Lokmat Sakhi >Mental Health > एकाग्रता आणि उत्तम दृष्टीसाठी करा त्राटक ध्यान, मात्र उत्तम परिणाम हवे तर विसरु नका ३ गोष्टी...

एकाग्रता आणि उत्तम दृष्टीसाठी करा त्राटक ध्यान, मात्र उत्तम परिणाम हवे तर विसरु नका ३ गोष्टी...

Tratak Meditation : 'त्राटक ध्यानधारणा’ करणे सोपे आहे पण ते मनापासून आणि एकचित्ताने करायला हवे, त्यासाठीच या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2023 07:14 PM2023-01-28T19:14:39+5:302023-01-28T19:15:59+5:30

Tratak Meditation : 'त्राटक ध्यानधारणा’ करणे सोपे आहे पण ते मनापासून आणि एकचित्ताने करायला हवे, त्यासाठीच या टिप्स

Do Tratak meditation for concentration and better vision, but if you want better results, don't forget 3 things... | एकाग्रता आणि उत्तम दृष्टीसाठी करा त्राटक ध्यान, मात्र उत्तम परिणाम हवे तर विसरु नका ३ गोष्टी...

एकाग्रता आणि उत्तम दृष्टीसाठी करा त्राटक ध्यान, मात्र उत्तम परिणाम हवे तर विसरु नका ३ गोष्टी...

डोळा हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव आहे. डोळ्याची नजर अबाधित राहावी म्हणून आपण सतत काळजी घेत असतो. परंतु सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर बसून काम केल्याने तसेच मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतातच. एकदा दृष्टी कमजोर झाली की मग, कमी दिसणे किंवा चष्मा लागणे अथवा नंबर वाढणे अशा अनेक प्रकारच्या समस्या डोळ्यांसंबंधात उद्भवतात. म्हणूनच चष्मा लागण्याआधी किंवा दृष्टीवर परिणाम होण्याआधीच वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्यासोबतच आपण काही घरगुती उपाय देखील करुन डोळ्यांना स्वस्थ ठेवू शकतो.

आधुनिक जीवनात व्यस्ततेमुळे आपले शरीर खूप थकून जाते. ज्यामुळे दिवसाच्या शेवटी खूप तणाव जाणवतो. सर्व प्रयत्न करूनही तणाव काही लवकर दूर होत नाही. अशा परिस्थितीत शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगासने आणि ध्यानधारणा करण्याइतके दुसरे काही सर्वोत्तम असूच शकत नाही. आपण 'त्राटक ध्यानधारणा' करून आपल्या डोळ्यांची दृष्टी अधिक सक्षम करू शकतो तसेच दिवसभराचा ताण - तणाव देखील चटकन दूर करू शकतो(Do Tratak meditation for concentration and better vision).

त्राटक ध्यानधारणा म्हणजे नेमकं काय ? 
शतकानुशतके केल्या जाणाऱ्या विधींपैकी एक म्हणजे त्राटक ध्यान (Tratak Meditation). त्राटक म्हणजे टक लावून पाहणे. असे मानले जाते की जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट वस्तूवर नजर एकटक लावून ठेवतो आणि शरीर अजिबात न हलवता देखील मन आपोआप स्थिर होते त्याला त्राटक ध्यान म्हटले जाते.एकंदरीतच भटकलेल्या किंवा विचारात गुंतलेल्या मनाला एकाग्र आणि मन शांत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, जो आपल्या मेंदूतील नकारात्मक विचारांना सामोरे जाण्याची क्षमता सुधारण्यासाठी ओळखला जातो.

satvic.yoga या इंस्टाग्राम पेजवरून त्राटक ध्यान म्हणजे नेमकं काय... आणि ते कसे करावे, त्याचे फायदे काय यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  


त्राटक ध्यान (Tratak Meditation) कसे करावे ?
त्राटक क्रियेची सर्वात जुनी आणि लोकप्रिय पद्धत म्हणजे दिव्याच्या किंवा मेणबत्तीच्या जळत्या ज्योतीवर ध्यान लावणे किंवा एकटक पाहणे. त्राटक ध्यान अनेक प्रकारे करता येते, जसे की मेणबत्तीच्या वातीवर, गोल वस्तूच्या किंवा बॉलच्या बिंदूवर, पेन्सिलच्या टोकावर आणि बोटांच्या टोकावर देखील करता येते. 

१. सर्वप्रथम एक दिवा पेटवून घ्या. 
२. हा दिवा एका टेबलावर असा ठेवा की तो बरोबर आपल्या डोळ्यांच्या दृष्टी समोर येईल. (आय लेव्हलला मॅच होईल असा ठेवून घ्यावा.)
३. आपल्यासमोरील टेबलावर ठेवलेला दिवा आणि आपल्यात किमान एका हाताचे अंतर असले पाहिजे. 
४. आता या दिव्याच्या ज्योतीवर डोळ्यांनी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. (ही क्रिया करत असताना आपले मन आणि डोके शांत ठेवून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा.)
५. दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित केल्यानंतर शक्यतो डोळ्यांची उघडझाप न करण्याचा प्रयत्न करा.
६. १० ते १५ मिनिटांनी आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून त्यांच्यात ऊब निर्माण करा. 
७. आता हातांच्या तळव्यात ऊब निर्माण झाली असेल, हलकेच आपले हात डोळ्यांवर ठेवा. 

त्राटक ध्यानाचे फायदे :- 

१. एकाग्रता वाढवते
२. शांत व चांगली झोप लागते
३. स्ट्रेस दूर होतो 
४. डोळ्यांची नजर सुधारते 
५. डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात आणि प्रकाश वाढतो

Web Title: Do Tratak meditation for concentration and better vision, but if you want better results, don't forget 3 things...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.