Join us  

तुम्ही डिजिटल अंगठेबहाद्दर अडाणी आहात की डिजिटल स्मार्ट? नोकरी टिकणार की जाणार, त्यावरच ठरेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 5:32 PM

डिजिटल लिटरसी हे नव्या काळातलं सगळ्यात मोठं सॉफ्ट स्किल आहे, मात्र डिजिटल साक्षर असणं म्हणजे नक्की काय? -शिका सॉफ्ट स्किल्स, स्पेशल सिरिज भाग 4 - workplace communication skill

ठळक मुद्दे आपण सकस काही कमवत आणि घडवत असू तर आपण डिजिटल लिटरेट. नाहीतर  स्क्रोल करणारे अंगठेबहाद्दर.

तुम्ही डिजिटल लिटरेट म्हणजे डिजिटल साक्षर आहात का असा प्रश्न कुणी आजकाल विचारला तर लोक विचारणाऱ्यालाच वेड्यात काढतील. म्हणतील ज्याला बोलता येत नाही ते लहान लेकरुनही स्मार्ट फोन ऑपरेट करतं, आणि म्हणे डिजिटल साक्षर आहात का? प्रश्न बिनडोक वाटत असला तरी त्याचं उत्तर इतकं सोपं नाही. दिवसरात्र मोबाइलचा स्क्रिन अंगठ्यानं स्क्रोल करणारे अंगठेबहाद्दर जरी आपण सगळे असलो तरी त्याचा अर्थ आपल्याला आपलं करिअर घडवता येईल आणि जगणं आनंदी करता येईल इतपत डिजिटल साक्षरता असेलच असं नाही. उलट आपण डिजिटली अडाणीच नव्हे तर गुलामही असण्याची शक्यता जास्त आहे. नव्या डिजिटल काळात प्रगती करायची तर आपल्याकडे डिजिटली लिटरसी नावाचं सॉफ्ट स्किल असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

(Image : google)

डिजिटल लिटरसी आणि सॉफ्ट स्किल, म्हणजे काय?

या प्रश्नाचं उत्तर हवं तर आपण स्वत:ल ३ प्रश्न विचारायला हवेत.आपल्या हातात असलेलं डिजिटल साधन आपण नेमकं कशासाठी वापरतो त्यातून आपल्याला काय मिळतं?१. कन्झ्यूमकन्झ्यूम म्हणजे उपभोग तर आपण सगळेच घेतो. रात्रंदिवस स्मार्ट फोन वापरतो. पैशाच्या व्यवहारापासून ते रिल्स पाहण्यापर्यंत अनेक गोष्टी ऑनलाइन करतो. म्हणजे तिथे लाखो गोष्टी असल्या तरी उपभोग कशाचा घ्यायचा हे आपण ठरवतो. मग आपण नेमकं काय कन्झ्यूम करतो आहोत, कंटेट की क्रॅप हे आपण पहायचे. त्यातून आपल्या करिअर आणि पर्सनल ग्रो‌थसाठी काय फायदेशीर ठरतं हे पण आपण घ्यायचे. आपण जर ते करत नसलो तर आपण डिजिटली ढ आहोत असं खुशाल समजा!

२. क्रिएटआपण भसाभसा कन्झ्यूम तर करतो पण क्रिएट काही करतो आहोत का? आपण डिजिटल साधनं वापरुन जर जगभराशी कनेक्ट करु शकतो तर आपण त्यातून क्रिएट काय केलं म्हणजे घडवलं काय? रिल्स करणं म्हणजे केवळ क्रिएट करणं नाही तर विविध साधनं वापरुन आपली कौशल्य ते व्यवसाय वाढवणं हे डिजिटल क्रिएटच्या टप्प्यात जातं, ते आपण करतोय का?

३. कम्युनिकेट आणि इव्हॅल्यूएटडिजिटल माध्यमं आपण संवादासाठी खरंच वापरतो का? आलं काही ढकल पुढे. त्याची खरंखोटं खातरजमाही करत नाही. आपला डिजिटल वापर आपण नीट तपासून पाहत नाही. त्यातून आपण काय कमावलं याचा ताळ करत नाही. वेळ आणि कमाई याचा मेळ घालत नाही तर मग आपण डिजिटल साक्षर नाही. प्रत्येक गोष्ट वेगात, ऑनलाइन, स्मार्टपणे करत वेळ आणि कष्ट वाचवून आपण सकस काही कमवत आणि घडवत असू तर आपण डिजिटल लिटरेट. नाहीतर  स्क्रोल करणारे अंगठेबहाद्दर. आता ठरवा, तुम्ही नक्की कोण आहात?

टॅग्स :डिजिटलकरिअर मार्गदर्शन