आजकाल प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे. अगदी शाळकरी मुलंही त्याला अपवाद नाहीत. मुलांना अभ्यासाचं, करिअरचं टेन्शन (tension) तर त्यांच्या पालकांना नोकरीचा ताण, तिथं आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची भीती.. आजकाल तर रिलेशनशिपमध्येही भयंकर ताणतणाव (stress) अनेक लोकांना सहन करावा लागतोय.. फायनान्शियल स्ट्रेसही (financial stress) अनेकांना आहेच. (anulom vilom for de-stress)
रोज एवढ्या सगळ्या ताणतणावाचं ओझं अंगाखांद्यावर घेऊन वावरायचं, हे अजिबातच सोपं नाही. अनेकांना तर हा ताण रात्रीची शांत झोपही घेऊ देत नाही. रात्री लवकर झोप लागत नाही, झोप लागली तरी शांत झोप होत नाही. सकाळी लवकर जाग येते, असे अनेक त्रास सुरू होतात. झोप अपुरी झाली तर त्यातून निर्माण होणारे आजार आणखीनच धोकादायक असतात. म्हणूनच तर मनावरचा ताणतणाव कमी करून रिलॅक्स होण्यासाठी मलायका अरोराने एक सोपा उपाय सांगितला आहे. तिने नुकतीच एक पाेस्ट सोशल मिडियावर शेअर केली असून यामध्ये ती प्राणायाममधला अनुलोम- विलोम (anulom vilom for de-stress) हा प्रकार करताना दिसते आहे. ताणतणावात जगण्यापेक्षा आणि त्यातून इतर अनेक शारिरीक, मानसिक त्रास मागे लागून घेण्यापेक्षा हे प्राणायाम करून बघा.
कसं करायचं अनुलोम- विलोम?- हे प्राणायाम करण्याच्या किमान २ ते अडीच तास आधी हेवी जेवण केलेले नसावे. सकाळी उठून रिकाम्या पोटी हे प्राणायाम केल्यास अधिक उत्तम.- अनुलोम विलोम करण्यासाठी सगळ्यात आधी पायाची मांडी किंवा पद्मासन घालून सरळ ताठ बसा. डोळे बंद करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा.- उजव्या हाताचा अंगठा व अनामिका व करंगळी या बोटांचा वापर करून अनुलोम- विलोम करतात.- अंगठ्याचा वापर उजवी नाकपुडी बंद करण्यासाठी तर उरलेल्या दोन बोटांचा उपयोग डावी नाकपुडी बंद करण्यासाठी करावा. - सगळ्यात आधी दिर्घ श्वास घ्या. त्यानंतर उजवी नाकपूडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा.- आता डाव्या नाकपुडीनेच पुन्हा श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्या बंद करून काही सेकंद श्वास तसाच ठेवा. त्यानंतर उजव्या नाकपुडीने सोडून द्या. - पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि डाव्या नाकपुडीने सोडावा. हीच क्रिया साधारणपणे १० ते १२ मिनिटे करत रहावी.
अनुलोम- विलोम प्राणायाम करण्याचे इतर फायदे (Benefits of anulom vilom)- शरीरात रक्तशुद्धी होण्यास तसेच रक्ताभिसरण क्रिया अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होते.- श्वसनसंस्थेच्या बळकटीसाठी हे उत्तम प्राणायाम आहे. यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात.- शारिरीक, मानसिक तणाव कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते.- विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढविण्यासाठी उत्तम प्राणायाम.- शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. त्यामुळे साहजिकच संपूर्ण शरीरच तजेलदार, चमकदार होते.