार एक किंवा अनेक पदार्थ आहारातून वजा करणं, वजन कमी करणं म्हणजे ठराविक 15 दिवस, 10 दिवस, 8 दिवस विशिष्ट प्रकारचं पाणी पिऊन , रात्री एखादं ज्यूस पिऊन, एखादा पदार्थ खाऊन स्वत:वर प्रयोग करणं.... वजन कमी करायचं म्हटलं, की ही अशीच खोटी आश्वासनं आपल्याला भुरळ घालतात. आपली फसवणूक होते आहे, हे माहीत असूनही डाएटचं भूत काही डोक्यातून उतरत नाही. हे डाएट नाही तर और सही असं म्हणत महिन्याला दोन महिन्याला डाएट चेंज केलं जातं. या गोष्टीला डाएट करणं असं म्हणत नाही तर याला म्हणतात फॅड डाएट. आतापर्यंत अनेक पोषण तज्ज्ञांनी फॅड डाएटमुळे होणारे नुकसान सांगितलं आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करुन वजन कमी करण्यासाठी विशिष्ट डाएट करणं यालाच महत्व दिलं जातं आहे. याबाबतीत अंकिता कोंवर ( बरोबर.. मिलिंद सोमणची ) बायको हिने डाएट, आरोग्य आणि जगण्याकडे बघण्याचा स्वत:च्या अनुभवातून नवीन दृष्टिकोन दिला आहे. अंकिता जे सांगते आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यावर, आपल्या जगण्यावर असे चुटपूट डाएट,10- 15 दिवसांचा नियम पाळून होणारा बदल परिणाम करत नाही असं अंकिताचं स्पष्ट मत आहे. स्वत:च्या अनुभवातून आनंदी आणि आरोग्यदायी जगण्याचा मार्ग अंकितानं नुकताच आपल्या फेसबुक पोस्टमधून सगळ्यांसाठी शेअर केला आहे. काय म्हणते अंकिता?

Image: Google

अंकिता म्हणते, की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा फॅड डाएटस आणि 10 दिवसांमधे संपूर्ण रुप पालटून टाकण्याचे दावे करणारे उपाय खरंच काहीच कामाचे नसतात. जी गोष्ट आपण सजगपणे आणि सातत्याने करतो, आपण सजगपणे जगतो .. केवळ याच गोष्टीचा आपल्यावर चांगला परिणाम होवू शकतो. 

आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा नवा असतो. मग तो नवीन वर्षाचा पहिला दिवसअसो की नसो. 

प्रत्येक दिवशी आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं. अनेक लोकांची पदार्थांसोबत स्वत:च्या शरीरासोबत लव्ह ॲण्ड हेट रिलेशनशिप असते. पण सुदैवानं ही गोष्ट माझ्या बाबतीत घडली नाही. 

माझं वजन काही किलोनं वाढलेलं असो किंवा दिवसेंदिवस ते कमी होत असो याचा कसलाही परिणाम माझ्यावर होत नाही. मी माझ्या शरीरावर प्रेम करते. जो माणूस जिवंत आहे त्याच्या वजनात चढउतार होणं ही सामान्य बाब आहे. पण म्हणून याचा अडथळा आपल्या निवड स्वातंत्र्यात यायला नको. आरोग्य हे नेहमी जगण्याचं स्वातंत्र्य देतं, नियम आणि बंधनं घालत नाही.

Image: Google 

पण जेव्हा आपण खाण्यापिण्याचा विचार करतो , तेव्हा अनेकांना मी मुक्तपणे खाण्याचा आनंद घेत असलेला बघून आश्चर्य वाटतं. माझ्यासाठी  पदार्थ, अन्न म्हणजे उत्सव आहे. मी कायम पदार्थांशी निगडित आनंदी विचार करते.  जे काही मी खाते ते भरपूर प्रेमानं आणि कृतज्ञता बाळगून खाते. 

पण मला ते गॅस भरलेली थंडं पेयं प्यायला आवडत नाही, आकर्षक पॅकेटमधे भरलेले फॅन्सी पदार्थ आणि अल्कोहोल तर अजिबातच नाही. या तीन गोष्टी सोडल्या तर सर्व मला आवडतं.

Image: Google

आपलं आरोग्य आपल्याला जे आवडतं, आपण ज्यावर प्रेम करतो त्या गोष्टींचा आनंद घेण्यास सक्षम करतं. मग तो खाण्याचा पदार्थ असो किंवा  एखादं काम जे आपण  निवडलेलं आहे. आपलं शारीरिक सौंदर्य  ( स्लिम फिट वगैरे असणं) म्हणजे  चांगलं आरोग्य नव्हे. शारीरिक सौंदर्य हा चांगल्या आरोग्याचा एक भाग किंवा चांगल्या आरोग्याचा एक परिणाम म्हणू शकतो. 

आपण आपल्यासाठी जे उत्तम म्हणून निवडतो , ते उत्तम असेल तर आपोआपच आपली जीवनशैली बनतं, जगण्याची पध्दत होतं. पोषण मूल्यं, कृतज्ञता आणि प्रेम  यांनी ओतप्रोत भरलेली जीवनशैली उत्तम. ही जीवनशैलीचं उत्तम आरोग्य प्रदान करते. 

आशा करते. की 2022 मधे फॅड डाएटचं भूत आणि 10 दिवसात  कायापालट यासारख्या थापांपासून आपण दूर राहाल. बेबंद आनंदी जगणं हेच सुख, हेच चांगलं आरोग्य. 

अंकिता आपल्या पोस्टचा शेवट करताना म्हणते मुक्त जगा.. या पोस्टबरोबर गुळाची जिलबी आणि केशरदुधासोबत काढलेला आपला फोटो पोस्ट केला आहे. 

अंकिताची ही पोस्ट वाचून आणि तिचा फोटो पाहून  मुक्त जगणं हे किती आनंद देणारं असू शकतं आणि ते किती सहज असू शकतं हे कळतं.

Image: Google

फिटनेस म्हणजे स्लिम ट्रीम फिगर, स्लिम ट्रिम फिगर म्हणजे चांगलं आरोग्य अशा चौकटीत आपण आरोग्याला अडकवून टाकलं आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आरोग्याचा विचार करतो तेव्हा कोणता पदार्थ सोडायचा आणि कोणता अवघड नियम पाळायचा याचाच कपाळवर आठ्या घालून विचार करतो. पण अंकितानं साचेबध्द चौकटीतून आपल्या आरोग्य विचाराला आणि एकूणच स्वत:ला मुक्त करण्याचा मार्ग सांगितला आहे. तिने सांगितलेला मुक्त जगण्याचा मार्ग अवलंबणं अवघड तर नक्कीच नाही!

Web Title: The claim 'Magical Transform in 10 Days' is a lie, forget diet fad; Ankita Konwar tells fitness secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.