सुरभी केळकर (चिकित्सा मनोविकासतज्ज्ञ)
कोणालाही मी कधी कुतूहलाने विचारले की "काय म्हणताय, कसे चालले आयुष्य?" तर त्यांचे जे काही उत्तर असेल, ते बऱ्याच वेळा त्यांचे जवळचे नातेसंबंध कसे आहेत, यावर अवलंबून असते. एवढे महत्त्व आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नात्यांचं! आता तुम्ही म्हणाल, नेमकं नात्यांच एवढं महत्त्व का? नाती आपल्याला आधार आणि सहवास पुरवतात, ज्याने आपण आयुष्यातले चढ-उतार सहजपणे ओलांडून जाऊ शकतो. नातेसंबंध आपुलकीच्या भावनेची मूलभूत गरज पूर्ण करतात. सबळ नातेसंबंध कल्याण आणि एकूणच जीवनातील समाधान वाढवू शकतात. ते काहीतरी नवीन शिकण्याच्या आणि वैयक्तिक वाढीसाठी संधी देतात ज्याने वैयक्तिक विकास होतो. अर्थपूर्ण नातेसंबंध अनेकदा जीवनात उद्देश आणि पूर्णतेची भावना देतात. यासगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाची नाती आपण जोपासतो.
नाती, ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. ती माणसाचे आयुष्य सोपे बनवू शकतात आणि अवघडही. सगळ्या नात्यांचं काही न काही वैशिष्ट्य असतं आणि ते आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात.
(Image :google)
नाती कोणती?
१. पाहिलं म्हणजे वैयक्तिक: वैयक्तिक जीवनात महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींशी असलेले यांचा इथे समावेश होतो.
२. व्यावसायिक किंवा प्रोफेशनल संबंध: हे कामाच्या ठिकाणी तयार झालेले संबंध असतात, जसे की सहकारी किंवा क्लायंट. ३. ३.
सामाजिक संबंध: हे आपले शेजारी किंवा क्लब किंवा संस्थांचे सदस्य.
४. ऑनलाइन डिजिटलयुगात ऑनलाइनही ओळखी, स्नेह, नाती जुळतात.
नात्यात काय महत्त्वाचे?
१.विश्वास
२. परस्पर आदर
३. निष्ठा
४. सहानुभूती
५. प्रामाणिक आणि आदरयुक्त संवाद
६. सक्रिय प्रयत्न
७. निरोगी बंधन
८. तडजोड
९. संयम
१०. नात्यात असलेल्या दोघांचा वाढ व विकास.
(Image :google)
नाती घडतात-बिघडतात का?
वर्षानुवर्षांचे संशोधन व अभ्यासात असे आढळून आले आहे की जर जवळच्या नात्यांमध्ये ओढाताण असतील, तर त्याने नैराश्य, चिंता आणि आत्महत्येच्या विचारांचा धोका वाढतो. ही नाते म्हणजेच आपला साथीदार, घरातली माणसे किंवा खूप जिवलग लोक. याउलट, सकारात्मक संवादामुळे आणि शांततापूर्ण नातेसंबंधांमुळे या समस्यांचा धोका कमी होतो. मग नात्यातला आनंद कसा जपायचा?
१. समस्येवर लक्ष केंद्रित करा आणि व्यक्तीवर नाही. बऱ्याचवेळा ती व्यक्ती समस्या नसते, परंतु तिचे वागणे समस्याप्रधान असते.
२. समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्याला न दिसणाऱ्या किंवा न बोलल्या जाणाऱ्या गरजांचा शोध घ्यावा लागेल. त्यांना आपुलकीची, कौतुकाची किंवा फक्त त्यांचे ऐकण्यासाठी तिथे असण्याची गरज असू शकते.
३. शक्य असल्यास दोघांना आवडणारे छंद जोपासा, जेणेकरून तुमचा एक मजबूत बंध विकसित होईल.
४. शक्य तितक्या लवकर तुमचे विवाद सोडवा. तुम्ही जितक्या जास्त काळ गोष्टींचे निराकरण न करता ठेवता तितके जास्त गैरसमज निर्माण होऊ शकतात.
५. जाणीवपूर्वक छोट्या छोट्या गोष्टी करा ज्या त्या व्यक्तीसाठी अर्थपूर्ण असतील.
६. तुमच्या जवळच्या आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. ज्यांना तुम्ही नियमितपणे भेटू शकत नाही अशा लोकांशी सोशल मीडियावर किंवा फोनवर जोडलेले रहा.
७.वाद कमीच होत नसतील, जमवून घेताच येत नसेल तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या!
(चिकित्सा मनोविकासतज्ज्ञ, आयपीएच माईंड लॅब, नाशिक)